एक्स्प्लोर
दीपिका-रणवीरच्या लग्नाचं 28 नोव्हेंबरला मुंबईत ग्रॅण्ड रिसेप्शन
लग्नासाठी ही जोडी इटलीला रवाना झाली आहे. 14 आणि 15 नोव्हेंबर लग्न झाल्यानंतर भारतात दोन रिसेप्शन पार्टी होणार आहेत.

मुंबई : अभिनेता रणवीर सिंह आणि अभिनेत्री दीपिका पादूकोण यांच्या लग्नाची तयारी जोरदार सुरु आहे. 14-15 नोव्हेंबरला दोघे लग्नाच्या बंधनात अडकतील. या ग्रॅण्ड वेडिंगनंतर दोघांची बंगळुरु आणि मुंबईत रिसेप्शन पार्टी होणार आहे. या दोघांच्या लग्नाचं रिसेप्शन कार्ड समोर आलं आहे. लग्नासाठी ही जोडी इटलीला रवाना झाली आहे. 14 आणि 15 नोव्हेंबर लग्न झाल्यानंतर भारतात दोन रिसेप्शन पार्टी होणार आहेत. 21 नोव्हेंबरला बंगळुरुला रिसेप्शन होणार असून तिच्या आई-वडिलांनी ही पार्टी आयोजित केली आहे. तर 28 नोव्हेंबरला मुंबईतील हॉटेल ग्रँड हयातमध्ये दुसरी रिसेप्शन पार्टी होईल, जी रणवीरच्या आई-वडिलांनी आयोजित केली आहे.
दीपिकाने स्वतःसाठीच खरेदी केलं मंगळसूत्र, किंमत... रणवीर सिंह आणि दीपिका पादूकोण 14 ते 15 नोव्हेंबर रोजी इटलीच्या "लेक कोमो" इथे लग्न करणार आहेत. हे जगातील सर्वात लोकप्रिय वेडिंग डेस्टिनेशनपैकी एक आहे. रणवीर आणि दीपिका गेल्या पाच वर्षांपासून एकमेकांना डेट करत आहेत. या दोघांची प्रेम कहाणी संजय लीला भन्साळी यांच्या 'गोलियों की रासलीला : रामलीला' या सिनेमाच्या शूटिंगदरम्यान सुरु झाली होती. सेटवर काम करताना दोघे कधी एकमेकांच्या प्रेमात पडले हे त्यांनाही कळलं नाही. लग्नानंतर रणवीर राहणार दीपिकाच्या घरी दीपिका आणि रणवीर यांचा पहिला सिनेमा 'रामलीला' 15 नोव्हेंबर 2013 ला प्रदर्शित झाला होता. त्यामुळे ही तारीख दोघांसाठी खास आहे. या सिनेमापासूनच त्यांच्या नात्याची सुरुवात झाली होती. याशिवाय रामलीला सिनेमाला पाच वर्षही पूर्ण होत आहेत. अशा रितीने पहिल्या भेटीची आठवण म्हणून हे दोघे 15 नोव्हेंबरला विवाह करत असल्याचे अंदाज बांधले जात आहेत.
दीपिकाने स्वतःसाठीच खरेदी केलं मंगळसूत्र, किंमत... रणवीर सिंह आणि दीपिका पादूकोण 14 ते 15 नोव्हेंबर रोजी इटलीच्या "लेक कोमो" इथे लग्न करणार आहेत. हे जगातील सर्वात लोकप्रिय वेडिंग डेस्टिनेशनपैकी एक आहे. रणवीर आणि दीपिका गेल्या पाच वर्षांपासून एकमेकांना डेट करत आहेत. या दोघांची प्रेम कहाणी संजय लीला भन्साळी यांच्या 'गोलियों की रासलीला : रामलीला' या सिनेमाच्या शूटिंगदरम्यान सुरु झाली होती. सेटवर काम करताना दोघे कधी एकमेकांच्या प्रेमात पडले हे त्यांनाही कळलं नाही. लग्नानंतर रणवीर राहणार दीपिकाच्या घरी दीपिका आणि रणवीर यांचा पहिला सिनेमा 'रामलीला' 15 नोव्हेंबर 2013 ला प्रदर्शित झाला होता. त्यामुळे ही तारीख दोघांसाठी खास आहे. या सिनेमापासूनच त्यांच्या नात्याची सुरुवात झाली होती. याशिवाय रामलीला सिनेमाला पाच वर्षही पूर्ण होत आहेत. अशा रितीने पहिल्या भेटीची आठवण म्हणून हे दोघे 15 नोव्हेंबरला विवाह करत असल्याचे अंदाज बांधले जात आहेत. आणखी वाचा























