एक्स्प्लोर

मंत्री बनवल्याने शहाणपण येतं असं नाही, देवेंद्र फडणवीसांचा आदित्य ठाकरेंना टोला

कोरोना पार्श्वभूमीवर राज्यातील परिस्थितीवरुन विधान सभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज ठाकरे सरकारवर सडकून टीका केली. यावेळी शरद पवार यांची संजय राऊत यांनी घेतलेल्या मुलखतीवर देखील त्यांनी भाष्य केलंय.

मुंबई : मंत्री बनवल्याने शहाणपण येतं असं नाही, असा टोला देवेंद्र फडणवीस यांनी आदित्य ठाकरे यांना लगावला. यावेळी नया है वह म्हणत खोचक टीकाही केली. आदित्य ठाकरे यांनी विरोधी पक्षनेते कोरोना पर्यटन करत असल्याची टीका केली होती. या टीकेला फडणवीस यांनी आज प्रत्युत्तर दिलं. ठाकरे सरकार पाडणार असल्याचा कांगावा स्वतः त्यांचेच लोक करत आहेत. कोरोना वर अपयशी ठरल्यामुळे ते लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न करत असल्याची टीका विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. राज्यात खूप चिंताजनक अशी परिस्थिती आहे. एकीकडे कोरोनाचे अॅक्टिव्ह केसेस वाढत आहेत. त्या सोबत मृतांचा आकडा वाढत आहे. हा आकडा 10 हजारांच्या पार गेला आहे. आतापर्यंत देशात जेवढे कोरोना मुळे मृत्यू झालेले आहेत, त्याच्या 46 टक्के एवढे मृत्यू हे महाराष्ट्रात आहे. महाराष्ट्रात खूप मोठ्या प्रमाणात 'अन रजिस्टर डेथ' आहेत, असा आरोपही देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.

आज मुंबईमध्ये कोरोना पॉझिटिव्ह असून ज्यांचा घरात मृत्यू झालेल्या 600 लोकांच्या मृत्यूची नोंद शासनाने अपलोड केलेली नाही. या सोबत 10 एप्रिला मुंबई महापालिकेने 287 कोरोना ग्रस्त हे अन्य रकाण्यात दाखवलेले आहेत. हे अन्य रकाण्यात जाऊ शकत नाहीत, कारण ICMR च्या नियमानुसार जे मृत्यू झालेले आहेत, कोरोना असताना जर अपघात झाला तर अपघाती मृत्यू, कोरोना असताना आत्महत्या केली तर आत्महत्येने मृत्यू अशी नोंद होते. नाहीतर त्या सगळ्याची कोरोना मृत्यूच्या नोंदी करावया लागतील. परंतु, 287 मृत्यू जे इतर कारणांचे दाखवण्यात आले आहेत. ICMR नियमानुसार ते कोरोनाचेच मृत्यू आहेत. त्यामुळे आकड्यांची लपवा लपवी करून देखील इतके मृत्यू वाढत असतील तर खूप काळजी करण्यासारखी परिस्थिती आहे. शासन जेवढी कोरोनाची लपवा लपवी करणार तेवढं आपण कोरोनाचा प्रादूर्भाव थांबवू शकणार नाही, असं फडणवीस म्हणाले.

मुंबईत कोरोना चाचणी वाढवण्याची गरज मुंबईत आजही कोरोनाच्या चाचण्या 5 ते साडेपाच हजारावर जात नाहीत. मुंबईची लोकसंख्या आणि मुंबईत होणारा प्रादुर्भाव याची जर सरासरी पहिली तर 25 ते 30% वाढत आहे. अश्यात जर मुंबईत चाचण्या कमी होतील तर लोकांच्या मृत्यूचे प्रमाण वाढेल. शासनाने संख्या लपवण्यासाठी कोरोनाच्या चाचण्या कमी केल्या आहेत. ही चुकीची पद्धत आहे, असं फडणवीस म्हणाले.

नया है वह..आदित्य ठाकरेंवर टीका देवेंद्र फडणवीस हे राज्याचा दौरा करत आहेत. या दौ ऱ्यावर आदित्य ठाकरे यांनी टीका केली होती. या टीकेला उत्तर देताना फडणवीस म्हणाले, 'नया है वह'. मुख्यमंत्र्यांना जे योग्य वाटतात त्यांना मंत्री बनवता येते, पण मंत्री बनवल्याने शहाणपण येतच असं नाही.

'एक शरद बाकी गारद' हे बाळासाहेबांनीच म्हटलं होतं, फडणवीसांना बेस पक्का करावा लागेल : संजय राऊत

शरद पवार मुलाखत म्हणजे नुरा कुस्ती सध्या सामनामध्ये शरद पवार यांची मुलाखत सुरू आहे. यामध्ये शरद पवार यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या वर टीका केली आहे. या वर बोलताना फडणवीस म्हणाले, ही मुलाखत म्हणजे नुरा कुस्ती आहे. अजून एक दिवस बाकी आहे. तो दिवस झाला की मी त्यावर प्रतिक्रिया देईन. ठाकरे सरकारच्या वतीनेच सरकार पाडण्याच्या अफवा पसरवल्या जात आहेत. कोणीही सरकार पाडत नाही. ते आपणच कांगावा करून सरकार पाडत आहेत, असं वातावरण तयार करत आहेत. स्वतःच्याच मुलाखती घेत आहेत. कोरोनाची परिस्थिती दूर ठेवण्यासाठीचे हे प्रयत्न आहेत, असं फडणवीस म्हणाले. महानायक अमिताभ बच्चन यांच्यासोबत या देशात जे जे कोरोना बाधित झाले आहेत, त्यांची प्रकृती सुधारावी, अशी आम्ही प्रार्थना करतो, असं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

