एक्स्प्लोर
माजी आमदार नरेंद्र पाटील यांचा राष्ट्रवादी काँग्रेसला रामराम, लवकरच भाजप प्रवेश
नरेंद्र पाटील यांनी पक्ष सदस्यत्व आणि महाराष्ट्र प्रदेश लेबर सेलच्या अध्यक्षपदाचा आज राजीनामा दिला. ज्यानंतर ते आता भाजपात प्रवेश करणार हे जवळपास निश्चित मानलं जात आहे.

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे विधानपरिषदेचे माजी आमदार आणि माथाडी कामगार नेते नरेंद्र पाटील यांनी अखेर पक्षाला रामराम ठोकला. त्यांनी पक्ष सदस्यत्व आणि महाराष्ट्र प्रदेश लेबर सेलच्या अध्यक्षपदाचा आज राजीनामा दिला. ज्यानंतर ते आता भाजपात प्रवेश करणार हे जवळपास निश्चित मानलं जात आहे. नरेंद्र पाटील हे भाजपच्या संपर्कात असल्याच्या अनेक दिवसांपासून चर्चा होत्या. विद्यमान विधानपरिषद आमदार निरंजन डावखरे यांनी राष्ट्रवादीला रामराम ठोकत भाजपात प्रवेश केला, तेव्हा नरेंद्र पाटील निरंजन डावखरेंना सोडण्यासाठी भाजप मुख्यालयात गेले होते. पण निरंजन डावखरे आपले चांगले मित्र असल्यामुळे आपण आल्याचं त्यांनी म्हटलं होतं. नुकत्याच जाहीर झालेल्या महामंडळ नियुक्त्यांमध्ये नरेंद्र पाटील यांच्याकडे अण्णासाहेब पाटील आर्थिक महामंडळाच्या अध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. त्यानंतर नरेंद्र पाटील भाजपात जाणार असल्याच्या चर्चांना जास्त बळ मिळालं होतं. कोण आहेत नरेंद्र पाटील? माथाडी कामगारांचे नेते म्हणून परिचित नरेंद्र पाटील हे माथाडी कामगार संघटनेचे नेते आणि संघटनेचे संस्थापक अण्णासाहेब पाटील यांचे सुपुत्र आहेत. नरेंद्र पाटील हे विधानसभा सदस्यांनी निवडून दिलेले आमदार होते. गेल्या काही दिवसांपासून ते भाजपच्या संपर्कात होते. नरेंद्र पाटील यांचा राजीनामा
आणखी वाचा
महत्त्वाच्या बातम्या
भारत
मुंबई
महाराष्ट्र
राजकारण























