एक्स्प्लोर

'एक शरद बाकी गारद' हे बाळासाहेबांनीच म्हटलं होतं, फडणवीसांना बेस पक्का करावा लागेल : संजय राऊत

शिवसेना खासदार संजय राऊत यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांची प्रदीर्घ मुलाखत घेतली. एक शरद बाकी गारद' असं या मुलाखतीचं शीर्षक आहे. यावर या मुलाखतीला एक नारद बाकी गारद असं शीर्षक द्यायला हवं होतं, असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं होतं. त्यावर संजय राऊत यांनी उत्तर दिलं आहे.

मुंबई : "देवेंद्र फडणवीस राजकारणात नव्हते, त्याआधी बाळासाहेब ठाकरे यांनी 'एक शरद बाकी गारद' हे म्हटलं होतं. त्यामुळे फडणवीस यांना अभ्यासात थोडा बेस पक्का करावा लागेल," असा प्रतिटोला शिवसेना खासदार संजय राऊत यांनी लगावला आहे. मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी त्यांनी राज्यातील राजकारणासह कुख्यात गुंड विकास दुबेचा एन्काऊंटरवर भाष्य केलं. विकास दुबेच्या एन्काऊंटरवरुन राजकारण करु नये असा सल्लाही त्यांनी दिला.

शिवसेना खासदार संजय राऊत यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांची प्रदीर्घ मुलाखत घेतली. 'एक शरद बाकी गारद' असं शीर्षक असलेल्या मुलाखतीचा प्रोमो दोन दिवसांपूर्वीच शेअर केला होता. यावरुन विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवारांच्या मुलाखतीला 'एक शरद बाकी गारद' ऐवजी, 'एक नारद बाकी गारद' असं शीर्षक द्यायला हवं होतं, असा टोला लगावला. त्याचबरोबर बाकी सर्व गारद असतील, तर उद्धव ठाकरेही गारद आहेत का?' असा प्रश्नही त्यांनी विचारला होता.

शरद पवारांचे नेमके गौप्यस्फोट कोणते? संजय राऊतांनी घेतलेल्या मुलाखतीची उत्सुकता!

'देवेंद्र फडणवीसांना बेस पक्का करावा लागेल' याबाबत विचारलं असता संजय राऊत म्हणाले की,"देवेंद्र फडणवीस राजकारणात नव्हते, त्याआधी शरद पवार यांच्या राजकीय झंझावातावर बाळासाहेब ठाकरे यांनी मार्मिकमध्ये अग्रलेख लिहिला होता, त्याचं हे टायटल आहे. एक शरद बाकी गारद, हे बाळासाहेबांनी म्हटलं होतं त्या काळात. खरंतर बाळासाहेबांनी त्यावेळी दोन शरदांविषयी लिहिलं होतं, दुसरे शरद म्हणजे शरद जोशी. त्यामुळे त्यांनी 'दोन शरद सगळे गारद' असं म्हटलं होतं. आता एक शरद नाहीत, त्यामुळे राहिले एकच शरद. त्यामुळे त्यांना अभ्यासात थोडा बेस पक्का करावा लागेल. हे बाळासाहेबांचं वाक्य आहे, पवारांविषयी म्हटलेलं. तेव्हा ते राजकारणात नव्हते. आम्ही बाळासाहेबांसोबत काम करत होतो."

विकास दुबे एन्काऊंटरचं राजकारण करु नये उत्तर प्रदेशातील कानपूरमध्ये आठ पोलिसांचं हत्याकांड घडवून आणणारा कुख्यात गुंड विकास दुबे आज पोलीस एन्काऊंटरमध्ये ठार झाला. विकास दुबेच्या या एन्काऊंटरवर विरोधक प्रश्नही उपस्थित करत आहेत. त्यावर संजय राऊत म्हणाले की, "विकास दुबेच्या एन्काऊंटरचं कोणीही राजकारण करु नये. एन्काऊंटरवर शंका उपस्थित करणं म्हणजे पोलिसांचं खच्चीकरण करण्यासारखं आहे. खाकी वर्दीची भीती राहिली पाहिले. पोलिसांची भीती राहिली नाही तर गुंडाराज येईल."

महत्त्वाच्या बातम्या

मंदिर सोडून देवच दर्शन देण्यासाठी आले, असा मुख्यमंत्री पुन्हा कधी भेटणे नाही, भाजप आमदाराचं जोरदार भाषण
मंदिर सोडून देवच दर्शन देण्यासाठी आले, असा मुख्यमंत्री पुन्हा कधी भेटणे नाही, भाजप आमदाराचं जोरदार भाषण
ज्ञानेश कुमार माफिया, सिस्टीमचं अपराधीकरण केलं; इंडिया आघाडीच्या बैठकीनंतर संजय राऊत कडाडले, सांगितली पुढील रणनीती
ज्ञानेश कुमार माफिया, सिस्टीमचं अपराधीकरण केलं; इंडिया आघाडीच्या बैठकीनंतर संजय राऊत कडाडले, सांगितली पुढील रणनीती
मोठी बातमी : 4 कोटींची लँड क्रुझर, 32 इनोव्हा, 2 फॉर्च्युनर, राज्य सरकारकडून नव्या कोऱ्या 44 गाड्यांच्या खरेदीचा निर्णय!
मोठी बातमी : 4 कोटींची लँड क्रुझर, 32 इनोव्हा, 2 फॉर्च्युनर, राज्य सरकारकडून नव्या कोऱ्या 44 गाड्यांच्या खरेदीचा निर्णय!
Contractors: शासनानं तब्बल 96 हजार कोटी थकवले; दहा महिन्यात नऊ कंत्राटदारांनी आयुष्य संपवलं; आता राज्य कंत्राटदार महासंघाचा एल्गार, राज्यभरातील जिल्हाधिकारी कार्यालयांवर धडकणार
शासनानं तब्बल 96 हजार कोटी थकवले; दहा महिन्यात नऊ कंत्राटदारांनी आयुष्य संपवलं; आता राज्य कंत्राटदार महासंघाचा एल्गार, राज्यभरातील जिल्हाधिकारी कार्यालयांवर धडकणार

