एक्स्प्लोर

ग्रँड हयातमध्ये कोरोना नियमांचा ग्रँड फज्जा; ना मास्क, ना सोशल डिस्टन्सिंग 

Grand Hyatt Mumbai : मुंबईतील ग्रँड हयात हॉटेलमध्ये कोरोना नियमांचा फज्जा उडाल्याचं चित्र समोर आलं आहे. ग्रँड हयातमध्ये कॅनेडियन रॅपरच्या कार्यक्रमाला शेकडो लोकांनी उपस्थिती लावली होती.

राज्यात ओमायक्रॉन रुग्णांची संख्या दिवसागणिक वाढतच चालली आहे. कोरोना रुग्णांची संख्याही कमीजास्त होत आहे. अशात राज्य सरकारकडून मास्क आणि सोशल डिस्टन्सिंग वापरण्याचं आवाहन करण्यात येत आहे. पण असे असतानाही मुंबईतील ग्रँड हयात हॉटेलमध्ये कोरोना नियमांचा फज्जा उडाल्याचं चित्र समोर आलं आहे. ग्रँड हयातमध्ये कॅनेडियन रॅपरच्या कार्यक्रमाला शेकडो लोकांनी उपस्थिती लावली होती. सोशल डिस्टन्सिंग तर सोडा यावेळी एकाच्याही चेहऱ्यावर मास्क दिसत नव्हता. ग्रँड हयातमधील दृश्य पाहून कोरोनाला आमंत्रण देतोय का? असा प्रश्न उपस्तित होतोय. 

मुंबईमध्ये सध्या जमावबंधी म्हणजेच 144 कलम लागू आहे. असं असतानाही मुंबईतील कालीना येथील ग्रँड हयातमध्ये कार्यक्रमाला परवानगी कशी मिळाली हा प्रश्न उपस्थित राहतोय. या कार्यक्रमात कोरोनाचे सर्व नियम धाब्यावर ठेवून दिले आहेत. शारीरिक अंतर नाही, मास्क नाही.  कॅनेडियन रॅपर  धील्लोनच्या लाईव्ह कॉन्सर्टचा कार्यक्रम रविवारी येथे आयोजीत करण्यात आला होता. ज्यात हजारोंच्या संख्येने तरुणांईने उपस्थिती दर्शवली होती. या कार्यक्रमात कोरोनाचे सर्व नियम धाब्यावर ठेवून लोक नाचताना दिसतायेत.  

कलम 144 लागू असल्यामुळे दोन दिवसांपूर्वी एमआयएमच्या कार्यक्रमाला परवानगी नाकारण्यात आली होती. पण आता या म्युझिक कार्यक्रमाला परवानगी नेमकी दिली कुणी? असा प्रश्न उपस्थित केला जातेय. 

दरम्यान, रविवारी मुंबईत 187 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झालीये. तर आज 219 रुग्णांची कोरोनावर मात केलीये. मुंबईत सध्या एक हजार 774 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तर मुंबईतील रुग्ण बरे होण्याचं प्रमाण 97 टक्क्यांवर गेलंय. मुंबईत आतापर्यंत ओमायक्रॉनचे पाच रुग्ण आढळले आहेत.  

राज्यात आज 704 नव्या कोरोना रुग्णांची नोंद
महाराष्ट्रात रविवारी 704 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 699 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. राज्यात आज 16 करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली. सध्या राज्यातील मृत्यूदर 2.12% एवढा आहे.  राज्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची 66,43,883 इतकी झाली आहे. राज्यातील एकूण कोरोनामुक्त रुग्णांची संख्या 64,92, 504 इतकी झाली आहे. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) 97.72% इतके झाले आहे. राज्यात सध्या 75,313 व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर 855 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात सध्या 6,441 ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.  

मराठी लाईव्ह न्यूज सुपरफास्ट पाहा ABP Majha वर, मुंबई, पुणे, नागपूर, औरंगाबाद, मनोरंजन, क्रिकेट, देश-विदेशातील प्रत्येक बातमी सर्वात आधी एबीपी माझावर Live

महत्त्वाच्या बातम्या

Tukaram Mundhe : मोठी बातमी! तुकाराम मुंढे MPSC चौकशी समितीचे सचिव, मुख्यमंत्री विद्यार्थ्यांच्या मागण्यांबाबत सकारात्मक; शिवेंद्रराजेंची घोषणा; तर भीमनवार अध्यक्षपदी नकोत, रोहित पवारांची मागणी
मोठी बातमी! तुकाराम मुंढे MPSC चौकशी समितीचे सचिव, मुख्यमंत्री विद्यार्थ्यांच्या मागण्यांबाबत सकारात्मक; शिवेंद्रराजेंची घोषणा; तर भीमनवार अध्यक्षपदी नकोत, रोहित पवारांची मागणी
निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात आंदोलन! मुंबई पोलिसांकडून आदित्य ठाकरेंसह अमित ठाकरेंवर गुन्हा दाखल
निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात आंदोलन! मुंबई पोलिसांकडून आदित्य ठाकरेंसह अमित ठाकरेंवर गुन्हा दाखल
Mumbai Protest : शिवाजी पार्क परिसरात आंदोलन करणाऱ्या 300 हून अधिक आंदोलकांवर गुन्हा दाखल होणार, आदित्य ठाकरे-अमित ठाकरेंचं काय? 
शिवाजी पार्क परिसरात आंदोलन करणाऱ्या 300 हून अधिक आंदोलकांवर गुन्हा दाखल होणार, आदित्य ठाकरे-अमित ठाकरेंचं काय? 
थोड्याच महिन्यात सत्ता बदलणार, आमच्या मातीसाठी, संविधानासाठी लढत राहणार, आदित्य ठाकरेंचा एल्गार
थोड्याच महिन्यात सत्ता बदलणार, आमच्या मातीसाठी, संविधानासाठी लढत राहणार, आदित्य ठाकरेंचा एल्गार

