एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Corona Updates | राज्यात आज 1352 रुग्ण कोरोनामुक्त, 123 जणांचा मृत्यू तर 41 हजार 393 रुग्णांवर उपचार सुरू
राज्यात आज 1352 रुग्णांना घरी सोडण्यात आले असून आतापर्यंत राज्यभरात 33 हजार 681 रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे. दरम्यान, आज कोरोनाच्या 2933 नवीन रुग्णांचे निदान झाले आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली.
मुंबई : राज्यात आज 1352 कोरोनाबाधित रुग्णांना यशस्वी उपचारांनंतर घरी सोडण्यात आलंय. दिलासादायक बाब म्हणजे आतापर्यंत राज्यभरात 33 हजार 681 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. रुग्ण बरे होण्याचा वेग राज्यात वाढताना दिसत आहे. आज कोरोनाचे नवीन 2933 नवे रुग्णांची नोंद झाल्याने राज्यातील कोरोना संक्रमितांचा आकडा 77 हजार 793 इतका झाला आहे. पैकी सध्या 41 हजार 393 कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.
कोरोना चाचणीच्या आजपर्यंत पाठवण्यात आलेल्या 5 लाख 10 हजार 176 नमुन्यांपैकी 77 हजार 793 जण पॉझिटिव्ह आढळले आहेत. राज्यात 5 लाख 60 हजार 303 लोक होम क्वॉरंटाईन आहेत. तर संस्थात्मक क्वॉरंटाईन (Institutional Quarantine) सुविधांमध्ये 73 हजार 49 खाटा उपलब्ध असून सध्या 30 हजार 623 रुग्ण संस्थात्मक क्वॉरंटाईनमध्ये दाखल आहेत.
कोरोनाच्या प्रादुर्भावाने त्रस्त असलेल्या रुग्णांपैकी 123 कोरोनाबाधित रुग्णांच्या आज मृत्यू झालाय.
आज नोंद झालेल्या मृत्यूंपैकी आरोग्य मंडळ निहाय मृत्यू
- ठाणे जिल्हा - 68 (मुंबई 48, ठाणे शहर 8, नवी मुंबई 6, पनवेल 1, रायगड 3, वसई विरार 1
- नाशिक - 25 ( नाशिक 3, जळगाव 21, धुळे 1)
- पुणे - 16 (पुणे 9, सोलापूर 7)
- औरंगाबाद 8 (औरंगाबाद 5, जालना -1, परभणी - 2)
- लातूर 3 (लातूर– 1, उस्मानाबाद -1, नांदेड -1.
- अकोला 3 (वाशिम – 2, यवतमाळ – 1.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
Advertisement