कोरोनामुळे दुसऱ्या वर्षीही हापूस आंबाच्या निर्यातीला फटका; आंतरराष्ट्रीय विमानसेवा बंद असल्यानं कोट्यवधींची निर्यात रोडावली
गल्फ, सिंगापूर , हॉगकाँग, स्वित्झर्लंड, कॅनडा, लंडन, अमेरिका इत्यादी देशात कोकणातील हापूस आंब्याला चांगली मागणी असते. फेब्रुवारी अखेरपासून हापूस आंब्याची या देशांमध्ये विमानाने आणि समुद्रामार्गाने निर्यात होत असते. सध्या कोरोनाचे सावट कायम असल्याने अनेक देशांतील विमानसेवा सुरु झालेल्या नाहीत.
नवी मुंबई : सलग दुसऱ्यावर्षी कोकणातील हापूस आंब्याचे कोरोनामुळे मोठे नुकसान झाले आहे. मार्च महिन्यात हापूस आंब्याचे मार्केटमध्ये आगमन होण्यास सुरुवात होते. स्थानिक बाजार पेठेबरोबर विदेशात हापूस आंब्याच्या निर्यातीला मुहूर्त मिळतो. मात्र सलग दुसऱ्या वर्षी हापूस आंबाच्या सिझनच्या वेळेतच कोरोनाने उचल खाल्याने हापूस आंब्याच्या निर्यातीला चांगलाच फटका बसला आहे.
गल्फ, सिंगापूर , हॉगकाँग, स्वित्झर्लंड, कॅनडा, लंडन, अमेरिका इत्यादी देशात कोकणातील हापूस आंब्याला चांगली मागणी असते. फेब्रुवारी अखेरपासून हापूस आंब्याची या देशांमध्ये विमानाने आणि समुद्रामार्गाने निर्यात होत असते. सध्या कोरोनाचे सावट कायम असल्याने अनेक देशांतील विमानसेवा सुरु झालेल्या नाहीत. जिथे विमान सेवा सुरु आहेत, त्या फक्त कार्गो आहेत. पॅसेंजर विमानातून आंबा गेल्यास त्याचा खर्च कमी लागतो. पॅसेंजर विमानात किलोला साधारण 60 ते 65 रूपये खर्च येतो. आता आंबा स्पेशल कार्गो विमानाने पाठविल्यास कंपन्या किलोला 120 ते 130 रूपये आकारतात. जादा भाडे द्यावे लागत असल्याने विदेशात आंब्याचा दर वाढवून विकावा लागतो. साहजिकच महागडा आंबा विकला जात नसल्याने विदेशातून हापूस आंबा मागवला जात नाही.
दुसरीकडे समुद्र मार्गाने हापूस आंब्याची निर्यात होत असली तरी ती फक्त दुबई, मस्कत, बेहरीन, आबूदाबी, सौदी , कुवैत आदी गल्फ कंन्ट्रीमध्ये पाठवला जातो. युरोप, अमेरिका खंडात विमान सेवेशिवाय पर्याय नसल्याने निर्यातीला मर्यादा आल्या आहेत. त्यामुळे सध्या मार्केटमध्ये दाखल होत असलेल्या आंब्यातील 20 ते 30 टक्केच निर्यात होत आहे. हेच प्रमाण नेहमी 60 टक्यांच्या घरात असायचे. विदेशात हापूस आंब्याला दुप्पट भाव मिळत असल्याने कोकणातील शेतकऱ्यांच्या खिशात जादा पैसे येत होते. हापूस आंबा निर्यातीमधून भारतीय सरकारच्या तिजोरीतही विदेशीचलन येत होते.
कोकणातील हापूस आणि कर्नाटकातील आंब्यामध्ये फरक कसा ओळखायचा?
कोकणातील हापूस : आंब्याच्या वरील साल पातळ असते, आंबा आकारानं गोलसर तर, आतमधून केशरी रंगाचा असतो.
कर्नाटकमधील आंबा : आंब्याची वरची साल जाड असते. आकाराच्या बाबतीत आंबा खालच्या बाजूला निमूळता असतो तर, आतमधून पिवळसर रंगाचा असतो.
महत्त्वाच्या इतर बातम्या :