Sanjay Raut | हे मध्य प्रदेश नाही, महाराष्ट्र आहे; कोणताही मुहूर्त काढा, आमचं सरकार 5 वर्ष चालेल : संजय राऊत

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

उत्पन्नची अट ते मुदतवाढ, लाडकी बहिण योजनेत महत्वाचे 7 मोठे बदल
उत्पन्नची अट ते मुदतवाढ, लाडकी बहिण योजनेत महत्वाचे 7 मोठे बदल
पुणे-सोलापूर महामार्गावर टायर फुटल्यानं भीषण अपघात, 4 जणांचा जागीच मृत्यू
पुणे-सोलापूर महामार्गावर टायर फुटल्यानं भीषण अपघात, 4 जणांचा जागीच मृत्यू
आषाढीसाठी पंढरी सज्ज, भंडीशेगावपासून पंढरपूरपर्यंत होणार आकर्षक विद्युत रोषणाई  
आषाढीसाठी पंढरी सज्ज, भंडीशेगावपासून पंढरपूरपर्यंत होणार आकर्षक विद्युत रोषणाई  
Pune Metro : धक्कादायक! पुणे मेट्रो स्थानकात सरकत्या जिन्यावरून उतरताना खाली पडून प्रवाशाचा मृत्यू
धक्कादायक! पुणे मेट्रो स्थानकात सरकत्या जिन्यावरून उतरताना खाली पडून प्रवाशाचा मृत्यू
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Job Majha : इंडियन बँकमध्ये 102 जागांसाठी भरती; विविध पदांसाठी सुवर्ण संधी 02 July 2024Lek Ladki Yojana : लेक लाडकी योजनेपासून कोण वंचित राहणार?TOP 25 : आत्तापर्यंतच्या टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा महाराष्ट्र सुपरफास्ट : 02 July 2024UP Hathras Stampede : भोले बाबाच्या सत्संगादरम्यान चेंगराचेंगरी, 75 पेक्षा अधिक भाविकांचा मृत्यू

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
उत्पन्नची अट ते मुदतवाढ, लाडकी बहिण योजनेत महत्वाचे 7 मोठे बदल
उत्पन्नची अट ते मुदतवाढ, लाडकी बहिण योजनेत महत्वाचे 7 मोठे बदल
पुणे-सोलापूर महामार्गावर टायर फुटल्यानं भीषण अपघात, 4 जणांचा जागीच मृत्यू
पुणे-सोलापूर महामार्गावर टायर फुटल्यानं भीषण अपघात, 4 जणांचा जागीच मृत्यू
आषाढीसाठी पंढरी सज्ज, भंडीशेगावपासून पंढरपूरपर्यंत होणार आकर्षक विद्युत रोषणाई  
आषाढीसाठी पंढरी सज्ज, भंडीशेगावपासून पंढरपूरपर्यंत होणार आकर्षक विद्युत रोषणाई  
Pune Metro : धक्कादायक! पुणे मेट्रो स्थानकात सरकत्या जिन्यावरून उतरताना खाली पडून प्रवाशाचा मृत्यू
धक्कादायक! पुणे मेट्रो स्थानकात सरकत्या जिन्यावरून उतरताना खाली पडून प्रवाशाचा मृत्यू
माझाच्या बातमीचा इम्पॅक्ट ! 24 तासात यंत्रणा कामाला, मनोर वाडा भिवंडी राज्य महामार्गावरील खड्डे बुजवण्यास सुरुवात
माझाच्या बातमीचा इम्पॅक्ट ! 24 तासात यंत्रणा कामाला, मनोर वाडा भिवंडी राज्य महामार्गावरील खड्डे बुजवण्यास सुरुवात
स्वस्त घर पडले महागात! नागरिकांची कोट्यावधीची फसवणूक, एजंटविरोधात गुन्हा दाखल
स्वस्त घर पडले महागात! नागरिकांची कोट्यावधीची फसवणूक, एजंटविरोधात गुन्हा दाखल
Majhi Ladki Bahin : 'मुख्यमंत्री लाडकी बहीण' योजनेत 2 मोठे बदल, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची घोषणा 
Majhi Ladki Bahin : 'मुख्यमंत्री लाडकी बहीण' योजनेत 2 मोठे बदल, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची घोषणा 
पुणे पोर्शे कारप्रकरण, 'लाडोबा'च्या आजोबा आणि बापाला जामीन मंजूर; मात्र  विशाल अग्रवाल कोठडीतच राहणार
पुणे पोर्शे कारप्रकरण, 'लाडोबा'च्या आजोबा आणि बापाला जामीन मंजूर; मात्र विशाल अग्रवाल कोठडीतच राहणार
Embed widget