Lalit Patil: ड्रगमाफिया ललित पाटील पुणे पोलिसांच्या ताब्यात, न्यायालयाने दिली परवानगी
ललित पाटीलला कोण मदत करत होतं? या प्रकरणात नेमका कोणाकोणाचा समावेश होता. या संदर्भातील सगळी माहिती पुढे येणं गरजेचं आहे. त्यामुळे ललित पाटीलचा ताबा मिळवण्यासाठी पुणे पोलीस प्रयत्न करत होते.

मुंबई : ड्रग्ज माफिया (Drug Case) ललित पाटीलचा (Lalit Patil) ताबा अखेर पुणे पोलिसांना मिळाला. पुणे पोलीस लवकरच ललित पाटीलचा ताबा घेणार आहे. ललित पाटील, शिवाजी शिंदे आणि चौधरी नावाच्या आरोपीचा ताबा पुणे पोलिसांना मिळाला आहे. न्यायालयाने पुणे पोलिसांना परवानगी दिली. ड्रग्ज माफिया ललित पाटीलचा ताबा पुणे पोलिसांना मिळाला आहे. आर्थर रोड जेलमधून पुणे पोलिसांनी ललित पाटीलला ताब्यात घेण्यात आले आहे.
पुणे पोलिसांचा तपास हा ललित पाटीलच्या चौकशीपर्यंत येऊन थांबला आहे. आतापर्यंत ललित पाटील प्रकरणात पुणे पोलिसांनी काहींना अटक केली आहे आणि त्यासोबतच ससूनचादेखील तपास सुरु आहे. मात्र हा तपास पुढे नेण्यासाठी ललित पाटीलचा ताबा पुणे पोलिसांना मिळणं गरजेचं होते. ललित पाटीलला कोण मदत करत होतं? या प्रकरणात नेमका कोणाकोणाचा समावेश होता. या संदर्भातील सगळी माहिती पुढे येणं गरजेचं आहे. त्यामुळे ललित पाटीलचा ताबा मिळवण्यासाठी पुणे पोलीस प्रयत्न करत होते.
पुणे पोलिसांवर गंभीर आरोप
तर दुसरीकडे ललित पाटीलने पुणे पोलिसांवर गंभीर आरोप केले आहे."मला पुणे पोलिसांकडून धोका आहे. त्यांनी मला मारहाण केली होती. पुणे पोलिसांच्या मारहाणीमुळे बरगडी आणि कानामध्ये जखम झाली आहे," असं तो कोर्टात बोलला. तरी देखील न्यायालयाने त्याचा ताबा पुणे पोलिसांना दिला आहे.
रोज नवे खुलासे समोर
ललित पाटील याला ज्यावेळी साकिनाका पोलिसांकडून अटक करण्यात आली होती. त्यावेळीदेखील त्याने मोठे खुलासे केले होता. मी ससूनमधून पळालो नाही मला पळवण्यात आलं आहे, असं तो म्हणाला होता. त्याच्या या दाव्यामुळो मोठी खळबळ उडाली होती. त्यानंतर पुणे पोलीस , येरवडा कारागृह प्रशासन आणि ससून व्यवस्थापक यांच्यावर संशयाची सुई वळली होती. मात्र त्यानंतर या प्रकरणात रोज नवे खुलासे समोर येत आहे. ललित पाटील प्रकरणात त्याला मदत करण्याऱ्यांच्या संख्येत रोज भर पडत आहे.
पोलीस मागावर असताना ललितचा नाशकात मुक्तसंचार
ससून रुग्णालयातून पळ काढल्यानंतर ललित पाटील अनेक दिवस नाशिकमध्येच होता. नाशिक पोलीस, पुणे पोलीस तसेच मुंबई पोलीस मागावर असताना देखील ललित पाटील नाशिकमध्येच कसा? त्याला कोणाचा राजकीय पाठींबा होता का? तपास यंत्रणांच्या शोध कार्याला गती येताच ललित पाटीलनं नाशिकमधून पळ काढला. त्यानंतर इंदोरला गेला, तिथून तो सूरतमध्ये गेला आणि पुन्हा नाशिक धुळे औरंगाबाद करत कर्नाटकात प्रवेश केला. बंगळूरवरून चेन्नईला जात असताना साकीनाका पोलिसांनी ललित पाटीलला अटक केली.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
