एक्स्प्लोर

Corona Helpline Number | मुंबईत 'कोरोना' विषयी सर्व माहिती मिळवा एका फोनवर

कोरोना पेशंटसाठी नजीकच्या कोणत्या रुग्णालयात जागा शिल्लक आहे का? हे आता एका फोन कॉलवर समजणार आहे. मुंबई महापालिकेने हेल्पलाईन नंबर जारी केला आहे.

मुंबई : कोरोना संक्रमित रुग्णांवर उचपार करण्यासाठी आता समर्पित रुग्णालये आहेत. दिवसेंदिवस कोरोना बाधितांची संख्या वाढत आहे. त्यामुळे अनेक रुग्णालये आता भरली आहेत. परिणामी कुठल्या रुग्णालयात जागा आहे, हे समजणे अवघड होत आहे. मात्र, ही अडचण आता दूर झाली आहे. कोणत्या रुग्णालयात जागा शिल्लक आहे, हे एका फोन कॉलवर समजणार आहे. मुंबई महापालिकेने त्यासाठी एक हेल्पलाईननंबर जारी केला आहे. कोरोना पेशंटसाठी नजीकच्या कोणत्या रुग्णालयात जागा होऊ शकेल हे जलदगतीनं समजण्यासाठी हेल्पलाईनवर आता खास सोय करण्यात आली आहे. महापालिकेच्या '1916' या हेल्पलाइन क्रमांकावर संपर्क साधून '3' नंबर निवडल्यास 'कोविड' रुग्णांसाठी खाटा उपलब्ध असलेल्या रुग्णालयांची माहिती तात्काळ मिळणार आहे. 1916 क्रमांकावर संपर्क साधून '1' नंबर निवडल्यास 'कोविड' विषयी डॉक्टरांचे टेलिफोनिक मार्गदर्शन मिळणार आहे. तर रुग्णवाहिकेसाठी '2' नंबर निवडणे गरजेचे आहे. ..तर, केंद्रातील अर्थव्यवस्थेला राज्ये योगदान देऊ शकणार नाहीत; शरद पवार यांचे पंतप्रधानांना पत्र 'कोरोना कोविड' विषयक हेल्पलाईन महापालिकेशी संबंधित इतर नागरी सेवा सुविधा विषयक बाबींसाठी महापालिकेच्या 'वन नाईन वन सिक्स' या 'हेल्पलाइन' क्रमांकावर संपर्क साधून '4' हा क्रमांक निवडणे आवश्यक आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या '1916' (वन नाईन वन सिक्स) या हेल्पलाइन क्रमांकावरच आता 'कोरोना कोविड' विषयक हेल्पलाईन देखील उपलब्ध करून देण्यात आली आहे. विविध रुग्णालयांमध्ये 'कोविड' बाधित रुग्णांसाठी असलेल्या खाटांपैकी उपलब्ध असलेल्या खाटांची माहिती सध्या नियमितपणे अद्ययावत केली जात आहे. तसंच, लवकरच ही माहिती 'रियल टाईम' पद्धतीने देखील अद्ययावत करण्याचे काम आता अंतिम टप्प्यात आहे. राज्यातील कोरोना रुग्णांचा आकडा वाढला कोरोना व्हायरसने संक्रमित लोकांचा आकडा आजही चढताच आहे. दिलासादायक म्हणजे ही वाढ कालच्या तुलनेत निम्म्याने कमी झाली आहे. आज राज्यात कोरोनाबाधीत 440 नवीन रुग्णांची नोंद झाली. यामुळे एकूण रुग्ण संख्या 8068 झाली आहे. आज 112 रुग्णांना घरी सोडण्यात आले असून आतापर्यंत राज्यभरात 1188 रुग्ण बरे झाले आहेत. तर दिवसभरात 19 लोकांचा कोरोनामुळे बळी गेलाय, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली. Wadala Lockdown Help | वडाळ्याच्या डॅफोडील सोसायटीत सर्व रहिवाशांसाठी घरपोच सेवा, एकटे राहणाऱ्या जेष्ठांना जेवणाचीही सोय
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

