एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

दोषी विकास सचदेव यांना मोठा दिलासा, 3 वर्षांची शिक्षा हायकोर्टाकडून निलंबित

विकास सचदेव हा 9 डिसेंबर 2017 च्या रात्री दिल्लीहून मुंबईत येत असताना विस्तारा एअरलाईन्सच्या विमानात विकासनं आपला विनयभंग केल्याचा आरोप या अल्पवयीन बॉलिवूड अभिनेत्रीनं केला होता.

मुंबई : बॉलिवूडची अल्पवयीन अभिनेत्रीसोबत झालेल्या विनयभंग प्रकरणी दोषी ठरवून शिक्षा झालेल्या विकास सचदेवला मंगळवारी हायकोर्टानं मोठा दिलासा दिला आहे. या आरोपीला मुंबईतील दिंडोशी कोर्टानं पोक्सो अंतर्गत दोषी ठरवत सुनावलेली 3 वर्षांची शिक्षा मुंबई उच्च न्यायालयानं तूर्तास निलंबित करत आरोपीला नव्यानं जामीन घेण्याचे निर्देश दिले आहेत. शिक्षेचा कालावधी कमी असल्यानं ती निलंबित करण्याची याचिकाकर्त्यांची मागणी न्यायमूर्ती पृथ्वीराज चव्हाण यांनी मान्य केली. मात्र मुंबईबाहेर जाताना दिंडोशी कोर्टाची पूर्व परवानगी घेणं दोषी विकास सचदेव यांना अनिवार्य असल्याचं हायकोर्टानं आपल्या आदेशांत म्हटलं आहे. कायद्यानुसार विकास सचदेवनं जामीनासाठी केलेला अर्ज स्वीकारत त्याला सत्र न्यायालयानं 25 हजारांचा जामीन मंजूर करत 3 वर्षांच्या शिक्षेलाही तात्पुरती स्थगिती दिली होती. मात्र असं काही घडलंच नसून आपण निर्दोष असल्याचा सचदेवचा दावा मात्र न्यायमूर्ती पृथ्वीराज चव्हाण यांनी स्वीकारण्यास स्पष्ट नकार दिला. "औरत जानती कम है लेकीन समझती ज्यादा है" या म्हणीचा दाखला देत त्यांनी याचिकाकर्त्यांचे वकील अनिकेत निकम यांना शालेय विद्यार्थ्यांना दिल्या जाणा-या गुड टच, बॅड टचची आठवण करून दिली. महिलांना पुरूषांपेक्षा जास्त स्पर्शज्ञान असतं, त्यामुळे तिचा दावा अगदीच खोटा कसा म्हणता येईल?, असंही हायकोर्टानं म्हटलं आहे. यावर तिनं तेव्हाच या घटनेची तक्रार केबिन क्रू ला केली नाही?, फ्लाईट स्टाफच्या जबाबानुसार अशी काही घटना घडलीच नव्हती असा दावा याचिकाकर्त्यांच्या वकिलांनी केला. यावर विनयभंगानंतर पीडितेनं कसं वागावं याची कोणतीही मार्गदर्शक तत्व नाहीत. त्यामुळे या गोष्टी ग्राह्य धरता येणार नाहीत असंही हायकोर्टानं स्पष्ट केलं. EXCLUSIVE : मुंबई : झायरा वसिमसोबत विमानात नेमकं काय घडलं? विकास सचदेव हा 9 डिसेंबर 2017 च्या रात्री दिल्लीहून मुंबईत येत असताना विस्तारा एअरलाईन्सच्या विमानात विकासनं आपला विनयभंग केल्याचा आरोप या अल्पवयीन बॉलिवूड अभिनेत्रीनं केला होता. मात्र आरोपीच्या पत्नी दिव्या सचदेव यांनी हे सर्व आरोप फेटाळून लावत केवळ चर्चेत राहण्यासाठी अभिनेत्रीनं हे आरोप करत केल्याचा दावा केला आहे. झोपलेल्या व्यक्तीचा पाय पुढच्या सीटपर्यंत गेला, तर त्याला लैंगिक अत्याचार किंवा विनयभंग म्हणायचं का?, असा दावा सचदेव यांच्या वतीने करण्यात आला आहे. मात्र पीडितेनं सत्र न्यायालयात सांगितलं की, 'सुरुवातीला विमान हेलकावे खात असल्याच्या कारणावरुन आपण या गोष्टीकडे दुर्लक्ष केलं. मात्र त्यानंतर विमानातील दिवे बंद होताच त्यानं पुन्हा असभ्य वर्तन केलं. तेव्हा मी व्हिडीओ काढण्याचाही प्रयत्न केला, मात्र लाईटच्या कमतरतेमुळे ते शक्य झालं नाही. सीटच्या मागून हा इसम माझ्या पाठीला आणि मानेला पाय लावत होता. क्रू मेंबर्सकडे याची तक्रार करण्याचा प्रयत्न केला मात्र कोणीही दाद न दिल्यामुळे मुंबई विमानतळावर उतरल्यानंतर सोशल मीडियावरून आपली व्यथा मांडली. घडलेला प्रकार पाहता देशातील मुलींची तुम्ही अशी काळजी घेणार का?' असा सवाल तिनं उपस्थित केला होता. या संपूर्ण प्रकाराची मुंबई पोलिसांसह महिला आयोगानेही गंभीर दखल घेतली होती. संबंधित बातम्या : झोपेत चुकून पाय लागला तर लैंगिक अत्याचार कसा? : दिव्या सचदेव अल्पवयीन बॉलिवूड अभिनेत्रीच्या विमानातील विनयभंग प्रकरणी दोषीची हायकोर्टात याचिका
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

