एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

कोकणच्या हापूसला विक्रमी भाव; 5 डझनच्या पेटीची 1 लाख 8 हजारांना विक्री

राजापूर, देवगड, रत्नागिरीतील दहा आंबा उत्पादक शेतकरी या लिलावात सहभागी झाले होते. यामध्ये राजापूरमधील बाबू अवसरे या शेतकऱ्याच्या 5 डझन हापूस आंब्याच्या पेटीला विक्रमी दर मिळाला आहे.

रुत्नागिरी : हापूस! सर्वांना हवाहवास वाटणारा. कोकणचा हापूस सातासमुद्रापार प्रसिद्ध आहे. दरवर्षी हजारो टन हापूस परदेशी रवाना होतो. देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारात देखील हापूसला मोठी मागणी. अगदी डझनचा पाच रूपये मोजून देखील हापूस खरेदी केला जातो. पण, तुम्हाला कुणी हापूसच्या पाच डझनच्या पेटीला 1 लाखाचा दर मिळाला असं सांगितलं तर कदाचित विश्वास नाही बसणार! पण, हे शक्य झालं आहे. ते देखील मुंबईत. कोकणच्या या राजाला पाच डझनच्या पेटीला तब्बल 1 लाख 8 हजारांचा दर मिळाला आहे.

मुंबईच्या अंधेरीतील मॅरिएट हॉटेलमध्ये शुक्रवारी हापूसचा लिलाव झाला. त्यावेळी रत्नागिरी, देवगड, राजापूरातील 10 आंबा उत्पादक शेतकरी सहभागी झाले होते. यावेळी राजापुरातील बाबू अवसरे या शेतकऱ्याच्या 5 डझन हापूस आंब्याच्या पेटीला किमान शतकातील अर्थात 1 लाख 8 हजाराचा दरविक्रमी दर लिलाव पद्धतीनं मिळाला आहे.  शेतकऱ्यांचा उत्साह, आत्मविश्वास वाढवणारी मायको ब्रँडची पहिली पेटी उद्योजक आणि सेंट अग्नेलो व्हीएनसीटी व्हेंचरच्या राजेश अथायडे यांनी 1 लाख 8 हजार रुपये अशी विक्रमी किंमत देऊन घेतली. या लिलावातील सहभागी हापूस उत्पादकाला प्रत्येकी 31 हजार रूपये मिळाले.

दरम्यान, सध्याच्या घडीला हापूसवर निसर्गाची वक्रदृष्टी झाली आहे. त्यामुळे आंबा उत्पादक शेतकरी मोठ्या संकटात असून त्याचा उत्साह यामुळे नक्कीच वाढणार आहे. या साऱ्याकरता चिपळूणमधील आमदार, सह्याद्री शिक्षण संस्थेचे अध्यक्ष शेखर निकम, ग्लोबल कोकणचे प्रमुख संजय यादवराव, किशोर धारिया, माजी नगरसेवक आणि मुंबईतील हाऊसिंग फेडरेशनचे अध्यक्ष प्रकाश दरेकर, हापूस आंब्याचे एक्सपोर्टर दीपक परब यांनी पुढाकार घेतला होता.

शेतकऱ्यांचा सहभाग

या कार्यक्रमात शेतकरी देखील सहभागी झाले होते. यावेळी 10 शेतकऱ्यांना प्रत्येकी 31 हजार रूपये लिलावाअंती देण्यात आले होते. कोकणातील शेतकऱ्याचा आत्मविश्वास दुणावला जावा. हापूसला आणखी चांगला दर मिळाला यासाठी हा लिलाव करण्यात आला होता. देवगड तालुक्यातील  सौंदळ गावामधील नाना गोखले, राजापूर तालुक्यातील पडवे, कुंभवडे,  शिरसे, वाडा तिवरे, वेल्ये,रत्नागिरी या ठिकाणचे जवळपास दहा शेतकरी यावेळी सहभागी झाले होते.

