सहा दशकं जंगलात, पुरस्काराचं श्रेय गुरुजन, पत्नी आणि निसर्गाला, पद्मश्री पुरस्कारानंतर मारुती चित्तमपल्ली भावूक
Padma Awards Maruti Chittampally : पद्मश्री पुरस्कार मिळाल्यानंतर पत्नी आणि मुलीच्या आठवणीने अरण्यऋषी मारुती चित्तमपाल्ली भावुक झाल्याचं पाहायला मिळालं.
Padma Awards Maruti Chittampally : मी जवळपास सहा दशकं जंगलामध्ये होतो. माझ्या प्रत्येक प्रवासामध्ये माझ्या पत्नीने मला साथ दिल्याचे मत प्रतिभावंत लेखक, आंतरराष्ट्रीय कीर्तीचे पक्षिशास्त्रज्ञ व वन्यजीव अभ्यासक मारुती चित्तमपल्ली यांनी पद्मश्री पुरस्कार मिळाल्यानंतर व्यक्त केले. पद्मश्री पुरस्कार मिळाल्यानंतर पत्नी आणि मुलीच्या आठवणीने अरण्यऋषी मारुती चित्तमपाल्ली भावुक झाल्याचं पाहायला मिळालं. या पुरस्काराचे श्रेय माझ्या पत्नीचे माझ्या गुरुजनांचे आणि त्या जंगलातील निसर्गाचे असल्याचे चित्तमपल्ली म्हणाले.
पद्मश्री पुरस्कारानंतर मारुती चित्तमपल्ली यांनी मानले सरकारचे आभार
जवळपास 16 प्रकारची जंगल असतात. ते सर्व जंगल अनुभवण्याचे त्यामध्ये राहण्याचे भाग्य मला लाभल्याचे चित्तमपल्ली म्हणाले. आज पद्मश्री पुरस्कार मिळाल्यानंतर मला प्रचंड आनंद होत असल्याचं त्यांनी सांगितलं. मला सरकारनं पद्मश्री पुरस्कार दिल्याने मी सरकारचे आभार व्यक्त करतो. मराठीसाठी एक लाख नवीन शब्द मी दिले आहेत ते लिहून शब्दकोश तयार करण्याचे काम सध्या करत असल्याचं चित्तमपल्ली यांनी सांगितलं. माझ्याकडे 10 हजार पुस्तके जंगलावरची आहेत. मी दररोज ती पुस्तके वाचतो असे चित्तमपल्ली म्हणाले. अरण्य
देशभर संशोधकवृत्तीने भटकंती
मारुती चित्तमपल्ली यांनी वन खात्यात 36 वर्षे सेवा केली आहे. त्या काळात देशभर संशोधकवृत्तीने भटकंती. 5 लाख किमी प्रवास. 13 भाषांचे ज्ञान. त्याद्वारे आदिवासी व इतर जमातींशी संवाद साधत मिळवलेली माहिती. त्या माहितीची नोंद केलेल्या व 30 वर्षे जपून ठेवलेल्या शेकडो डायऱ्या आहेत. डायरीतील नोंदीला शास्त्रीय आधार देत पक्षिकोश, प्राणिकोश व मत्स्यकोशाचे लेखन पूर्ण. अरण्यवाचनासह प्राणी, पक्षी, वनस्पतीची वैशिष्ट्यांसह वन्य जीवन विषद करणारी 25 पेक्षा जास्त पुस्तके लिहिली आहेत. निसर्गातील हा ठेवा समाजाला कळावा या भावनेतून सतत कार्यरत हा सकारात्मक विचाराचा ऊर्जाकोश म्हणजे विख्यात लेखक मारुती चितमपल्ली.
प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला महाराष्ट्रातील 3 जणांना पद्मश्री पुरस्कार जाहीर
प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला केंद्र सरकारकडून पद्म पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. देशातील विविध क्षेत्रात काम करणाऱ्या मान्यवरांना पुरस्कार मिळाले आहेत. यामध्ये महाराष्ट्रात देखील विविध क्षेत्रात मोठं काम करणाऱ्यांना पद्मश्री पुरस्कार मिळाल्याची घोषणा करण्यात आली आहे. यामध्ये नागपूरचे प्रसिद्ध होमिओपॅथ डॉ. विलास डांगरे यांना पद्मश्री पुरस्कार, तसेच प्रतिभावंत लेखक, आंतरराष्ट्रीय कीर्तीचे पक्षिशास्त्रज्ञ व वन्यजीव अभ्यासक मारुती चित्तमपल्ली यांना देखील पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला आहे. त्याचबरोबर वन्यजीव संवर्धन क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल चैत्राम पवार यांना देखील पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला आहे.
महत्वाच्या बातम्या: