एक्स्प्लोर

Shinde Samiti: शिंदे समितीचा धडाका; राज्यात आतापर्यंत 48 लाख कुणबी नोंदी आढळल्या, 'इतक्या' मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र प्रदान, मंत्रिमंडळ बैठकीत माहिती समोर

Shinde Samiti: बैठकीत मराठा समाजाशी संबंधित विविध मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली, त्याचबरोबर शिफारशींच्या अंमलबजावणीसंदर्भात पुढील दिशा निश्चित करण्यावर भर देण्यात आला.

मुंबई : मराठा समाजाच्या सामाजिक, शैक्षणिक व आर्थिक स्थितीचा आढावा घेऊन संबंधित शिफारशींवर पुढील कार्यवाही ठरवण्यासाठी महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळ उपसमितीची बैठक गुरुवारी (५ मार्च २०२६) सायंकाळी पाच वाजता विधानभवनात पार पडली. बैठकीत मराठा समाजाशी संबंधित विविध मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली, शिफारशींच्या अंमलबजावणीसंदर्भात पुढील दिशा निश्चित करण्यावर भर देण्यात आला.

- मा.न्या. संदीप शिंदे समितीने कामकाज सुरू केल्यापासून राज्यामध्ये ४८ लाख कुणबी नोंदी आढळलेल्या असून त्याआधारे एकूण १२,११,३०३ कुणबी प्रमाणपत्रे प्रदान करण्यात आलेली आहेत. त्यापैकी छत्रपती संभाजीनगर विभागामध्ये २,५७,०८४ प्रमाणपत्रे प्रदान करण्यात आलेली आहेत. सप्टेंबर २०२४ ते फेब्रुवारी २०२६ अखेर ६ महिन्यांच्या कालावधीत छत्रपती संभाजीनगर विभागात एकूण ४९,९५८ कुणबी प्रमाणपत्रे देण्यात आलेली आहेत. केवळ बीड जिल्ह्यात ३४,६९२ कुणबी प्रमाणपत्रे देण्यात आलेली आहेत.

- मराठा समाजाला आरक्षण देणारा कायदा व हैदराबाद गॅझेटियरची अंमलबजावणी करणाऱ्या शासन निर्णयाविरुद्धच्या न्यायालयीन याचिकांचा आढावा मंत्रिमंडळ उपसमितीने घेऊन विशेष समुपदेशी (Special Counsel) नियुक्त करण्याबाबत निर्देश दिले आहेत.

- सातारा गॅझेटियर लागू करण्याबाबत मंत्रिमंडळ समितीने विभागीय आयुक्त, पुणे यांना अहवाल सादर करण्याबाबत निर्देश दिले.

- मराठा आरक्षण आंदोलन दरम्यान दाखल झालेल्या एकूण १६१ गुन्ह्यांपैकी केवळ ७१ गुन्हे मागे घेणे प्रलंबित आहेत तर मुंबई येथील आंदोलन दरम्यान दाखल ८ गुन्ह्यांपैकी ७ गुन्हे मागे घेण्यात आलेले आहेत.

- मराठा आरक्षण आंदोलन दरम्यान मृत्युमुखी पडलेल्या ३०६ व्यक्तींपैकी २७५ व्यक्तींच्या वारसांना १० लाख रुपये अर्थसहाय्य मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून देण्यात आले आहे. ३१ प्रलंबित प्रकरणांमध्ये तात्काळ कार्यवाही करण्याबाबत मंत्रिमंडळ उपसमितीने निर्देश दिले आहेत. तसेच मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तींच्या २१ वारसांना राज्य परिवहन महामंडळामध्ये अनुकंपा तत्त्वावर नोकरी देण्यात आलेली आहे. महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळ, महावितरण, महापारेषण, महानिर्मिती यांनी वारसांना नियुक्ती देण्याबाबत संचालक मंडळामध्ये ठराव घ्यावा असे निर्देश उपसमितीने दिले.

