(Source: ECI/ABP News/ABP Majha)
YES Bank | येस बँकेचे संस्थापक राणा कपूर यांच्या घरावर ईडीचा छापा, देश सोडून जाण्यावर निर्बंध
येस बँकेचे संस्थापक राणा कपूर यांच्या वरळीतील समुद्र महलमधील घरावर ईडीने छापा मारला आहे. त्यांच्याविरोधात लूक आऊट नोटीसही जारी करण्यात आली असून त्यानुसार त्यांना देश सोडून जाता येणार नाही.
मुंबई : येस बँकेचे संस्थापक आणि माजी व्यवस्थापकीय संचालक राणा कपूर यांच्या वरळीतील समुद्र महल घरावर ईडीच्या सहा सदस्यांच्या टीमने रात्री छापा टाकला. मनी लाँड्रिंग कायद्यांतर्गत ईडीने त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. त्यांच्या घरी ईडीच्या अधिकाऱ्यांनी कागदपत्रांची तपासणी सुरु केली. त्यानंतर राणा कपूर यांच्याविरोधाथ लूक आऊट नोटीसही बजावण्यात आली आहे. त्यामुळे कपूर यांना देश सोडून जाता येणार नाही. राणा कपूर यांच्यावर वारेमाप कर्जवाटप केल्याचा आरोप आहे.
डीएचएफएल कंपनीला कर्ज देण्याच्या बदल्यात फायदा मिळवल्याचा गंभीर आरोप यांच्यावर करण्यात आला आहे. राणा कपूर यांनी येस बँकेद्वारे आपल्या अधिकारात नियमबाह्य कर्ज वाटप केलं आहे. कर्ज वाटप करणे आणि ते वसूल करण्याची प्रक्रियाही त्यांनी ठरवली. आपल्या वैयक्तिक संबंधातून हे कर्ज वाटप केल्याचं समोर आलं आहे. 2017 मध्ये राणा यांनी जवळपास 6355 कोटींची कर्ज वाटप केल्याचं उघड झालं आहे.
YES BANK | घाबरण्याचं कारण नाही, तुमचे पैसे सुरक्षित; अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांचं आश्वासन
राणा कपूरचा नीरव मोदींच्या बिल्डिंगमध्ये फ्लॅट
वरळीच्या समुद्र महल बिल्डिंगमध्ये राणा कपूर यांचा प्लॅट आहे. या बिल्डिंगमध्ये देशातील अनेक व्यावसायिक, मोठ्या कंपन्यांचे सीईओ राहतात. पीएनबी बँक घोटाळ्याचा आरोपी नीरव मोदीचाही या बिल्डिंगमध्ये फ्लॅट आहे. या समुद्र महल बिल्डिंगमधील फ्लॅट 1 लाख स्क्वेअर फूटाने विकला गेला होता, त्यावेळी ही बिल्डिंग चर्चेत आली होती.
Yes Bank | येस बँकेवर निर्बंध, खातेदारांना 50 हजारांपेक्षा जास्त रक्कम काढता येणार नाही
रिझर्व्ह बँकेचे आर्थिक निर्बंध, ग्राहक केवळ 50 हजार रुपये काढू शकणार
रिझर्व्ह बँकेने येस बँकेवरती आर्थिक निर्बंध घातले आहेत. त्यानुसार 3 एप्रिलपर्यंत येस बँकेचे ग्राहक केवळ 50,000 रुपये काढू शकणार आहेत. या निर्णयाचा परिणाम आज शेअर बाजारातही दिसून आला. येस बँकेच्या शेअर्समध्ये शेअर बाजारात मोठी घसरण दिसून आली. त्याचे शेअर्स 74 टक्क्यांनी खाली आले. आर्थिक संकटाचा सामना करीत येस बँकेच्या समभागात होणारी पडझड पाहून गुंतवणूकदार आणि खातेदारांमध्ये कमालीची भीती पसरली आहे.
Yes Bank | येस बँकेत नागपूर विद्यापीठाचे 191 कोटी तर पिंपरी चिंचवड महापालिकेचे जवळपास 800 कोटी अडकले
पुढील एका महिन्यासाठी रिझर्व्ह बँकेने स्टेट बँक ऑफ इंडियाचे माजी मुख्य वित्तीय अधिकारी प्रशांत कुमार यांची येस बँकेचा प्रशासक म्हणून नियुक्ती केली आहे. येस बँक कोणतेही नवीन कर्ज वितरित करण्यास किंवा गुंतवणूक करण्यास सक्षम राहणार नाही. त्याचबरोबर देशाच्या सर्वात मोठ्या बँक एसबीआयच्या संचालक मंडळाने रोकडसंगतीचा सामना करीत येस बँकेत गुंतवणूक करण्यास 'तत्वत: मान्यता' दिली आहे. दरम्यान, आयुष्यभराची जमापुंजी फिक्स्ड डिपॉझिटच्या स्वरुपात बँकेत ठेवली होती. मात्र, आता आपले पैसे परत मिळणार की नाही या चिंतेपोटी खातेदारांची झोप उडाली.