एक्स्प्लोर
Advertisement
चिकन खाल्ल्याने कोरोना होत नाही; आरोग्य मंत्री राजेश टोपेंची माहिती
कोरोना व्हायरसचा परिणाम पोल्ट्री व्यावसायावर झाल्याचे पाहायला मिळालंय. चिकन खाल्ल्याने कोरोना होतो या अफवेमुळे चिकनचे भाव पडले आहेत. परिणामी पोल्ट्री व्यावसाय धोक्यात आले आहेत. या पार्श्वभूमीवर आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी अशा अफवांवर विश्वास ठेऊ नका, असं आवाहन केलंय.
मुंबई : मांसाहार केल्याने कोरोना होत असल्याच्या अफवांवर विश्वास ठेऊ नये. वैज्ञानिक दृष्ट्या चिकन खाल्ल्याने कोरोना होत नाही. त्यामुळे असल्या कोणत्याही अफवांवर विश्वास ठेऊ नका, असं आवाहन आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी केलंय. राज्यात कोरोनाचा एकही रुग्ण नाही. कोरोनाबाबत तपासणी अहवाल निगेटिव्ह आल्यानं 258 जणांना घरी सोडल्याची माहिती राजेश टोपे यांनी दिली आहे. राज्यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सध्या निरीक्षणाखाली 15 जण असून मुंबई आणि पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावर 904 विमानांमधील 1 लाख 9 हजार 118 प्रवासी तपासण्यात आले आहेत.
कोरोना व्हायरसने जगभर थैमान घातलं आहे. याचा परिणाम अनेक क्षेत्रांमध्ये होताना दिसत आहे. राज्यातील पोल्ट्री व्यावसाय मोठ्या संकटात सापडला आहे. व्हॉट्सअॅपवर व्हायरल होणाऱ्या अफवा यासाठी कारणीभूत ठरत आहे. चिकन खाल्ल्याने कोरोनाचा लागण होते, असे चुकीचे मेसेज सोशल मीडियावर फिरत आहेत. याचा परिणाम असा झाला की चिकनचे दर इतिहासात कधीच नव्हे एवढे कमी म्हणजे नऊ ते दहा रुपये किलो झाले आहेत.
Coronvirus Effect | कोरोना व्हायरसच्या अफवांमुळे पोल्ट्री व्यवसाय धोक्यात
मांसाहार केल्याने कोरोना होत नाही : टोपे
मांसाहार केल्याने कोरोना होत नाही. यासंदर्भातील कोणत्याही अफवांवर विश्वास ठेऊ नका. या अफवांमुळे कोंबडीचे भाव पडले आहेत, अशी माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली. कोरोनाविषयी जनजागृती करणार आहे. यासाठी प्रत्येक जिल्ह्यात होर्डिंग, पोस्टरद्वारे याची जनजागृती करणार असल्याचे त्यांनी सांगितले. टिव्ही आणि रेडियोद्वारे तसेच आयईसीच्या माध्यमातून आजपासून व्यापक प्रमाणावर जनजगृतीचे काम आरोग्य विभागाकडून होणार असल्याचेही टोपे म्हणाले.
कोरोनाचा परिणाम, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा बांगलादेश दौरा रद्द होण्याची शक्यता
राज्यसरकार कोरोनाशी सामना करण्यासाठी सज्ज
राज्य सरकार कोरोनाशी सामना करण्यासाठी सज्ज आहे. राज्यात एकही कोरोनाचा रुग्ण नसल्याची माहिती राजेश टोपे यांनी दिली. एकूण 1 लाख 18 हजार लोकांची स्क्रीनिंग झाली. राज्यात 502 रुग्णांपैकी केवळ 7 संशयितांवर उपचार सुरू आहेत. त्यांचा अद्याप रिपोर्ट आलेला नाही. कोरोनासाठी सर्व शासकीय रुग्णालय, मेडिकल कॉलेज, मनपा आणि जिल्हा पातळीवरील रुग्णालयांमध्ये कोरोनाशी लढण्यासाठीचे वैद्यकीय साहित्य तयार आहे. यासाठी 10 हजार प्राईव्हेट प्रोटेक्शन किट, N-95 चे 2 लाख मास्क, ट्रिपल लेअर 15 लाख मास्कचा साठा करण्यात आला आहे.
Chicken Rate Down | कोरोनामुळे स्वस्त झालेलं चिकन फस्त, दर उतरवताच फेस्टिव्हलमध्ये खवय्यांची गर्दी
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
जळगाव
महाराष्ट्र
निवडणूक
निवडणूक
Advertisement