- मराठा समाजातील विद्यार्थ्यांना ज्या शैक्षणिक अभ्यासक्रमासाठी शिष्यवृत्ती मिळत नाही, त्या अभ्यासक्रमांना शिष्यवृत्ती लागू करण्याबाबतचा प्रस्ताव विभागाने सादर करावा असे निर्देश मंत्रिमंडळ उपसमितीने दिले.

- मराठा समाजसंबंधी कामकाज करण्यासाठी स्वतंत्र कक्ष स्थापन करण्याबाबतचा प्रस्ताव मा.मुख्यमंत्री महोदयांकडे सादर करण्याबाबत मंत्रिमंडळ उपसमितीने निर्देश दिले.

- मराठा समाजाला आरक्षण देणारा कायदा मा. न्यायालयाने रद्द केल्यामुळे स्पर्धा परीक्षेहून शासन सेवेत निवड झालेल्या १५५३ उमेदवारांची नियुक्ती रद्द झाली होती. या उमेदवारांना दिलासा देण्यासाठी महायुती सरकारने २०२३ मध्ये कायदा करून या उमेदवारांना अधिसंख्य पदावर नियुक्ती दिली आहे. या उमेदवारांना कायमस्वरूपी शासन सेवेत सामावून घेण्याबाबत व त्यांना शासकीय सेवेचे सर्व लाभ देण्याबाबत मा.मुख्यमंत्री महोदय यांच्याकडे प्रस्ताव सादर करण्याबाबत उपसमितीने निर्देश दिले आहेत.

- EWS प्रवर्गातून अर्ज दाखल केलेल्या व SEBC आरक्षण लागू झाल्यानंतर प्रवर्ग बदल न केल्यामुळे निवड होऊनही नियुक्ती न दिलेल्या उमेदवारांना सामावून घेण्याबाबत कायदेशीर बाबी तपासून अहवाल सादर करण्याच्या सूचना उपसमितीने दिल्या आहेत.

 

Covers Business, Environment and climate change, Health, Science & tech and Policies! Believes in strength of quill!
Read More
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

AI In Power Sector : वीजपुवठा सुरळीत ठेवण्यासाठी AI चा वापर करा; मुख्यमंत्र्यांचे ऊर्जा विभागाला निर्देश
वीजपुवठा सुरळीत ठेवण्यासाठी AI चा वापर करा; मुख्यमंत्र्यांचे ऊर्जा विभागाला निर्देश
मी सक्षम उमेदवार, विधानपरिषदेवर मला संधी मिळावी, रुपाली ठोंबरेंचं सुनेत्रा पवारांना पत्र
मी सक्षम उमेदवार, विधानपरिषदेवर मला संधी मिळावी, रुपाली ठोंबरेंचं सुनेत्रा पवारांना पत्र
सावधान! हवामानत मोठा बदल, 20 ते 22 एप्रिल दरम्यान राज्यात वादळी पावसाची शक्यता, शेतकऱ्यांनी उपाययोजना कराव्यात, कृषी विभागाचं आवाहन
सावधान! हवामानत मोठा बदल, 20 ते 22 एप्रिल दरम्यान राज्यात वादळी पावसाची शक्यता, शेतकऱ्यांनी उपाययोजना कराव्यात, कृषी विभागाचं आवाहन
Devendra Fadnavis : डेटा सेंटर गुंतवणुकीला वेग; कंपन्यांना त्वरित जागा देण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश
डेटा सेंटर गुंतवणुकीला वेग; कंपन्यांना त्वरित जागा देण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

