एक्स्प्लोर
एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा यांचा राजीनामा मंजूर, शिवसेनेकडून निवडणूक लढण्याची शक्यता
प्रदीप शर्मा यांनी 312 एन्काऊंटरमध्ये भाग घेत, 100 हून अधिक गुंडांचे एन्काऊंटर केलं आहेत. रामनारायण गुप्ता उर्फ लखनभय्या याचे बनावट एन्काऊंटर आणि कुख्यात डॉन दाऊद इब्राहिम याच्याशी संबंध या आरोपातून शर्मा यांना 2008 मध्ये पोलीस दलातून निलंबित करण्यात आलं होतं.
मुंबई : एन्काऊंटर स्पेशालिस्ट अशी ओळख असलेले पोलिस अधिकारी प्रदीप शर्मा यांचा राजीनामा मंजूर करण्यात आला आहे. शर्मा यांनी 4 जुलै रोजी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. आगामी विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात प्रदीप शर्मा उतरणार असल्याची चर्चा आहे.
प्रदीप शर्मा नालासोपारा मतदारसंघातून शिवसेनेचे उमेदवार असण्याची शक्यता आहे. शर्मा शिवसेनेकडून विधानसभा निवडणूक लढल्यास बहुजन विकास आघाडीचे आमदार क्षितीज ठाकूर यांना ते आव्हान देऊ शकतात.
प्रदीप शर्मा यांची पोलीस दलातील कारकीर्द
प्रदीप शर्मा यांनी 312 एन्काऊंटरमध्ये भाग घेत, 100 हून अधिक गुंडांचे एन्काऊंटर केलं आहेत. रामनारायण गुप्ता उर्फ लखनभय्या याचे बनावट एन्काऊंटर आणि कुख्यात डॉन दाऊद इब्राहिम याच्याशी संबंध या आरोपातून शर्मा यांना 2008 मध्ये पोलीस दलातून निलंबित करण्यात आलं होतं. लखनभय्या एन्काऊंटर प्रकरणी शर्मा यांच्यासह 13 जणांना अटकही करण्यात आली. मात्र 2013 मध्ये मुंबई उच्च न्यायालयाने त्यांची या आरोपातून मुक्तता केली. तेलगी बनावट मुद्रांक प्रकरणातील आरोपांतूनही त्यांची मुक्तता झाली.संबंधित बातम्या
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
राजकारण
महाराष्ट्र
नागपूर
Advertisement