एक्स्प्लोर

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे राज्यपालांच्या भेटीला, राजभवनावर चर्चा!

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी राज्यातील विधान परिषदेच्या 9 रिक्त जागांसाठी निवडणुका जाहीर करण्याची विनंती केंद्रीय आयोगाला केली आहे. आज केंद्रीय निवडणूक आयोगाची बैठक होणार आहे. त्याआधी मुख्यमंत्री ठाकरे यांनी राज्यपालांची भेट घेतली आहे.

मुंबई :  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे राज्यपाल भगतसिंह कोशियारी यांच्या भेटीला राजभवनावर गेले होते. यावेळी मुख्यमंत्री आणि राज्यपालांमध्ये 20 मिनिटं चर्चा झाली. या भेटीमध्ये सध्याच्या राजकीय पेचप्रसंगावर चर्चा झाली असल्याची शक्यता आहे. यावेळी मुख्यमंत्र्यांसोबत मुख्य सचिव अजॉय मेहता, स्वीय सचिव मिलिंद नार्वेकर देखील उपस्थित होते.  राज्यातील विधानपरिषदेच्या 9 रिक्त जागांसाठी आज केंद्रीय निवडणूक आयोगाची बैठक होणार आहे. त्याआधी मुख्यमंत्री आणि राज्यपालांमध्ये चर्चा झाली आहे. महाराष्ट्र राज्य स्थापनेला आज 60 वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते मंत्रालयात ध्वजारोहण करून महाराष्ट्र दिन अत्यंत साधेपणाने साजरा करण्यात आला. या कार्यक्रमानंतर मुख्यमंत्री राजभवनावर राज्यपालांच्या भेटीसाठी गेले. यावेळी मुख्यमंत्री आणि राज्यपालांमध्ये 20 मिनिटं चर्चा झाली. विधान परिषदेच्या 9 रिक्त जागांसाठी राज्यपालांचे निवडणूक आयोगाला पत्र; आज निर्णय होणार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे राज्य विधिमंडळातील कोणत्याही सभासदाचे सदस्य नसल्यामुळे त्यांना 27 मे 2020 पूर्वी परिषदेची निवड होणे आवश्यक आहे. कोरोना संकटानंतर या 9 जागांसाठी निवडणूक आयोगाने निवडणूक प्रक्रिया रोखली होती. दरम्यान, राज्यातील विधानपरिषदेच्या 9 रिक्त जागांसाठी आज केंद्रीय निवडणूक आयोगाची बैठक होणार आहे. मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोरा व्हिडीओ व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे या बैठकीत सहभागी होणार आहेत, अशी माहिती शिवसेना खासदार संजय राऊत यांनी ट्वीट करुन दिली आहे. काल राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी महाराष्ट्र विधानपरिषदेच्या रिक्त असलेल्या 9 जागांसाठी लवकरात लवकर निवडणुका जाहीर करण्याची विनंती भारतीय निवडणूक आयोगाला केली आहे. राज्यातील सद्यस्थितीतील अनिश्चितता संपुष्टात आणण्याच्या उद्देशाने राज्यपालांनी निवडणूक आयोगाला 24 एप्रिलपासून रिक्त असलेल्या विधानपरिषदेतील 9 जागा भरण्याची विनंती केली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सभागृह सदस्यत्वाचा पेच सुटणार? देवेंद्र फडणवीस यांच्याकडून शुभेच्छा राज्यपालांनंतर महाविकासघाडीतील तीन महत्वाचे घटक असलेले शिवसेना, राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि कॉंग्रेस पक्षाने देखील एक सहा पानांचे पत्र निवडणूक आयोगाला पाठवले आहे. कोरोनाने निर्माण केलेली परिस्थिती मान्य आहे, पण काही काळजी घेवून निवडणूक घेणे शक्य करावे अशी विनंती या पत्रात करण्यात आली आहे. राष्ट्रवादीकडून जयंत पाटील, काँग्रेसचे पत्र बाळासाहेब थोरात आणि शिवसेनेचे पत्र एकनाथ शिंदे ह्यांच्या स्वाक्षरीने पाठवण्यात आले आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Tukaram Mundhe : टीव्हीवर नेत्यांचा बोलबाला, पण सोशल मीडियावर तुकाराम मुंढेंचीच क्रेझ; मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनाही टाकले मागे
टीव्हीवर नेत्यांचा बोलबाला, पण सोशल मीडियावर तुकाराम मुंढेंचीच क्रेझ; मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनाही टाकले मागे
कामाचं बिल निघेना, अधिकारी पैसे मागतात? नांदेडच्या ठेकेदाराचं मुंबईत टोकाचं पाऊल; कुटुंबीयांकडून गंभीर आरोप
कामाचं बिल निघेना, अधिकारी पैसे मागतात? नांदेडच्या ठेकेदाराचं मुंबईत टोकाचं पाऊल; कुटुंबीयांकडून गंभीर आरोप
पेपरफुटीनंतर आता बोगस गुणपत्रिका रॅकेटचा पर्दाफाश; चंद्रपुरात एकास अटक, अलिशान गाड्या मार्कलिस्ट जप्त
पेपरफुटीनंतर आता बोगस गुणपत्रिका रॅकेटचा पर्दाफाश; चंद्रपुरात एकास अटक, अलिशान गाड्या मार्कलिस्ट जप्त
आम्ही रेल्वे फिरू देणार नाही, विमानं उडू देणार नाही; मुंबईत येतच असतो, मुंबईतील आंदोलन बंदीवरुन भडकले जरांगे पाटील
आम्ही रेल्वे फिरू देणार नाही, विमानं उडू देणार नाही; मुंबईत येतच असतो, मुंबईतील आंदोलन बंदीवरुन भडकले जरांगे पाटील

