एक्स्प्लोर

मनसेचे नगरसेवकच आमच्याकडून हप्ता घेतात : फेरीवाला संघटना

डोंबिवलीत मनसे नगरसेवक राहुल चितळे आणि केडीएमसीतील विरोधी पक्षनेते मंदार हळबे फेरीवाल्यांकडून हप्ते घेतात. असा गंभीर आरोप फेरीवाला संघटनेने केला आहे.

डोंबिवली : डोंबिवलीत मनसे नगरसेवक राहुल चितळे आणि केडीएमसीतील विरोधी पक्षनेते मंदार हळबे फेरीवाल्यांकडून हप्ते घेतात. असा गंभीर आरोप फेरीवाला संघटनेने केला आहे. याबाबतचे पुरावे आपल्याकडे उपलब्ध असून राज ठाकरे आता यांच्यावर कारवाई करणार का असा सवालही फेरीवाला संघटनेनं उपस्थित केला आहे. मागील काही दिवसांपासून सुरु असलेलं मनसेचं आंदोलन आणि त्यानंतर पालिकेनं फेरीवाल्यांवर सुरु केलेली कारवाई, याविरोधात डोंबिवलीतले फेरीवाले एकवटले असून त्यांनी आज (मंगळवार) मेळावा घेतला. या मेळाव्यात त्यांनी मनसेच्या नगरसेवकांवरच सनसनाटी आरोप केले. ‘डोंबिवली रेल्वे स्थानकाच्या परिसरात आधी मनसेचे नगरसेवक राहुल चितळे आणि आता विद्यमान विरोधी पक्षनेते मंदार हळबे हे फेरीवाल्यांकडून हप्ते घेतात. याबाबतचे पुरावेही आपल्याकडे उपलब्ध असून राज ठाकरे हे त्यांच्या नगरसेवकांवर आता कारवाई करणार का?’ असा सवाल विचारत  फेरीवाल्यांनी आता मनसेला आव्हान दिलं आहे. दरम्यान, यावेळी त्यांनी पालिकेतील फेरीवाला विरोधी पथकावरही त्यांनी टिका केली. या पथकात नेमणूक होण्यासाठी पालिकेत एक ते दीड लाखाचा रेट सुरु असल्याचं त्यांनी सांगितलं. कारण खालपासून वरपर्यंत सगळेच फेरीवाल्यांकडून हप्ते घेतात. असा आरोप फेरीवाल्यांचा आहे. दुसरीकडे या आरोपांनंतर केडीएमसीतील मनसेचे विरोधी पक्षनेते मंदार हळबे यांनी मात्र हे सारे आरोप फेटाळून लावले आहेत. मनसेचं आंदोलन एलफिन्स्टन दुर्घटनेनंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी अनधिकृत फेरीवाल्यांना हटवण्याची मागणी रेल्वे आणि प्रशासनाकडे केली होती. त्यासाठी त्यांनी 15 दिवसांचा अल्टिमेटम दिला होता. मात्र तरीही फेरीवाले न हटल्याने मनसे कार्यकर्ते मुंबईसह उपनगरातील फेरीवाल्यांना हुसकावून लावत आहेत. संबंधित बातम्या : निरुपमांच्या घराबाहेर भाज्यांच्या गाड्या लावून मनसेचं आंदोलन अवैध फेरीवाल्यांना हटवणाऱ्या मनसे कार्यकर्त्यांची धरपकड सुरु जैसी करनी, वैसी भरनी, संजय निरुपम यांचं मनसेला प्रत्युत्तर राज ठाकरेंनी घेतली मनसे विभाग अध्यक्ष सुशांत माळवदेंच्या भेट  … तर तुम्हालाही मार खावाच लागणार : संजय निरुपम

