एक्स्प्लोर
Advertisement
मुंबईच्या विविध भागात गॅस गळतीच्या तक्रारी, नागरिकांमध्ये घबराट
अनेक लोकांचा एकाच वेळी फोन आल्याने अग्निशमन दलाने नऊ गाड्या वेगवेगळ्या ठिकाणी पाठवल्या. मात्र कुठेही पाईपलाईन फुटलेली किंवा दुसरी कोणती घटना दिसून आली नाही
मुंबई : मुंबईच्या पूर्व उपनगरातील बहुतांश भागात सोमवारी (19 सप्टेंबर) गॅसची दुर्गंधी पसरल्याने नागरिकांमध्ये मोठी घबराट उडाली आहे. मानखुर्द, चेंबूर, घाटकोपर, पवई, हिरानंदानी, चकाला अशा विविध भागातून अग्निशमन दल आणि महानगर गॅस लिमिटेडकडे गॅस गळतीच्या तक्रारी आल्या. तक्रारींची दखल घेत अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेतली. तर चेंबूरमध्ये राष्ट्रीय केमिकल फर्टिलायझर असल्याने मनपा अधिकाऱ्यांनी तेथे पाहणी केली.
अनेक लोकांचा एकाच वेळी फोन आल्याने अग्निशमन दलाने नऊ गाड्या वेगवेगळ्या ठिकाणी पाठवल्या. महानगर गॅस लिमिटेडनेही आपल्या आपत्कालीन गाड्या सर्व ठिकाणी पाठवून तपासणी केली. मात्र कुठेही पाईपलाईन फुटलेली किंवा दुसरी कोणती घटना दिसून आली नाही. त्यानंतर राष्ट्रीय केमिकल फर्टिलायजर या कंपनीतून गॅस येत असल्याचा संशय आल्याने तिथेही अग्निशमन दलाने पाहणी केली.
मात्र ही गॅस गळती नेमकी कुठे झाली याचा शोध अद्यापही सुरु असल्याचं महापालिकेने म्हटलं आहे. तर ज्या भागातून फोन आले त्या भागात आपत्कालीन टीम सक्रीय झाल्या आहेत. त्यामुळे काल रात्री नेमका कोणता गॅस लीक झाला होता, कुठून लीक झालेला, एवढ्या लोकांना एकाच वेळी त्याचा कसा वास आला, अशा अनेक प्रश्नांची उत्तर अजून सापडली नाहीत.
दरम्यान "आमच्या कंट्रोल रुममध्ये गॅस दुर्गंधीच्या एकूण 29 तक्रारी आल्या आहेत. अग्निशमन दलाच्या नऊ गाड्यांसह महानगर गॅस लिमिटेडच्या आठ इमर्जन्सी व्हॅन रवाना केल्या आहेत," अशी माहित मुंबई महापालिकेने ट्विटरद्वारे दिली.
We have recieved complaints from citizens about odour of some unknown gas in eastern and western suburbs. MCGM has mobilized all concerned agencies. 9 fire engines have been mobilized at various places to find out source of leakage. For any queries, please call 1916 #MCGMUpdates
— माझी Mumbai, आपली BMC (@mybmc) September 19, 2019
A total of 29 complaints were received by the #1916 control room regarding an unknown smell, which has considerably reduced now. Apart from the 9 fire engines, 4 emergency vans of MGL have been mobilised. If you still notice the odour please dial 1916 #gasleak #MCGMUpdates
— माझी Mumbai, आपली BMC (@mybmc) September 19, 2019
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
क्रिकेट
महाराष्ट्र
महाराष्ट्र
Advertisement