अभिनेता म्हणून हा माणूस चांगला, पण माणूस म्हणून किती खालच्या पातळीचा; विजय पाटकरांवर राजेभोसलेंचा पलटवार
अभिनेता म्हणून हा माणूस चांगला, पण माणूस म्हणून किती खालच्या पातळीचा; विजय पाटकरांवर राजेभोसलेंचा पलटवार
आता, कला क्षेत्रातही बिनविरोध निवडणुकांची प्रवृत्ती घुसतेय, हे घातक; यशोमती ठाकूरांचे कलाकारांना आवाहन
आता, कला क्षेत्रातही बिनविरोध निवडणुकांची प्रवृत्ती घुसतेय, हे घातक; यशोमती ठाकूरांचे कलाकारांना आवाहन
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 24 मे 2026 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 24 मे 2026 | रविवार
जसं मराठी बोलता येतं तसंच हिंदी पण आलं पाहिजे, भाजप आमदार कालिदास कोळंबकरांना हिंदीचा गोडवा
जसं मराठी बोलता येतं तसंच हिंदी पण आलं पाहिजे, भाजप आमदार कालिदास कोळंबकरांना हिंदीचा गोडवा

व्हिडीओ

Anna Hazare Ahilyanagar : जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारेंकडून कॉकरोज जनता पार्टीचे समर्थन...
Prashant Ambi on Sanjay Gaikwad : संजय गायकवाडांचे कार्यकर्ते फोनवर मला आई-बहिणी वरून शिव्या देतात
Laxman Hake PC : जरांगे नावाच्या एका अनपढ माणसामुळे ओबीसीचं आरक्षण संपलं, हाके आक्रमक
Donald Trump daughter Special Report : डोनाल्ड ट्रम्प यांच्या मुलीच्या हत्येचा कट ? धक्कादायक माहिती..
Rehabilitate Beggars from the Street : तरुणाची व्यथा, वर्दीतली माणुसकी Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
IPL 2026 Playoffs : आयपीएल प्लेऑफसाठी चार संघ ठरले, पहिल्या दोन लढती फिक्स, बंगळुरु-गुजरात, हैदराबाद- राजस्थान कधी आमने सामने येणार? संपूर्ण वेळापत्रक
आयपीएल प्लेऑफसाठी चार संघ निश्चित, पहिल्या दोन लढती फिक्स, बंगळुरु-गुजरात, हैदराबाद- राजस्थान कधी आमने सामने येणार?
अभिनेता म्हणून हा माणूस चांगला, पण माणूस म्हणून किती खालच्या पातळीचा; विजय पाटकरांवर राजेभोसलेंचा पलटवार
अभिनेता म्हणून हा माणूस चांगला, पण माणूस म्हणून किती खालच्या पातळीचा; विजय पाटकरांवर राजेभोसलेंचा पलटवार
बीडमध्ये राजकीय नेत्याच्या मुलाकडून महिलेवर अत्याचार, पैसेही उकळले; विवाहितेची पोलिसात धाव, गुन्हा दाखल
बीडमध्ये राजकीय नेत्याच्या मुलाकडून महिलेवर अत्याचार, पैसेही उकळले; विवाहितेची पोलिसात धाव, गुन्हा दाखल
विजेचा खांब पडून एकाचा मृत्यू; घरावरील उघड्या वायरचा करंट बसून चिमुकलाही ठार; दोन दुर्घटनेनंतर नागरिक संतप्त
विजेचा खांब पडून एकाचा मृत्यू; घरावरील उघड्या वायरचा करंट बसून चिमुकलाही ठार; दोन दुर्घटनेनंतर नागरिक संतप्त
Ladki Bahin Yojana :शासनानं राबवलेल्या लाडकी बहीण योजनेमुळं खूप ताण पडलाय, वेगवेगळ्या ठिकाणी जितकं फंडिंग यायला पाहिजे तितकं येत नाही : उदयनराजे भोसले
लाडकी बहीण योजना शासनानं राबवली त्याच्यामुळं खूप ताण पडलाय, उदयनराजे भोसले यांचं मोठं वक्तव्य
आता, कला क्षेत्रातही बिनविरोध निवडणुकांची प्रवृत्ती घुसतेय, हे घातक; यशोमती ठाकूरांचे कलाकारांना आवाहन
आता, कला क्षेत्रातही बिनविरोध निवडणुकांची प्रवृत्ती घुसतेय, हे घातक; यशोमती ठाकूरांचे कलाकारांना आवाहन
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 24 मे 2026 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 24 मे 2026 | रविवार
LIC : मार्च तिमाहीत एलआयसीची धमाकेदार कामगिरी, नफ्याच्या बाबतीत SBI, HDFC सारख्या दिग्गज कंपन्यांना मागं टाकलं
LIC ची मार्च तिमाहीत धमाकेदार कामगिरी, नफ्याच्या बाबतीत SBI, HDFC सारख्या दिग्गज कंपन्यांना मागं टाकलं
Embed widget