व्हिडीओ

Majha Katta Dr. Abhijit Joshi : जेवण कसं जेवावं?नियम काय? आयुर्वेदात काय? डॉ.अभिजीत जोशी माझा कट्टावर | ABP Majha
Sanjay Raut PC : मोदी सरकार 6-7 महिन्यात दिसणार नाही, राऊतांचा मोठा दावा
Mann Suddha Tujha Season 3 : मंत्रचळ | मन सुद्ध तुझं | Episode 2 ABP Majha
Shetitil Navdurga : Sunita Raite : शिलाईच्या सुईपासून अवजार बँकेपर्यंत स्वावलंबनाचा प्रवास!
Maharashtra Drought Central Team : नुकसान आतोनात, कधी मदतीचा हात? केंद्रीय पथकासमोर मांडल्या व्यथा | Special Report ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Chief Justice of India Surya Kant: इंडिया आघाडीचा मोर्चा सुप्रीम कोर्टावर धडकणार, सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी इंडिया आघाडीच्या नेत्यांची भेटीची विनंती फेटाळून लावली
इंडिया आघाडीचा मोर्चा सुप्रीम कोर्टावर धडकणार, सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी इंडिया आघाडीच्या नेत्यांची भेटीची विनंती फेटाळून लावली
'माझा कमी अभ्यास असल्याने भारती विद्यापीठात शिकलो नाही, मी गरीबासारखा साताऱ्यात शिकलो त्यामुळे..' एमपीएससी आंदोलनातून शिवेंदराजेंचा विश्वजित कदमांना अप्रत्यक्ष टोला
'माझा कमी अभ्यास असल्याने भारती विद्यापीठात शिकलो नाही, मी गरीबासारखा साताऱ्यात शिकलो त्यामुळे..' एमपीएससी आंदोलनातून शिवेंदराजेंचा विश्वजित कदमांना अप्रत्यक्ष टोला
Video: अभिजित दिपकेंच्या गंभीर आरोपानंतर दिल्ली पोलिसांकडून 100 सेकंदाचा लाव रे तो व्हिडिओ; दिपकेंचा सुद्धा पलटवार, म्हणाले तो भाग तुम्ही डिलीट का केला? ट्विट वाॅर रंगलं
Video: अभिजित दिपकेंच्या गंभीर आरोपानंतर दिल्ली पोलिसांकडून 100 सेकंदाचा लाव रे तो व्हिडिओ; दिपकेंचा सुद्धा पलटवार, म्हणाले तो भाग तुम्ही डिलीट का केला? ट्विट वाॅर रंगलं
Mumbai Protest: ज्युनिअर ठाकरे मैदानात, शिवसेनाभवनाबाहेर आदित्य-तेजसचा ठिय्या, शिवाजी पार्कात अमित ठाकरेंसह मनसे आक्रमक
ज्युनिअर ठाकरे मैदानात,शिवसेनाभवनाबाहेर आदित्य-तेजसचा ठिय्या, शिवाजी पार्कात अमित ठाकरेंसह मनसे आक्रमक
Rahul Gandhi: 'आम्हाला असा भारत नको..' इंडियाचा आघाडीचा अभूतपूर्व निर्णय, थेट सुप्रीम कोर्टावर मोर्चा धडकणार; राहुल गांधी म्हणाले, 'हा राजकीय पक्षांचा मोर्चा नाही, तर..'
'आम्हाला असा भारत नको..' इंडियाचा आघाडीचा अभूतपूर्व निर्णय, थेट सुप्रीम कोर्टावर मोर्चा धडकणार; राहुल गांधी म्हणाले, 'हा राजकीय पक्षांचा मोर्चा नाही, तर..'
Abhijeet Dipke: 'आजी वारल्यानंतर फोन सुद्धा दिला नाही, पहाटे साडे तीन वाजता दिल्ली पोलिस मला म्हणाले..' अभिजित दिपकेंनी धक्कादायक घटनाक्रम सांगितला
'आजी वारल्यानंतर फोन सुद्धा दिला नाही, पहाटे साडे तीन वाजता दिल्ली पोलिस मला म्हणाले..' अभिजित दिपकेंनी धक्कादायक घटनाक्रम सांगितला
Mumbai Protest Aaditya Thackeray and Amit Thackeray: अखेर मुंबईत आंदोलनाचा वणवा भडकला, ठाकरेंची त्रिमूर्ती रस्त्यावर उतरली अन् बघता बघता वातावरण पालटलं, दादरमध्ये नेमकं काय घडलं?
अखेर मुंबईत आंदोलनाचा वणवा भडकला, ठाकरेंची त्रिमूर्ती रस्त्यावर उतरली अन् बघता बघता वातावरण पालटलं, दादरमध्ये नेमकं काय घडलं?
राजधानी दिल्लीत सलग दुसऱ्या दिवशी जेनझीचा अभूतपूर्व एल्गार, शेकडो ताब्यात; नेहा बोरा धावत कॅनाॅट प्लेसपर्यंत पोहोचली, व्हिडिओ शेअर करत धावत्या बसमधील जेलचा कोंडमारा दाखवला
राजधानी दिल्लीत सलग दुसऱ्या दिवशी जेनझीचा अभूतपूर्व एल्गार, शेकडो ताब्यात; नेहा बोरा धावत कॅनाॅट प्लेसपर्यंत पोहोचली, व्हिडिओ शेअर करत धावत्या बसमधील जेलचा कोंडमारा दाखवला
Embed widget