'देव तारी त्याला कोण मारी', तब्बल 10 तास ड्रेनेज चेंबरमध्ये अडकलेल्या कुत्र्याची सुखरूप सुटका
जवळपास 10 तास ड्रेनेज लाईनमध्ये अडकल्यानंतरही एका कुत्र्याची सुखरुप सुटका झाल्याची आश्चर्यकारक घटना विरारमध्ये अनुभवयाला मिळाली.
विरार : कधी-कधी नशीबाच्या जोरावर एखाद्याची अवघड संकटातून सुटका झाल्याच्या घटना आपण पाहत असतो. असचं काहीसं विरारमध्ये घडलं आहे. शनिवारी (4 नोव्हेंबर) विरार पूर्वेकडील वीर सावरकर रोडवरील लक्ष्मी दर्शन या सोसायटीत एका कुत्र्याला (Dog Rescued) चमत्कारीकरित्या जीवनदान मिळालं. सोसायटीमधील ड्रेनेजच्या उघड्या चेंबरमध्ये अडकलेल्या कुत्र्याची पालिका कर्मचारी आणि प्राणीमित्रांनी सुखरुप सुटका केली. तब्बल 10 तासानंतरही हा कुत्रा सुखरुप बाहेर पडल्यामुळे आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.
नेमक काय घडलं?
विरार पूर्वेकडील (Virar East) वीर सावरकर रोडवरील लक्ष्मी दर्शन या सोसायटीतील ड्रेनेजच्या चेंबरमध्ये सकाळी पाचच्या दरम्यान कुत्रा पडला. कुत्रा जोरजोरात भुंकू लागल्यानंतर तेथील नागरिकांना याबाबत माहिती पडलं. ज्यानंतर प्राणीमित्र संघटनांना याची माहिती मिळाली. प्राणीमिञ संघटनेच्या कार्यकर्त्यांनी (Animal Friends) दुपारी दोन वाजता घटनास्थळी पोहोचून कुत्र्याची स्थिती पाहिली. त्यांनी लगेच वसई विरार महानगरपालिकेच्या अग्निशमन विभागाला (Fire Brigade) बोलावलं. अग्निशमन दलाच्या जवानांनी (Fire man) ड्रेनजचं चेंबर वरील आर.सी.सी. स्लॅब तोडून कुत्र्याला बाहेर काढलं.
कुत्र्याची सुखरुप सुटका
तब्बल 10 तासांच्या परिश्रमानंतर कुत्र्याला वाचवण्यात प्राणीमित्र आणि पालिका कर्मचाऱ्यांना यश आलं अग्निशमन दलाच्या जवानांनी यावेळी विशेष सहकार्य केलं. कुत्र्याला वाचवल्यानंतर प्राणी मित्रांनी त्याला अंघोळही घातली. त्यानंतर कुत्र्याला औषधोपचार करुन त्याला खाऊ-पिऊ देण्यात आलं. तब्बल 10 फुट खोल ड्रेनज लाईनमधून 10 तासानंतरही कुत्रा सुखरुप वाचला.
इतर बातम्या
- सिंधुदुर्गात मच्छिमार आणि व्यावसायिकांमध्ये तुंबळ हाणामारी, 29 जणांवर गुन्हे दाखल
- ज्येष्ठ पत्रकार गिरीश कुबेर यांच्यावर शाईफेक; संभाजी ब्रिगेडचे कृत्य
- "मुंबई में क्या रखा है?"; ममतांच्या दौऱ्यावर आक्षेप घेणाऱ्यांना राऊतांकडून 'त्या' वक्तव्याची आठवण
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha