एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Coronavirus | कोरोनोमुळे मध्य रेल्वेच्या 23 तर पश्चिम रेल्वेच्या 10 गाड्या रद्द
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मध्य रेल्वेने देखील मोठा निर्णय घेतला आहे. मुंबई, पुणे, नागपूर, भुसावळ अशा शहरांना जोडणाऱ्या एकूण 23 गाड्या रद्द केल्या असल्याची माहिती देण्यात आली आहे.
मुंबई : कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत चालल्याने सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेवर मोठा परिणाम होत आहे. दरम्यान कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मध्य रेल्वेने देखील मोठा निर्णय घेतला आहे. मुंबई, पुणे, नागपूर, भुसावळ अशा शहरांना जोडणाऱ्या एकूण 23 गाड्या रद्द केल्या असल्याची माहिती देण्यात आली आहे. यामध्ये राजधानी एक्सप्रेसचा देखील समावेश आहे. सोबत डेक्कन एक्सप्रेस, प्रगती एक्सप्रेस, हावडा दुरांतो, नंदीग्राम एक्सप्रेस देखील रद्द करण्यात आली आहे.
या गाड्या झाल्या रद्द (कंसात रद्द झालेल्या वेळा)
मुंबई-पुणे डेक्कन एक्सप्रेस (19 मार्च ते 31 मार्च)
पुणे मुंबई डेक्कन एक्सप्रेस (18 मार्च ते 30 मार्च)
एलटीटी-अजनी एक्सप्रेस (23 मार्च ते 30 मार्च)
अजनी एलटीटी एक्सप्रेस (20 ते 27 मार्च)
एलटीटी निजमाबाद एक्सप्रेस (21 ते 28 मार्च)
निजामाबाद एलटीटी एक्सप्रेस (22 ते 29 मार्च)
नागपूर रेवा एक्सप्रेस (25 मार्च)
मुंबई- नागपूर नंदीग्राम एक्सप्रेस (23 मार्च ते 1 एप्रिल )
नागपूर मुंबई नंदीग्राम एक्सप्रेस (22 ते 31 मार्च)
पुणे नागपूर एक्सप्रेस ( 26 मार्च ते 2 एप्रिल)
नागपूर पुणे एक्सप्रेस (20 मार्च आणि 27 मार्च)
पुणे अजनी एक्सप्रेस (21 मार्च आणि 28 मार्च)
अजनी पुणे एक्सप्रेस (22 आणि 29 मार्च)
एलटीटी मनमाड एक्सप्रेस (18 ते 31 मार्च)
पुणे मुंबई प्रगती एक्सप्रेस (18 ते 31 मार्च)
मुंबई पुणे प्रगती एक्सप्रेस (19 मार्च ते 1 एप्रिल)
भुसावळ नागपूर एक्सप्रेस (18ते 29 मार्च)
नागपूर भुसावळ एक्सप्रेस (19 ते 30 मार्च)
कलबुर्गी सिकंदराबाद एक्सप्रेस (18 ते 31 मार्च)
हावडा मुंबई दुरंतो एक्सप्रेस (24 आणि 31 मार्च)
मुंबई हावडा दुरंतो एक्सप्रेस (25 मार्च आणि 1 एप्रिल)
सीएससमटी निजामुद्दीन एक्सप्रेस (20, 23, 27 आणि 30 मार्च)
निजामुद्दीन सीएसएमटी एक्सप्रेस (21, 24, 26 आणि 31 मार्च)
पश्चिम रेल्वेच्याही 10 गाड्या रद्द
मुंबई सेंट्रल-इंदौर दुरंतो एक्सप्रेस- 21, 26, 28 मार्च
इंदौर-मुंबई सेंट्रल दुरंतो एक्सप्रेस - 22, 27,29 मार्च
बांद्रा टर्मिनस-जामनगर हमसफर एक्सप्रेस - 21, 23, 25, 28 , 30 मार्च
जामनगर-बांद्रा टर्मिनस हमसफर एक्सप्रेस- 22, 24, 26, 29, 31 मार्च
मुंबई सेंट्रल-जयपुर दुरंतो एक्सप्रेस - 22, 24, 29, 31 मार्च
जयपुर-मुंबई सेंट्रल दुरंतो एक्सप्रेस - 24, 26, 31 मार्च, 2 एप्रिल
मुंबई सेंट्रल-नवी दिल्ली दुरंतो एक्सप्रेस 23, 27,30 मार्च
नवी दिल्ली-मुंबई सेंट्रल दुरंतो एक्सप्रेस - 21, 24, 28, 31 मार्च
इंदौर-पुरी हमसफर एक्सप्रेस - 21, 28 मार्च
पुरी-इंदौर हमसफर एक्सप्रेस - 25 मार्च आणि 1 एप्रिल
पश्चिम रेल्वेनं वाढवलं प्लॅटफॉर्म तिकिट
प्लॅटफॉर्मवरील वाढती गर्दी रोखण्यासाठी आता पश्चिम रेल्वेने एक पाऊल उचललं आहे. पश्चिम रेल्वेने काही स्थानकांवर प्लॅटफॉर्मवरील तिकीट 10 रुपयांवरून थेट 50 रुपये करण्यात आलं आहे. हा नियम केवळ त्याच स्थानकांवर लागू होईल ज्या स्थानकांवर गर्दीचं प्रमाण जास्त आहे. पुढील काही दिवसांसाठी हा नियम लागू करण्यात आला आहे.
पश्चिम रेल्वेच्या जनसंपर्क अधिकारी रविंद्र भाकर यांनी म्हटलं आहे की प्रत्येक विभागातील 10 ते 15 रेल्वे स्थानकांवर गर्दीचं प्रमाण जास्त आहे आणि केवळ त्याच स्थानकांवर हा नियम लागू करण्यात आला आहे. सोबतच रेल्वे स्थानकांवर अस्वच्छता पसरवणाऱ्यांच्या दंडातही वाढ करण्यात आली आहे. लोकांनी गरज असल्यावरच प्रवास करावं असाही सल्ला शासनाकडून दिला जात आहे.
Coronavirus | मुंबई लोकल ट्रेन बंद करण्याचा निर्णय मुख्यमंत्री घेणार : राजेश टोपे
Coronavirus | असंवेदनशीलता... रुग्णालयात कोरोनाचे पेशंट असल्याने विष प्यायलेल्या तरुणाला उपचारासाठी नेण्यास नकार, तरुणाचा उपचाराविना मृत्यू
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
जॅाब माझा
राजकारण
करमणूक
राजकारण
Advertisement