मनसे नेते संदीप देशपांडे पोलिसांच्या ताब्यात

दादरमध्ये मनसेकडून फेरीवाल्यांच्या स्टॉलची तोडफोड मालाडमध्ये फेरीवाल्यांचा मनसे कार्यकर्त्यांवर जीवघेणा हल्ला  फेरीवाल्यांचा मनसे कार्यकर्त्यांवर जीवघेणा हल्ला, आतापर्यंत काय काय झालं? नितेश राणेंचा मराठी ‘स्वाभिमान’ जागा, मनसेला पाठिंबा

महत्त्वाच्या बातम्या

Bhiwandi Building Collapses: भिवंडीत पत्त्यांसारखी चार मजली इमारत कोसळली; 4 जणांचा मृत्यू, 2 ते 3 जण अडकल्याची भीती, यंत्रणेला घटनास्थळी पोहोचण्यासाठी जूनी चाळ तोडावी लागली
भिवंडीत पत्त्यांसारखी चार मजली इमारत कोसळली; 4 जणांचा मृत्यू, 2 ते 3 जण अडकल्याची भीती, यंत्रणेला घटनास्थळी पोहोचण्यासाठी जूनी चाळ तोडावी लागली
Tukaram Munde FDA News: सुट्टीच्या दिवशीही काम, FDA च्या 29 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची तक्रार; तुकाराम मुंढेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
सुट्टीच्या दिवशीही काम, FDA च्या 29 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची तक्रार; तुकाराम मुंढेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
Maharashtra Rain: राज्यभरात पावसाचं थैमान सुरूच! पुढचे 24 तास अतिमहत्वाचे, हवामान विभागाकडून 'या' जिल्ह्यांना अलर्ट जारी, वाचा चांदा ते बांदा पावसाची खबरबात!
राज्यभरात पावसाचं थैमान सुरूच! पुढचे 24 तास अतिमहत्वाचे, हवामान विभागाकडून 'या' जिल्ह्यांना अलर्ट जारी, वाचा चांदा ते बांदा पावसाची खबरबात!
Shivsena Name And Symbol Hearing In Supreme Court: हे सर्व फक्त आमदार, राजकीय पक्ष नाही; शिंदे सरकार स्थापन झालेच नसते; कपील सिब्बल यांचा जोरदार युक्तिवाद, शिवसेना पक्ष आणि चिन्ह प्रकरणाच्या अंतिम सुनावणीत काय काय घडलं?
हे सर्व फक्त आमदार, राजकीय पक्ष नाही; शिंदे सरकार स्थापन झालेच नसते; कपील सिब्बल यांचा जोरदार युक्तिवाद, शिवसेना पक्ष आणि चिन्ह प्रकरणाच्या अंतिम सुनावणीत काय काय घडलं?