व्हिडीओ

Rohit Pawar & Rahul Gandhi Meet : रोहित आणि राहुल कशाची चाहूल? | ABP Majha Special Report
MPSC Paper Leak Case : MPSC पेपरफुटीची भन्नाट लव्हस्टोरी Special Report
Laxman Hake On OBC Andolan : ओबीसींच्या आरक्षणासाठी मुंबईत आंदोलन, सुरुवात कुठून? हाकेंनी सांगितलं
Sanjay Raut Mumbai PC : अमित शाहांसोबत देवेंद्र फडणवीस सुद्धा काम करायला तयार नाहीत
Sandeep Deshpande यांनी गणेश मंडळांना फटकारलं, आता गणपतीत फक्त गरबा बघायचा राहिलाय

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Aaditya Thackeray : वा रे प्रशासन! आदित्य ठाकरेंची पाहणी, बैठक संपून माघारी येण्यापूर्वीच लोटे एमआयडीसीतील खड्डा बुजवला
वा रे प्रशासन! आदित्य ठाकरेंची पाहणी, बैठक संपून माघारी येण्यापूर्वीच लोटे एमआयडीसीतील खड्डा बुजवला
Sunetra Pawar : चाकणच्या सर्वांगीण विकासासाठी विविध यंत्रणांनी समन्वयाने काम करावे, सुनेत्रा पवारांचे निर्देश
चाकणच्या सर्वांगीण विकासासाठी विविध यंत्रणांनी समन्वयाने काम करावे, सुनेत्रा पवारांचे निर्देश
कामाचं बिल निघेना, अधिकारी पैसे मागतात? नांदेडच्या ठेकेदाराचं मुंबईत टोकाचं पाऊल; कुटुंबीयांकडून गंभीर आरोप
कामाचं बिल निघेना, अधिकारी पैसे मागतात? नांदेडच्या ठेकेदाराचं मुंबईत टोकाचं पाऊल; कुटुंबीयांकडून गंभीर आरोप
4G Solar Camera For Farm : शेताच्या राखणीसाठी कोणता CCTV सर्वात चांगला? वीज आणि वाय-फायशिवाय मोबाईलवर लाईव्ह फुटेज
शेताच्या राखणीसाठी कोणता CCTV सर्वात चांगला? वीज आणि वाय-फायशिवाय मोबाईलवर लाईव्ह फुटेज
तुझे सगळे प्रॉमिस लक्षात आहेत; खवड्या डोंगरावरुन पडललेल्या कुणालसाठी मावस बहिणीची भावनिक पोस्ट
तुझे सगळे प्रॉमिस लक्षात आहेत; खवड्या डोंगरावरुन पडललेल्या कुणालसाठी मावस बहिणीची भावनिक पोस्ट
पेपरफुटीनंतर आता बोगस गुणपत्रिका रॅकेटचा पर्दाफाश; चंद्रपुरात एकास अटक, अलिशान गाड्या मार्कलिस्ट जप्त
पेपरफुटीनंतर आता बोगस गुणपत्रिका रॅकेटचा पर्दाफाश; चंद्रपुरात एकास अटक, अलिशान गाड्या मार्कलिस्ट जप्त
Tukaram Mundhe : गणेशोत्सवात मंडळांना महाप्रसादासाठी नवा नियम आहे? तुकाराम मुंढे म्हणाले...
गणेशोत्सवात मंडळांना महाप्रसादासाठी नवा नियम आहे? तुकाराम मुंढे म्हणाले...
YouTube Earning Tax : यूट्यूबवरुन होणाऱ्या कमाईवर भारतात किती कर लागतो?  जीएसटी भरावा लागतो का?
यूट्यूबवरुन होणाऱ्या कमाईवर भारतात किती कर लागतो?  जीएसटी भरावा लागतो का?
Embed widget