व्हिडीओ

Rahul Gandhi Special Report : राहुल गांधींनी धक्का दिल्याचा महिला पत्रकाराचा आरोप; भाजपाचा हल्लाबोल
BJP Vs India Aghadi Special Report : इंडिया आघाडीच्या मोर्चावरून राजकीय वाद, दोन गुन्हे दाखल
Shetitil Navdurga | Bharti Nirgude | घरात संकट होतं, पण शेतात तिची हिंमत पिकत होती!
India Alliance Supreme Court Morcha : विरोधकांची 'सुप्रीम' धाव; कुणाकुणावर घाव? | Special Report ABP Majha
Abhijeet Dipke vs Delhi Police : दिपके, पोलीस भिडले; कोण कुणाला नडले? | Special Report ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
PHOTO : MPSC आंदोलन गाजवणारा विवेकानंद पाटील कोल्हापुरात, मूळ गावी जंगी स्वागत
MPSC आंदोलन गाजवणारा विवेकानंद पाटील कोल्हापुरात, मूळ गावी जंगी स्वागत
सोशल मीडियावर बेडशीटची विक्री, सायबर फसवणुकीचा नवा फंडा; 1 कोटीची फसवणूक, दोन घटनांत तिघांना अटक
सोशल मीडियावर बेडशीटची विक्री, सायबर फसवणुकीचा नवा फंडा; 1 कोटीची फसवणूक, दोन घटनांत तिघांना अटक
काम आपण करतो, पण ज्ञानेश कुमारांच्या कृपेने दुसरेच निवडून येतात; शर्मिला ठाकरेंचा निवडणूक आयुक्तांवर हल्लाबोल
काम आपण करतो, पण ज्ञानेश कुमारांच्या कृपेने दुसरेच निवडून येतात; शर्मिला ठाकरेंचा निवडणूक आयुक्तांवर हल्लाबोल
'चीन लडाखला केंद्रशासित प्रदेश म्हणून मान्यता देत नाही..' लडाखमधील 28 ठिकाणांवर दावा; गोगरा-हॉट स्प्रिंगचाही समावेश, जिथं 2020 मध्ये दोन्ही देशांच्या सैन्यांमध्ये घनघोर संघर्ष
'चीन लडाखला केंद्रशासित प्रदेश म्हणून मान्यता देत नाही..' लडाखमधील 28 ठिकाणांवर दावा; गोगरा-हॉट स्प्रिंगचाही समावेश, जिथं 2020 मध्ये दोन्ही देशांच्या सैन्यांमध्ये घनघोर संघर्ष
L Murugan Resignation : मोठी बातमी! मोदींच्या कॅबिनेटमधील मंत्र्याचा राजीनामा, राज्यसभेचे खासदारपदही सोडलं, विरोधकांनी घेरलं असताना दिल्लीत मोठी घडामोड
मोठी बातमी! मोदींच्या कॅबिनेटमधील मंत्र्याचा राजीनामा, राज्यसभेचे खासदारपदही सोडलं, विरोधकांनी घेरलं असताना दिल्लीत मोठी घडामोड
पुण्यात IT अभियंता महिलेनं संपवलं जीवन, चिठ्ठीत लिहला सासरच्याकडून होणारा त्रास; पतीसह 5 जणांविरुद्ध गुन्हा दाखल
पुण्यात IT अभियंता महिलेनं संपवलं जीवन, चिठ्ठीत लिहला सासरच्याकडून होणारा त्रास; पतीसह 5 जणांविरुद्ध गुन्हा दाखल
ज्ञानेश कुमार माफिया, सिस्टीमचं अपराधीकरण केलं; इंडिया आघाडीच्या बैठकीनंतर संजय राऊत कडाडले, सांगितली पुढील रणनीती
ज्ञानेश कुमार माफिया, सिस्टीमचं अपराधीकरण केलं; इंडिया आघाडीच्या बैठकीनंतर संजय राऊत कडाडले, सांगितली पुढील रणनीती
Cyberattack on Refrigeration: फ्रान्समधील शेकडो सुपरमार्केटच्या रेफ्रिजरेशन प्रणालीवर सायबर हल्ला; फ्रीझर तापमान 50 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचून आगीचा भडका
फ्रान्समधील शेकडो सुपरमार्केटच्या रेफ्रिजरेशन प्रणालीवर सायबर हल्ला; फ्रीझर तापमान 50 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचून आगीचा भडका, अनेक दुकानांमध्येही आगीचा भडका
Embed widget