कोकणच्या हापूसला विक्रमी भाव; 5 डझनच्या पेटीची 1 लाख 8 हजारांना विक्री

निसर्गाची हापूसवर अवकृपा
सध्या वातावरणात होत असलेले अनेक बदल, अवकाळी पाऊस यामुळे हापूस मोठ्या संकटात सापडला आहे. त्याचा परिणाम साऱ्या आर्थिक गणितावर झाला आहे. शेतकरी देखील मनान खचत चालला आहे. पण, अशा प्रकारच्या उपक्रमांमुळे शेतकऱ्याला उभारी मिळेल असा आशावाद व्यक्त केला जात आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Jay Shah ICC Chairman : आता जय शाह पर्व! ICC च्या अध्यक्षपदाचा पदभार स्वीकारला; पाकिस्तानची आता गोची होणार?
आता जय शाह पर्व! ICC च्या अध्यक्षपदाचा पदभार स्वीकारला; पाकिस्तानची आता गोची होणार?
'नाना पटोले निष्क्रीय, EVM वर शंका असेल तर..' नाना पटोलेच्या टीकेवर भाजपचं आव्हान
'नाना पटोले निष्क्रीय, EVM वर शंका असेल तर..' नाना पटोलेच्या टीकेवर भाजपचं आव्हान
ईव्हीएम हॅकींगच्या व्हायरल व्हिडिओवर निवडणूक आयोगाचं स्पष्टीकरण, तो व्यक्ती कोण; गुन्हा दाखल
ईव्हीएम हॅकींगच्या व्हायरल व्हिडिओवर निवडणूक आयोगाचं स्पष्टीकरण, तो व्यक्ती कोण; गुन्हा दाखल
Suhas Kande : नाशिकच्या पालकमंत्रिपदासाठी रस्सीखेच! भुजबळ आग्रही असतानाच सुहास कांदेंची एंन्ट्री; भावी पालकमंत्री म्हणून झळकले बॅनर
नाशिकच्या पालकमंत्रिपदासाठी रस्सीखेच! भुजबळ आग्रही असतानाच सुहास कांदेंची एंन्ट्री; भावी पालकमंत्री म्हणून झळकले बॅनर
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Top 25 : टॉप 25 न्यूज : 2 PM : 1 डिसेंबर 2024  : ABP MajhaSanjay Shirsat on Eknath shinde :  गृहखातं आम्हालाच पाहिजे , बैठकीत मुद्दा मांडणार - शिरसाटGulabrao Patil on Eknath Shinde : शिंदे नाराज नाहीत; कधी न मिळालेलं यश त्यांनी खेचून आणलंयRaosaheb Danve on CM Maharashtra :  मुख्यमंत्री कोण होणार हे जनतेला ठावूक आहे - रावसाहेब दानवे

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Jay Shah ICC Chairman : आता जय शाह पर्व! ICC च्या अध्यक्षपदाचा पदभार स्वीकारला; पाकिस्तानची आता गोची होणार?
आता जय शाह पर्व! ICC च्या अध्यक्षपदाचा पदभार स्वीकारला; पाकिस्तानची आता गोची होणार?
'नाना पटोले निष्क्रीय, EVM वर शंका असेल तर..' नाना पटोलेच्या टीकेवर भाजपचं आव्हान
'नाना पटोले निष्क्रीय, EVM वर शंका असेल तर..' नाना पटोलेच्या टीकेवर भाजपचं आव्हान
ईव्हीएम हॅकींगच्या व्हायरल व्हिडिओवर निवडणूक आयोगाचं स्पष्टीकरण, तो व्यक्ती कोण; गुन्हा दाखल
ईव्हीएम हॅकींगच्या व्हायरल व्हिडिओवर निवडणूक आयोगाचं स्पष्टीकरण, तो व्यक्ती कोण; गुन्हा दाखल
Suhas Kande : नाशिकच्या पालकमंत्रिपदासाठी रस्सीखेच! भुजबळ आग्रही असतानाच सुहास कांदेंची एंन्ट्री; भावी पालकमंत्री म्हणून झळकले बॅनर
नाशिकच्या पालकमंत्रिपदासाठी रस्सीखेच! भुजबळ आग्रही असतानाच सुहास कांदेंची एंन्ट्री; भावी पालकमंत्री म्हणून झळकले बॅनर
नवस फिटला... रोहित पवारांनी कुठं 5 तर कुठं 11 नारळांचं तोरण बांधलं, वाजत गाजत देवाला नमस्कार
नवस फिटला... रोहित पवारांनी कुठं 5 तर कुठं 11 नारळांचं तोरण बांधलं, वाजत गाजत देवाला नमस्कार
Mohan Bhagwat: प्रत्येक जोडप्याला किमान तीन मुलं हवीत, लोकसंख्या शास्त्राचा हवाला देत डॉ. मोहन भागवतांचे मोठे विधान
प्रत्येक जोडप्याला किमान तीन मुलं हवीत, लोकसंख्या शास्त्राचा हवाला देत डॉ. मोहन भागवतांचे मोठे विधान
Alka Yagnik : अलका याज्ञिक तब्बल 28 वर्षांहून अधिक काळ पतीपासून विभक्त आणि अजूनही प्रेमात! नेमकं कारण आहे तरी काय?
अलका याज्ञिक तब्बल 28 वर्षांहून अधिक काळ पतीपासून विभक्त आणि अजूनही प्रेमात! नेमकं कारण आहे तरी काय?
विधानसभेच्या पुण्यात भरलेल्या महाराष्ट्राच्या पहिल्या अधिवेशनाला आलं होतं जाहीरसभेचं स्वरुप..
विधानसभेच्या पुण्यात भरलेल्या महाराष्ट्राच्या पहिल्या अधिवेशनाला आलं होतं जाहीरसभेचं स्वरुप..
Embed widget