एक्स्प्लोर
2000 च्या नोटांचा ‘बेरंग’! कोऱ्या करकरीत नोटांचा गुलाबी रंग फिका

मुंबई : अर्थक्रांतीद्वारे आपल्या सेवेमध्ये दाखल झालेल्या नोटांचा बेरंग होत असल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. कारण बऱ्याच नोटांचा गुलाबी रंग पुसला जात असल्याचं एबीपी माझाच्या पडताळणीमध्ये समोर आलं आहे. आज सकाळपासून या नोटांचा रंग जात असल्याची तक्रार अनेकजणांनी केली होती. त्यामुळे खरंच असं होतंय का? हे जाणून घेण्यासाठी एबीपी माझाने याचं प्रात्यक्षिक करुन पाहिलं. तर नोटांचा रंग जात असल्याचं पडताळणीत स्पष्ट झालं. नोटांचा रंग पुसला जात असला, तरी, तरी नोटेची वैधता याद्वारे कमी होत नाही. नोट जशी आहे, तशीच राहत असली, तरी त्याचा रंग हा तकलादू असल्याचं प्रथमदर्शनी दिसतं आहे. आधीच नव्या नोटांचा आकार, त्यांची प्रत आणि त्यांच्या दर्जाबाबत प्रश्नचिन्ह निर्माण होत असताना आता रंगांबाबतही प्रश्नचिन्ह उपस्थित झालं आहे.
आणखी वाचा
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
भारत
व्यापार-उद्योग
अमरावती























