एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

LIVE : मुसळधार पावसामुळे रोहा-अलिबाग मार्ग बंद

मुंबई : मुंबई, ठाण्यासह कोकण पट्ट्यात परतलेल्या वरुणराजाची न थकता, न थांबता तुफान बॅटिंग सुरु आहे. दक्षिण मुंबईसह पूर्व आणि पश्चिम उपनगरांमध्ये मुसळधार पाऊस सुरु आहे. तर ठाणे, पालघरलाही पावसाने झोडपलं आहे. मागील 21 तासात मुंबईत 68 मिमी पावसाची नोंद झाली आहे. रायगड - रात्रभर झालेल्या मुसळधार पावसामुळे रोहा-अलिबाग मार्ग बंद, भातसई गावाजवळील मोरी वाहून गेल्याने वाहतूक ठप्प वसई : मिठागरातील संपूर्ण वस्ती पाण्याखाली, 125 घरांमध्ये पाणी शिरलं, सुमारे 400 लोक अडकले, अग्निशमन दलाच्या मदतीने बचावकार्य सुरु मुसळधार पावसामुळे दादर आणि आसपासच्या परिसरातील अनेक शाळांना आज सुट्टी सकाळी सात वाजेपर्यंत मुंबई आणि उपनगरातील पावसाची आकडेवारी Mum_Rain_1 मुंबई शहर - 68.09 मिमी मुंबई उपनगर (पूर्व)  - 69.73 मिमी मुंबई उपनगर (पश्चिम) - 88.65 मिमी पावसामुळे वसई-विरारची दैना LIVE : मुसळधार पावसामुळे रोहा-अलिबाग मार्ग बंद परतीच्या पावसाने वसई आणि विरारमधील जनजीवन विस्कळीत झालं आहे.  बुधवारी दुपारपासून जोर धरलेल्या पावसाने रात्रभर सर्वत्र पाणीच पाणी झालं. काल संध्याकाळी सहाच्या सुमारास विरार पूर्वमधील फुलपाडा पापडखींड धरण भरल्याने आजूबाजूचे रस्ते पूर्णपणे पाण्याखाली गेले आहेत. तर काही घरांमध्ये पाणी शिरलं आहे. गेल्या 24 तासांमधील पावसाची आकडेवारी पालघर 315 मिमी डहाणू 456 मिमी तलासरी 72 मिमी बोईसर 344 मिमी वसई- 85 मिमी ------------------- मुंबई : मुंबई, ठाण्यासह कोकण पट्ट्यात परतलेल्या वरुणराजाची न थकता, न थांबता तुफान बॅटिंग सुरु आहे. दक्षिण मुंबईसह पूर्व आणि पश्चिम उपनगरांमध्ये मुसळधार पाऊस सुरु आहे. तर ठाणे, पालघरलाही पावसाने झोडपलं आहे. मागील 21 तासात मुंबईत 68 मिमी पावसाची नोंद झाली आहे. सततच्या मुसळधार पावसाने मुंबई अक्षरश बेहाल झाली आहे. हिंदमाता, अंधेरी, परेल अशा अनेक सखल भागात पाणी साचलं आहे. सततच्या पावसाने रस्ते जलमय झाले असून रस्ते वाहतूकही मंदावली आहे. तर रेल्वेरुळांवरही पाणी भरल्याने लोकल 10 ते 15 मिनिटं उशिराने धावत आहेत. मुंबईची लाईफलाईनही कोलमडली तुफान पावसाचा परिणाम मुंबईच्या लाईफलाईनवरी झाला आहे. मध्य रेल्वे आणि पश्चिम रेल्वेवरील लोकल वाहतूक 10 ते 15 मिनिटं उशिराने सुरु आहे. तर रस्ते वाहतुकीबरोबरच हार्बर मार्गावरील सीएसटी ते अंधेरी दरम्यानची लोकल वाहतूक विस्कळीत झाली आहे. मुंबईतील पाणीसाठ्याचा 8 वर्षांचा उच्चांक एकीकडे सततच्या मुसळधार पावसाने मुंबईची दैना झालेली असताना दुसरीकडे याच पावसाने मुंबईकरांवर कृपा केली आहे. मुसळधार पावसाने मुंबईतील तलावांमध्ये 8 वर्षांचा विक्रमी पाणीसाठा झाला आहे. त्यामुळे पुढच्या सप्टेंबरपर्यंत पाण्याची चिंता मिटली आहे. मुंबईतील तलावांची साठवण क्षमता 14 लाख दक्षलक्ष लिटर असून ही पातळी आधीच ओलांडली आहे. मोडकसागर, तानसा, विहार, तुळशी, मध्य वैतरणा धरणं तुडूंब भरली आहे. 2015 मध्ये पावसाने हुलकावणी दिल्याने मुंबईत आॅगस्टपर्यंत 15 टक्के पाणीकपात लागू करण्यात आली होती.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Eknath Shinde : एक रुपयात पीक विमा, महिलांना एसटी प्रवास शुल्कात सवलत ते लाडकी बहीण योजना, एकनाथ शिंदेंचे प्रमुख निर्णय एका क्लिकवर
एक रुपयात पीक विमा ते आनंदाचा शिधा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सरकारचे प्रमुख लोकप्रिय निर्णय
बीडमधील शरद पवारांचा आमदार मातोश्रीवर, उद्धव ठाकरेंची घेतली भेट; फोटो आले समोर
बीडमधील शरद पवारांचा आमदार मातोश्रीवर, उद्धव ठाकरेंची घेतली भेट; फोटो आले समोर
कल्याणमध्ये 17 व्या मजल्यावरील फ्लॅटला भीषण आग; अग्निशमनच्या गाड्यांसह 20 ॲम्ब्युलन्स घटनास्थळी
कल्याणमध्ये 17 व्या मजल्यावरील फ्लॅटला भीषण आग; अग्निशमनच्या गाड्यांसह 20 ॲम्ब्युलन्स घटनास्थळी
Raigad : शेकापचा बालेकिल्ला ढासळला, रायगडमधील एकही जागा जिंकण्यास अपयशी
शेकापचा बालेकिल्ला ढासळला, रायगडमधील एकही जागा जिंकण्यास अपयशी
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Special Report Uddhav Thackeray : ठाकरे एकत्र आले तर मुंबईकर त्यांना मत देईल?Rajkiya Shole: भाजपचा शिंदेंसाठी निरोप, आठवलेंची दवंडी!Eknath Shinde Devendra Fadnavis: शिंदेंना चिंता,फडणवीसांचा विरोध; नेत्यांची बॉडी लँग्वेज काय सांगते?Rajkiiya Shole : देवेंद्र फडवीसचं मुख्यमंत्री, भाजपचा एकनाथ शिंदेंना निरोप

