एक्स्प्लोर
Advertisement
मुंबईत रोज 3 नागरिकांना डेंग्यूची लागण !
माहिती अधिकार कार्यकर्ते अनिल गलगली यांनी गेल्या 3 वर्षात मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रात डेंग्यूच्या रुग्णाची माहिती मागितली होती. मुंबई महानगरपालिका सार्वजनिक आरोग्य खात्याने अनिल गलगली यांस वर्ष 2016, वर्ष 2017, 11 नोव्हेंबर 2018 या 35 महिन्यांची माहिती दिली आहे.
मुंबई : मुंबई महानगरपालिका अंतर्गत रोज 3 नागरिकांना डेंग्यूची लागण होत आहे. तर 37 संशयित डेंग्यूचे महानगरपालिकेच्या रुग्णालयात दाखल होत आहेत. गेल्या 35 महिन्यात 38 मुंबईकरांचा डेंग्यूने मृत्यू झाल्याची माहिती माहिती अधिकार कार्यकर्ते अनिल गलगली यांना मुंबई महानगरपालिकेने दिली आहे.
माहिती अधिकार कार्यकर्ते अनिल गलगली यांनी गेल्या 3 वर्षात मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रात डेंग्यूच्या रुग्णाची माहिती मागितली होती. मुंबई महानगरपालिका सार्वजनिक आरोग्य खात्याने अनिल गलगली यांस वर्ष 2016, वर्ष 2017, 11 नोव्हेंबर 2018 या 35 महिन्यांची माहिती दिली आहे.
यामध्ये डेंग्यूचे निश्चित रुग्ण आणि मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांची आकडेवारी दिली आहे. यात निश्चित डेंग्यूचे रुग्ण वर्ष 2016 मध्ये 1180, वर्ष 2017 मध्ये 1134 तर 1 जानेवारी 2018 पासून 11 नोव्हेंबर 2018 पर्यंत 945 इतके होते तर वर्ष 2016 मध्ये 07, वर्ष 2107 मध्ये 17 आणि 11 नोव्हेंबर 2018 पर्यंत 14 इतके रुग्ण डेंग्यूने मृत्यूमुखी पडले आहेत.
संशयीत रुग्णाची संख्या वर्ष 2016 मध्ये 13213, वर्ष 2017 मध्ये 12913 तर यावर्षीच्या 11 नोव्हेंबर 2018 पर्यंत 13137 इतकी आहे. एकंदरीत प्रतिदिन 3 निश्चित आणि 37 संशयित डेंग्यूचे महानगरपालिकेच्या रुग्णालयात दाखल होत आहेत. गेल्या 35 महिन्यात 38 मुंबईकरांचा डेंग्यूने मृत्यू झाला असून प्रत्येक महिन्याला सरासरी 1 रुग्ण डेंग्यूने मृत्यू होत आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रीडा
राजकारण
राजकारण
क्रीडा
Advertisement