व्हिडीओ

Bhiwandi Building Collapses: भिवंडीत पत्त्यांसारखी चार मजली इमारत कोसळली; 5 ते 6 जण अडकल्याची भीती
Auto Rickshaw Driver Marathi : रिक्षा...आणि मराठीची बाराखडी, उरले फक्त 2 आठवडे Special Report
Amit Shah vs Rahul Gandhi Pellet Gun : 'कुठे आहेत गृहमंत्री?' प्रश्नांची सरबत्ती Special Report
Girish Mahajan Audio Clip Eknath Khadse Raksha Khadse : क्लिप गावभर, आपत्ती चव्हाट्यावर | ABP Majha Special Report
Ramdev Baba on Gen Z : जेन झींचं आंदोलन, रामदेव बाबांचं 'टीकासन' | ABP Majha Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Vidarbha Rain: विदर्भात पावसाचा हाहाकार! अमरावतीच्या नांदगाव खंडेश्वरमध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस, यवतमाळच्या पुरात कारसह तीनजण वाहून गेलीत, अनेक गावांचा संपर्क तुटला
विदर्भात पावसाचा हाहाकार! अमरावतीच्या नांदगाव खंडेश्वरमध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस, यवतमाळच्या पुरात कारसह तीनजण वाहून गेलीत, अनेक गावांचा संपर्क तुटला
Bhiwandi Building Collapses: भिवंडीत पत्त्यांसारखी चार मजली इमारत कोसळली; 4 जणांचा मृत्यू, 2 ते 3 जण अडकल्याची भीती, यंत्रणेला घटनास्थळी पोहोचण्यासाठी जूनी चाळ तोडावी लागली
भिवंडीत पत्त्यांसारखी चार मजली इमारत कोसळली; 4 जणांचा मृत्यू, 2 ते 3 जण अडकल्याची भीती, यंत्रणेला घटनास्थळी पोहोचण्यासाठी जूनी चाळ तोडावी लागली
Maharashtra Rain: राज्यभरात पावसाचं थैमान सुरूच! पुढचे 24 तास अतिमहत्वाचे, हवामान विभागाकडून 'या' जिल्ह्यांना अलर्ट जारी, वाचा चांदा ते बांदा पावसाची खबरबात!
राज्यभरात पावसाचं थैमान सुरूच! पुढचे 24 तास अतिमहत्वाचे, हवामान विभागाकडून 'या' जिल्ह्यांना अलर्ट जारी, वाचा चांदा ते बांदा पावसाची खबरबात!
PM Modi: पेपरफुटीविरोधात कायदा मंजूर करताच पीएम मोदींचा आणखी एक सेल्फी कॅमेऱ्यातून व्हिडिओ; म्हणाले, 'मित्रांनो, ‘विकसित भारता’चे स्वप्न साकार करण्यासाठी..'
पेपरफुटीविरोधात कायदा मंजूर करताच पीएम मोदींचा आणखी एक सेल्फी कॅमेऱ्यातून व्हिडिओ; म्हणाले, 'मित्रांनो, ‘विकसित भारता’चे स्वप्न साकार करण्यासाठी..'
'आता माझा रोल बदललाय..' स्वस्त समोस्यासाठी संसदेत आवाज उठवणारे राघव चड्ढा पहिल्यांदाच देशव्यापी विद्यार्थी आक्रोशावर बोलले; मोदींचे कौतुक करत काय काय म्हणाले?
'आता माझा रोल बदललाय..' स्वस्त समोस्यासाठी संसदेत आवाज उठवणारे राघव चड्ढा पहिल्यांदाच देशव्यापी विद्यार्थी आक्रोशावर बोलले; मोदींचे कौतुक करत काय काय म्हणाले?
Public Examinations (Prevention of Unfair Means) Act: राज्यसभेतही पेपरफुटी विधेयक मंजूर, विरोधकांचा सभात्याग; राष्ट्रपतींच्या मुंजरीनंतर कायद्यात रुपांतर होणार
राज्यसभेतही पेपरफुटी विधेयक मंजूर, विरोधकांचा सभात्याग; राष्ट्रपतींच्या मुंजरीनंतर कायद्यात रुपांतर होणार
मग तुमच्या टोळीच्या बॉसने चार वर्षांपूर्वी दोन वर्षांत रस्ते खड्डे मुक्त होतील सांगितलं होतं, त्याचं काय झालं? मुंबईमधील कारभाऱ्यांच्या ‘इनोव्हा क्रिस्टा’ नादावर आदित्य ठाकरेंचा खोचक सवाल
मग तुमच्या टोळीच्या बॉसने चार वर्षांपूर्वी दोन वर्षांत रस्ते खड्डे मुक्त होतील सांगितलं होतं, त्याचं काय झालं? मुंबईमधील कारभाऱ्यांच्या ‘इनोव्हा क्रिस्टा’ नादावर आदित्य ठाकरेंचा खोचक सवाल
भाजपला तो शब्द खटकला; खासदार अनुराग ठाकूरांकडून राहुल गांधींविरुद्ध हक्कभंग, संसदीय भाषेचा दिला दाखला
भाजपला तो शब्द खटकला; खासदार अनुराग ठाकूरांकडून राहुल गांधींविरुद्ध हक्कभंग, संसदीय भाषेचा दिला दाखला
Embed widget