(Source: ECI/ABP News/ABP Majha)
डोंबिवलीत आलेले सहा आंतरराष्ट्रीय प्रवासी कोरोनाबाधित, पालिकेनं केला खुलासा
Dombivli Coronavirus Update : कल्याण-डोंबिवलीमध्ये आलेले सहा आंतरराष्ट्रीय प्रवासी कोरोनाबाधित आढळलेले आहेत. हे रुग्ण हायरिस्क देशातील नागरिक नसल्याचा खुलासा पालिकेनं केला आहे.
Dombivli Coronavirus Update : कल्याण-डोंबिवलीमध्ये आलेले सहा आंतरराष्ट्रीय प्रवासी कोरोनाबाधित आढळलेले आहेत. हे रुग्ण हायरिस्क देशातील नागरिक नसल्याचा खुलासा पालिकेनं केला आहे. शनिवारी डोंबिवलीत एका व्यक्तीला ओमायक्रॉन व्हेरियंटची लागण झाल्याचं समोर आलं. यानंतर एकच खळबळ माजली होती.
कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रातील मागील आठ दिवसात आलेल्या 76 प्रवाशांपैकी 6 प्रवाशांना कोरोनाची लागण झाल्याचे निदान झाले आहे . यातील चार प्रवासी नायजेरिया येथून तर एक रशिया आणि एक नेपाळमधून आलेले आहेत. तर अन्य सहा प्रवासी असिमटमॅटिक असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे पालिकेच्या आरोग्य विभागाने सांगितले. यापैकी एकही रुग्ण हा हाय रिस्क कंट्रीमधील नसल्याचे पालिकेच्या आरोग्य विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रात मागील आठ दिवसात 76 प्रवासी आंतरराष्ट्रीय प्रवास करून आले असून या प्रवाशाचा शोध सुरु आहे. एकीकडे हे प्रवासी विलगीकरणात राहण्याऐवजी राज्यभर प्रवास करत प्रशासनाची डोकेदुखी वाढवत असतानाच पत्यावर सापडलेल्या प्रवाशापैकी आतापर्यत 6 प्रवाशांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. शासनाच्या निर्देशानुसार त्यांचे नमुने एन आयव्हीकडे पाठवण्यात आले आहेत. दरम्यान या सर्व 6 पॉझिटिव्ह प्रवाशांना पालिकेच्या विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आलं आहे. सर्वांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती केडीएमसी ने दिली आहे . सुदैवाने यात हायरिस्क देशातून आलेल्या प्रवाशाचा सध्या तरी समावेश नसल्याने पालिकेने काही काळ का होईना सुस्कारा सोडला आहे.
परदेशातून गेल्या काही दिवसात भारतात आलेल्या प्रवाशांपैकी नायजेरियाचे चार प्रवासी, रशियातील एक प्रवासीआणि नेपाळमधील एक प्रवासी असे सहा जण पॉझिटिव आले असून या सहा जणांना संस्थात्मक विलगिकरणात ठेवण्यात आले आहे. (1/2) pic.twitter.com/RDsGaHWpPd
— Kalyan Dombivli Municipal Corporation (@KDMCOfficial) December 4, 2021
कोरोनाची स्थिती काय?
कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात शनिवारी 16 नव्या कोरोना रुग्णांची भर पडली आहे. तर 25 जणांनी कोरोनावर मात केली आहे. 16 नव्या रुग्णांमध्ये कल्याण पूर्ण 1, कल्याण पश्चिम 12 आणि डोंबिवली पूर्व तीन रुग्णांचा समावेश आहे. कल्याण डोंबिवलीमध्ये सध्या 190 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. दिलासादायक बाब म्हणजे शनिवारी कल्याण डोंबिवली महानगरपालिका अंतर्गत क्षेतामध्ये एकाही रुग्णाचा मृत्यू झालेला नाही.
कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात दि. ४ डिसेंबर रोजी आढळून आलेल्या कोरोना बाधित रुग्णांची संख्या! #healthbulletine pic.twitter.com/JP1JupCI7X
— Kalyan Dombivli Municipal Corporation (@KDMCOfficial) December 4, 2021
संबधित बातम्या :
- Omicron : तुम्हाला ओमिक्रॉनची लागण झाल्याचं कसं ओळखणार? जाणून घ्या कसं शोधायचं या नव्या व्हेरियंटला
- Omicron Virus : ओमिक्रॉनशी लढण्याकरता मुंबई सज्ज, पालिका आयुक्तांची ग्वाही
- Omicron : लसीचे दोन्ही डोस न घेणाऱ्या मॉल, रेस्टॉरंटमधील व्यक्तींना 10 हजारांचा दंड लागणार; मुंबई पालिकेचा निर्णय
- Omicron in Gujarat : कर्नाटकापाठोपाठ गुजरातमध्येही ओमायक्रॉनचा शिरकाव, झिम्बाब्वेमधून आलेल्या नागरिकाला लागण
- Omicron : महाराष्ट्रात ओमायक्रॉनचा शिरकाव, डोंबिवलीत आढळला रुग्ण