SA vs SL : दक्षिण आफ्रिकेच्या Marco Jansen ने श्रीलंकेचा बॅंड वाजवला, संपूर्ण टीमचा 42 धावांमध्ये करेक्ट कार्यक्रम
Marco Jansen च्या गोलंदाजीपुढं श्रीलंकेच्या फलंदाजांची शरणागती, 7 विकेट घेतला लावला सुरुंग
माहीम मतदारसंघातील जायंट किलर महेश सावंत लिलावती रुग्णालयात; डॉक्टरांकडून विश्रांतीचा सल्ला
माहीम मतदारसंघातील जायंट किलर महेश सावंत लिलावती रुग्णालयात; डॉक्टरांकडून विश्रांतीचा सल्ला
भाजपचं फुल्ल लॉबिंग, गृह अन् महत्त्वाचं खातं स्वत:कडे; एकनाथ शिंदे अन् अजित पवारांना कोणतं मंत्रिपद?
भाजपचं फुल्ल लॉबिंग, गृह अन् महत्त्वाचं खातं स्वत:कडे; एकनाथ शिंदे अन् अजित पवारांना कोणतं मंत्रिपद?
दिवंगत नितीन देसाईंचा एन.डी.स्टुडीओ शासनाच्या ताब्यात, आता गोरेगाव फिल्मसीटीकडून होणार परिचालन
दिवंगत नितीन देसाईंचा एन.डी.स्टुडीओ शासनाच्या ताब्यात, आता गोरेगाव फिल्मसीटीकडून होणार परिचालन
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Zero Hour : आई राज्यसभेत, भाऊ-बहीण लोकसभेत, संपूर्ण गांधी कुटुंब संसदेतZero Hour : आरक्षण, बेरोजगारी,कर्ज, नव्या सरकारसमोर आव्हानांचा डोंगरZero Hour Mahayuti: नव्या महायुती सरकारसमोर सर्वात मोठं आव्हान कोणतं असेल?Pune Raj Thackeray Meeting : पराभव उमेदवारांसोबत राज ठाकरेंची बैठक, बैठकीत चर्चा काय?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
SA vs SL : दक्षिण आफ्रिकेच्या Marco Jansen ने श्रीलंकेचा बॅंड वाजवला, संपूर्ण टीमचा 42 धावांमध्ये करेक्ट कार्यक्रम
Marco Jansen च्या गोलंदाजीपुढं श्रीलंकेच्या फलंदाजांची शरणागती, 7 विकेट घेतला लावला सुरुंग
माहीम मतदारसंघातील जायंट किलर महेश सावंत लिलावती रुग्णालयात; डॉक्टरांकडून विश्रांतीचा सल्ला
माहीम मतदारसंघातील जायंट किलर महेश सावंत लिलावती रुग्णालयात; डॉक्टरांकडून विश्रांतीचा सल्ला
भाजपचं फुल्ल लॉबिंग, गृह अन् महत्त्वाचं खातं स्वत:कडे; एकनाथ शिंदे अन् अजित पवारांना कोणतं मंत्रिपद?
भाजपचं फुल्ल लॉबिंग, गृह अन् महत्त्वाचं खातं स्वत:कडे; एकनाथ शिंदे अन् अजित पवारांना कोणतं मंत्रिपद?
दिवंगत नितीन देसाईंचा एन.डी.स्टुडीओ शासनाच्या ताब्यात, आता गोरेगाव फिल्मसीटीकडून होणार परिचालन
दिवंगत नितीन देसाईंचा एन.डी.स्टुडीओ शासनाच्या ताब्यात, आता गोरेगाव फिल्मसीटीकडून होणार परिचालन
Nayanthara Controversy : नयनतारा लग्नानंतर 4 महिन्यातच आई झाली, रामाचा अपमान अन् धर्मही बदलला! आता कोर्टात तारीख पे तारीख
नयनतारा लग्नानंतर 4 महिन्यातच आई झाली, रामाचा अपमान अन् धर्मही बदलला! आता कोर्टात तारीख पे तारीख
वंचितचे पदाधिकारी ZP अध्यक्षांच्या घरात घुसले, तिथं फक्त 99 मतंच कशी? शाब्दीक वाद उफाळला
वंचितचे पदाधिकारी ZP अध्यक्षांच्या घरात घुसले, तिथं फक्त 99 मतंच कशी? शाब्दीक वाद उफाळला
धक्कादायक! शिक्षकानं पत्नी आणि मुलीसह संपवलं जीवन, परभणी जिल्ह्यात खळबळ
धक्कादायक! शिक्षकानं पत्नी आणि मुलीसह संपवलं जीवन, परभणी जिल्ह्यात खळबळ
लिव्ह इनमधील प्रेमप्रकरणाचा द एन्ड, प्रेयसीला संपवलं, मुलाला आळंदीत सोडलं; अखेर तपासात बिंग फुटलं
लिव्ह इनमधील प्रेमप्रकरणाचा द एन्ड, प्रेयसीला संपवलं, मुलाला आळंदीत सोडलं; अखेर तपासात बिंग फुटलं
Embed widget