PM Modi UNCUT : काँग्रेसने महिलांच्या अधिकारांची भ्रूणहत्या केली, स्वप्नांचा चक्काचूर केला- मोदी
PM Modi on Women Reservation Bill : काँग्रेसने त्यांचं अस्तित्व गमावलं तुफान हल्लाबोल
PM Modi on Women Reservation Bill : नारीशक्ती विधेयक नामंजूर, पंतप्रधान मोदींनी मागितली माफी
Sanjay Raut PC : 'मोदी हैं तो नामुमकिन हैं' अशी परिस्थिती, राऊतांचा हल्लाबोल
Sharad Ponkshe Nanded Speech : 1 लाख खरात एकत्र केले तर 1 अकबर तयार होईल, शरद पोंक्षे यांचं विधान

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Jaykumar Gore : राज्यावर एल निनोचं संकट, उन्हाळ्यात एकच पाण्याचे आवर्तन, उजनी धरणात पाणी काटकसरीने वापर, पालकमंत्री जयकुमार गोरेंचं सोलापूरकरांना आवाहन
राज्यावर एल निनोचं संकट, उन्हाळ्यात एकच पाण्याचे आवर्तन, उजनी धरणात पाणी काटकसरीने वापर, पालकमंत्री जयकुमार गोरेंचं सोलापूरकरांना आवाहन
Maharashtra Live blog updates: समृद्धी महामार्गालगत नवनगरे विकसित करण्याचा प्रकल्प बारगळला
Maharashtra Live blog updates: समृद्धी महामार्गालगत नवनगरे विकसित करण्याचा प्रकल्प बारगळला
Crude Oil in India : जगाला चकवा देत जया, डोरना आणि फेलिसिटी भारतात दाखल, हॉर्मुझमधून 60 लाख बॅरेल इराणी तेल देशात
जगाला चकवा देत जया, डोरना आणि फेलिसिटी भारतात दाखल, हॉर्मुझमधून 60 लाख बॅरेल इराणी तेल देशात
AI In Power Sector : वीजपुवठा सुरळीत ठेवण्यासाठी AI चा वापर करा; मुख्यमंत्र्यांचे ऊर्जा विभागाला निर्देश
वीजपुवठा सुरळीत ठेवण्यासाठी AI चा वापर करा; मुख्यमंत्र्यांचे ऊर्जा विभागाला निर्देश
PM Modi and Nana Patole: मी मोदींचं भाषण मोबाईलवर ऐकत होतो, अनेकजण त्यांना 'फेकू' बोलत होते; नाना पटोलेंची बोचरी टीका
मी मोदींचं भाषण मोबाईलवर ऐकत होतो, अनेकजण त्यांना 'फेकू' बोलत होते; नाना पटोलेंची बोचरी टीका
महागाई भत्त्यात केंद्र सरकारकडून मोठी वाढ; 50 लाख केंद्रीय कर्मचारी आणि 69 लाख निवृत्तीवेतनधारकांना फायदा होणार
महागाई भत्त्यात केंद्र सरकारकडून मोठी वाढ; 50 लाख केंद्रीय कर्मचारी आणि 69 लाख निवृत्तीवेतनधारकांना फायदा होणार
Iran War Live Update: अमेरिकेला लाल समुद्रातील हुथी बंडखोरांची धडकी भरली; जगातील सर्वाधिक शक्तिशाली नौदलाच्या युद्धनौकेला अख्ख्या आफ्रिका खंडाला वळसा घालून इराणकडे येण्याची वेळ!
अमेरिकेला लाल समुद्रातील हुथी बंडखोरांची धडकी भरली; जगातील सर्वाधिक शक्तिशाली नौदलाच्या युद्धनौकेला अख्ख्या आफ्रिका खंडाला वळसा घालून इराणकडे येण्याची वेळ!
West Bengal Election 2026: महिला आरक्षणावरुन रणकंदन, पण पश्चिम बंगालच्या निवडणुकीत भाजप-काँग्रेसने किती महिलांना उमेदवारी दिली?
महिला आरक्षणावरुन रणकंदन, पण पश्चिम बंगालच्या निवडणुकीत भाजप-काँग्रेसने किती महिलांना उमेदवारी दिली?
Embed widget