एक्स्प्लोर
Yes Bank | येस बँकेवर निर्बंध, खातेदारांना 50 हजारांपेक्षा जास्त रक्कम काढता येणार नाही
गेल्या दोन ते तीन वर्षांपासून येस बँकेवर कर्जाचा बोजा आहे. बँकेचे बॅलन्सशीटही चुकीच्या पद्धतीने दाखवण्यात आलं आहे अशी माहिती आहे. त्यामुळेच अखेर आरबीआयने येस बँकेवर आर्थिक निर्बंध लादले आहेत. आता बँकेवर प्रशासकाचीही नियुक्ती करण्यात आली आहे.
![Yes Bank | येस बँकेवर निर्बंध, खातेदारांना 50 हजारांपेक्षा जास्त रक्कम काढता येणार नाही RBI Takes Over Yes Bank Board Rs 50,000 Withdrawal Limit For Account Holders Yes Bank | येस बँकेवर निर्बंध, खातेदारांना 50 हजारांपेक्षा जास्त रक्कम काढता येणार नाही](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2020/03/06034053/YES-BANK-AND-RBI.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
नवी दिल्ली : रिझर्व्ह बँकेच्या परवानगीशिवाय येस बँकेतून खातेदारांना 50 हजारापेक्षा जास्त रक्कम काढता येणार नाही. केंद्र सरकारनं तसं परिपत्रकच काढलं आहे. केंद्राच्या या आदेशाची आज संध्याकाळपासून अंमलबजावणी सुरु झाली असून 3 एप्रिलपर्यंत हे निर्बंध कायम राहणार आहेत. आर्थिक संकटातून बाहेर काढण्यासाठी स्टेट बँक ऑफ इंडिया आणि एलआयसी येस बँकेचे शेअर विकत घेऊ शकते. खासगी क्षेत्रातील बँक असलेल्या या येस बँकेवर 30 दिवसांसाठी निर्बंध लादण्यात आले आहेत. आज संध्याकाळपासून सुरु झालेले हे निर्बंध तीन एप्रिल पर्यंत असतील असंही स्पष्ट करण्यात आलं आहे.
एएनआयने दिलेल्या माहितीनुसार येस बँकेवर कर्जाचा बोजा वाढला आहे. त्यामुळे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने या येस बँकेवर निर्बंध लादले आहेत. या बँकेवर कर्जाचा बोजा चांगलाच वाढल्याने रिझर्व्ह बँकेने निर्बंध लादले आहेत. तसेच ग्राहकांना खात्यातून 50 हजार रुपयेच काढता येतील असंही म्हटलं आहे.
आयसीआयसीआय आर्थिक गैरव्यवहार प्रकरण, चंदा कोचर यांना दिलासा देण्यास हायकोर्टाचा नकार
50 हजारांपेक्षा जास्त रक्कम काढायची असल्यास खातेदारांना रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची मंजुरी घ्यावी लागणार आहे.माहितीनुसार, 30 दिवसांसाठी येस बँकेचं संचालक मंडळही निलंबित करण्यात आलं आहे. बँकेवर एसबीआयचे माजी मुख्य आर्थिक अधिकारी प्रशांत कुमार यांची प्रशासक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.Reserve Bank of India: RBI has in consultation with the Central Govt, superseded the Board of Directors of Yes Bank Ltd for a period of 30 days owing to a serious deterioration in the financial position of Bank. Prashant Kumar, ex-DMD & CFO of SBI appointed as the administrator. https://t.co/bBmn5KeekB
— ANI (@ANI) March 5, 2020
'या' दहा बँकांचे होणारे एकत्रिकरण, केंद्रीय मंत्रिमंडळाने दिली मंजुरी
या तीनच कारणासाठी जास्त रक्कम रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने या येस बँकेवर निर्बंध लादले आहेत. मात्र खातेदारांना वैद्यकीय उपचार, विदेशी शिक्षण आणि लग्न या तीन कारणांसाठीच 50 हजारांपेक्षा जास्त रक्कम काढता येईल. मात्र यासाठी आरबीआयची मंजुरी घेणं बंधनकारक असणार आहे.अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
गडचिरोली
राजकारण
क्रिकेट
क्रिकेट
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)