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Eknath Shinde : एक रुपयात पीक विमा, महिलांना एसटी प्रवास शुल्कात सवलत ते लाडकी बहीण योजना, एकनाथ शिंदेंचे प्रमुख निर्णय एका क्लिकवर
एक रुपयात पीक विमा ते आनंदाचा शिधा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सरकारचे प्रमुख लोकप्रिय निर्णय
बीडमधील शरद पवारांचा आमदार मातोश्रीवर, उद्धव ठाकरेंची घेतली भेट; फोटो आले समोर
बीडमधील शरद पवारांचा आमदार मातोश्रीवर, उद्धव ठाकरेंची घेतली भेट; फोटो आले समोर
कल्याणमध्ये 17 व्या मजल्यावरील फ्लॅटला भीषण आग; अग्निशमनच्या गाड्यांसह 20 ॲम्ब्युलन्स घटनास्थळी
कल्याणमध्ये 17 व्या मजल्यावरील फ्लॅटला भीषण आग; अग्निशमनच्या गाड्यांसह 20 ॲम्ब्युलन्स घटनास्थळी
Raigad : शेकापचा बालेकिल्ला ढासळला, रायगडमधील एकही जागा जिंकण्यास अपयशी
शेकापचा बालेकिल्ला ढासळला, रायगडमधील एकही जागा जिंकण्यास अपयशी
Rishabh Pant : लखनौनं रिषभ पंतसाठी 27 कोटी रुपये मोजले, सरकारला करापोटी कोट्यवधी रुपये द्यावे लागणार,रिषभच्या खात्यात किती कोटी राहणार?
लखनौनं रिषभ पंतसाठी 27 कोटी रुपये मोजले, कोट्यवधी रुपये करापोटी द्यावे लागणार, हातात किती येणार?
आम्ही त्यांच्या जागी असतो तर शपथ घेऊन कामाला लागलो असतो; सुप्रिया सुळेंचा महायुतीला टोला
आम्ही त्यांच्या जागी असतो तर शपथ घेऊन कामाला लागलो असतो; सुप्रिया सुळेंचा महायुतीला टोला
Manda Mhatre : गणेश नाईकांना जे जमलं नाही ते मंदा म्हात्रेंनी करून दाखवलं, बेलापुरात विजयाची हॅट्रिक करत रचला विक्रम
गणेश नाईकांना जे जमलं नाही ते मंदा म्हात्रेंनी करून दाखवलं, बेलापुरात विजयाची हॅट्रिक करत रचला विक्रम
Cidco Lottery 2024 : सिडकोच्या “माझे पसंतीचे सिडकोचे घर”महागृहनिर्माण योजनेला अभूतपूर्व प्रतिसाद, 11 डिसेंबरपर्यंत मुदतवाढ
सिडकोच्या “माझे पसंतीचे सिडकोचे घर” योजनेला अभूतपूर्व प्रतिसाद, 92 हजार अर्ज दाखल
Embed widget