एक्स्प्लोर
Advertisement
बॅट क्रिकेटसाठी, हाणामारीसाठी नाही, कोर्टाने दरडावलं
मुंबई : बॅट ही क्रिकेट खेळण्यासाठी आहे, हाणामारी करण्यासाठी नाही, असे मुंबई हायकोर्टाने दोन गटातील हाणामारी प्रकरणी झालेल्या सुनावणीदरम्यान निक्षून सांगितलं. हाणामारी करणाऱ्यांना सेवाभावी संस्थेला मदत करण्याचे आदेश हायकोर्टाने दिले आहेत.
मानखुर्द येथे गेल्या वर्षी 9 जानेवारीला क्रिकेट मॅच खेळताना वाद झाला होता. हा वाद विकोपाला गेला आणि दोन्ही गटातील तरुणांमध्ये हाणामारी झाली. काही तरुणांनी एकमेकांना बॅटने मारलं. यात 4 तरुण गंभीर जखमी झाले. दोन्ही गटातील तरूणांनी एकमेकांविरोधात पोलिसांत तक्रार केली. नंतर या दोन्ही गटातील वाद सामोपचराने मिटला. त्यामुळे पोलीस तक्रार झालेल्या 15 तरुणांनी ही तक्रार रद्द करण्यासाठी न्यायालयात धाव घेतली.
न्या. अभय ओक व न्या. अमजद सय्यद यांच्या खंडपीठासमोर या याचिकेवर सुनावणी झाली. त्यात न्यायालयाने 'बॅट ही क्रिकेट खेळण्यासाठी असून हाणामारीसाठी नाही' असं मत व्यक्त केलं. बॅटने हाणामारी करणाऱ्यांचा गुन्हा विनंती केल्यावर तात्काळ रद्द केल्यास, समाजात चुकीचा संदेश जाईल.
भविष्यात बॅटने अशाप्रकारे हाणामारी करणार नाही, यासाठी याचिकाकर्त्यांनी सेवाभावी संस्था अथवा पोलीस कल्याण मंडळाला निधी द्यावा व त्याची माहिती न्यायालयाला द्यावी. त्यानंतरच तक्रार रद्द केली जाईल, असे स्पष्ट करत न्यायालयाने ही सुनावणी येत्या 25 जूनपर्यंत पुढे ढकलली.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
भविष्य
क्रिकेट
सोलापूर
Advertisement