(Source: ECI/ABP News/ABP Majha)
कोरोनाचा परिणाम, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा बांगलादेश दौरा रद्द होण्याची शक्यता
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बांगलादेश दौऱ्याच्या बदलाविषयीची कोणतीही अधिकृत माहिती अद्याप समोर आलेली नाही. बांगलादेशमधील मुजीबुर्रहमान जन्मशताब्दी कार्यक्रमाच्या बदलाची माहिती मीडिया रिपोर्ट्समध्ये आली आहे.
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या परदेशी दौऱ्यावरही कोरोना व्हायरसचा परिणाम होताना दिसत आहे. कोरोना व्हायरसमुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा 17 मार्चचा बांगलादेश दौरा रद्द होण्याची शक्यता आहे. बांगलादेशमध्ये कोरोना व्हायरसचा एक रुग्ण आढळला आहे. त्यांतर शेख असिना सरकारने ढाका येथे होणारा मुजीबुर्रहमान जन्मशताब्दी उद्घाटन सोहळा साधेपणाने आणि छोट्या स्तरावर करण्याचा निर्णय घेतला आहे. पंतप्रधान शेख हसीना यांच्या घरी पार पडलेल्या बैठकीनंतर हा निर्णय घेण्यात आला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बांगलादेश दौऱ्याच्या बदलाविषयीची कोणतीही अधिकृत माहिती अद्याप समोर आलेली नाही. बांगलादेशमधील मुजीबुर्रहमान जन्मशताब्दी कार्यक्रमाच्या बदलाची माहिती मीडिया रिपोर्ट्समध्ये आली आहे. मात्र याबाबत अद्याप अधिकृत माहिती आलेली नाही. अधिकृत घोषणेनंतर निर्णय घेतला जाईल, असं पंतप्रधान कार्यालयाने म्हटलं आहे. बांगलादेशचे परराष्ट्रमंत्री एके अब्दुल मोमिन यांनी दिलेल्या माहितीनुसार, कोरोना व्हायरसचं संकट पाहता मुजीबुर्रहमान जन्मशताब्दी उद्घाटन सोहळा साधेपणाने केला जाणार आहे. याबाबत सर्व पाहुण्यांना कळवलं जाणार आहे. त्यानंतर ते आपला निर्णय घेऊ शकतात.
कोरोना प्रतिबंधासाठी सरकार सज्ज, नागरिकांनी भीती बाळगू नये : मुख्यमंत्री
बांगलादेशमधील नागरिकांचा कोरोनापासून बचाव व्हावा यासाठी गर्दीच्या कार्यक्रमांवर बंदी घालण्यात आली आहे. तसेच ढाका येथील नॅशनल परेड ग्राऊंडवर होणाऱ्या मुजीबुर्रहमान जन्मशताब्दी भव्य उद्घाटन सोहळ्याऐवजी छोटा कार्यक्रम करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. शेख मुजीबुर्रहमान यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी आणि नेराळच्या राष्ट्रपती विद्या देवी यांनाही आमंत्रित करण्यात आलं आहे.
Petrol-Diesel Price | कच्चा तेलाचे दर घसरले, भारतात पेट्रोल आणि डिझेल स्वस्त
जगभरातील अनेक देशांमध्ये पसरलेल्या कोरोना व्हायरसचं संकट अधिक गडद होत चाललं आहे. त्यासाठी प्रत्येक देश योग्य ती खबरदारी घेत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी भारत-युरोपीय संघ शिखर बैठकीसाठी 13-14 मार्चला बेल्जियमला जाणार होते. मात्र कोरोना व्हायरसचं संकट लक्षात घेत पंतप्रधान नरेंद्र मोदींचा हा दौरा रद्द करण्यात आला आहे.
कोरोनामुळे 3600 जणांचा मृत्यू
जगभरात कोरोनाच्या रुग्णांची संख्या एक लाख 10 हजारांवर पोहोचली आहे, तर 3 हजार 600 जणांचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे. चीनमध्ये सर्वाधिक 3119 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यानंतर इटलीमध्यी 366 जणांचा बळी कोरोनामुळे गेला आहे. गेल्या 24 तासात बळींच्या आकड्यात 133 ने वाढला आहे. इतर देशांतील मृतांचा आकडा इराण - 194 मृत्यू दक्षिण कोरिया - 50 मृत्यू अमेरिका - 21 मृत्यू फ्रान्स - 19 मृत्यू स्पेन - 10 जपान - 6 मृत्यू संबंधित बातम्या :- नाशिकमध्ये कोरोनाचा संशयित रुग्ण आढळल्याने खळबळ, मात्र संशयिताचे रिपोर्ट निगेटिव्ह
- #CoronaVirus देशात कोरोना व्हायरसचे दोन पॉझिटिव्ह रुग्ण, आरोग्य मंत्रालयाची माहिती
- Corona Virus | कोरोनाग्रस्त चीनमधून 119 भारतीयांना घेऊन विमान परतलं, मित्र देशाच्या 5 नागरिकांचाही समावेश
- उत्तर कोरियात कोरोनाचा पहिला रुग्ण आढळला, किम जोंग यांचे गोळ्या घालण्याचे आदेश