Coronavirus | पत्रकारांनाही 50 लाखांचं विमा कवच, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची माहिती
कोरोनाच्या लढाईत प्रसारमाध्यमे आणि वृत्तपत्रांचाही अत्यावश्यक सेवेत समावेश करण्यात आला आहे. कोरोनाच्या काळाच माहिती मिळवण्यासाठी पत्रकारही मेहनत करतात.
बुलडाणा : कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. या कठीण परिस्थितीतही अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी आपलं कर्तव्य बजावत आहेत. कोरोनाविरुद्धच्या लढाईत अत्यावश्यक सेवेत कर्तव्य बजावणाऱ्या कर्मचाऱ्यांना 50 लाखांचा विमा कवच देण्यात येणार असल्याची घोषणा आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केली आहे. बुलडाण्याच्या खामगावात पोलिसांसाठी जिल्हा पोलीस विभागाच्यावतीने कोविड केअर सेंटरची सुरवात करण्यात आली आहे. या कोविड केअर सेंटरचे उदघाटन राजेश टोपे यांचे हस्ते करण्यात आले. त्यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
कोरोनाच्या लढाईत प्रसारमाध्यमे आणि वृत्तपत्रांचाही अत्यावश्यक सेवेत समावेश करण्यात आला आहे. कोरोनाच्या काळाच माहिती मिळवण्यासाठी पत्रकारही मेहनत करतात. आपलं कर्तव्य बजावत असताना काही पत्रकारांनाही कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली होती. कोरोना काळात कर्तव्य बजावणाऱ्या पत्रकारांना 50 लाखांचं विमा कवच देण्यात येणार असल्याची घोषणा राजेश टोपे यांनी केली.
आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्या अकोला, जळगाव जिल्हा दौऱ्यात सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा