एक्स्प्लोर
Advertisement
पारदर्शकतेमध्ये मुंबईला शून्य गुण, मुख्यमंत्र्यांकडून भरसभेत अहवालाचं वाचन
मुंबई : केंद्राच्या अहवालाचा दाखल देत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी मुंबई महापालिकेचे कौतुक केलं खरे, पण आजच्या प्रचारसभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंच्या कौतुकाचे पार वाभाडे काढले. केंद्राच्या अहवालानुसार मुंबई महापालिका कशाप्रकारे तिसऱ्या स्थानावर आहे, हे सागंताना मुख्यमंत्र्यांनी शिवसेनेवर आणि मुंबई महापालिकेतील कारभारावर तुफान टीकास्त्र सोडलं.
मुंबई महापालिकेसाठी भाजपची पहिली प्रचारसभा आज मुंबईत पार पडली. मुलुंडमध्ये झालेल्या प्रचारसभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेवर तुफान हल्ला चढवला.
केंद्राच्या अहवालाचा शिवेसेने विपर्यास करुन, लोकांची दिशाभूल केली आहे. देशात हैदराबाद महापालिका पहिल्या क्रमांकावर आहे, बंगळुरु महापालिका दुसऱ्या क्रमांकावर, तर मुंबई महापालिका तिसऱ्या क्रमांकावर आहे, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
केंद्राच्या अहवालात वॉर्डनिहाय वित्तीय माहिती देण्यात मुंबई महापालिकेला शून्य गुण, नागरी कामाबद्दल शून्य गुण, पारदर्शक कारभाराबाबत शून्य गुण आहेत, असे सांगत मुख्यमंत्र्यांनी उद्धव ठाकरेंवरही निशाणा साधला. मुख्यमंत्री म्हणाले, "अर्धवट वाचलं किंवा चुकीचे सल्लागार ठेवले, तर तोंडघशी पडायला होतं, तसं शिवसेनेचं झालं आहे. उद्धव ठाकरेंच्या सल्लागारांनी अहवाल नीट वाचला असता, तर लक्षात आलं असतं की, मुंबई महापालिकेची इज्जत राज्य सरकारमुळे वाचवली."
मुंबईचा इतका विकास झाला की, मुंबईचा 'पाटणा' झाला, असे म्हणत मुख्यमंत्र्यांनी शिवसेनेला टोमणा मारला.
डम्पिंग ग्राऊंड घोटाळ्यांवरूनही टीकास्त्र
मुलुंडच्या डम्पिंग ग्राऊंडचं काम हायकोर्टाच्या मुदतीआधी पूर्ण करु आणि काम करण्याची जबाबदारी मी घेतो. डम्पिंग ग्राऊंड बंद करु, असे सांगत मुख्यमंत्र्यांनी मुलुंडकरांना डम्पिंग ग्राऊंडबाबत आश्वासन दिलं. डम्पिंग ग्राऊंडमध्ये मोठा घोटाळा झाल्याचा आरोपही मुख्यमंत्र्यांनी केला.
मेट्रोच्या माध्यमातून 70 लाख प्रवासी प्रवास करु शकतील, असं मेट्रोचं जाळं तयार करत आहोत. शिवाय ट्रान्स हार्बर लिंकचं काम जूनपासून सुरु होत आहे, कोस्टल रोडसाठीही परवानग्या आणल्या आहेत, अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली.
हे सांगत असताना मुख्यमंत्र्यांनी पुन्हा एकदा शिवसेनेवर निशाणा साधला. "मुंबई महापालिकेचं बजेट 35 हजार कोटींचं, तरी मुंबईची अवस्था अशी का?", असा सवाल मुख्यमंत्र्यांनी विचारला.
मुख्यमंत्र्यांच्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे :
आम्ही पारदर्शकतेचा आग्रह करतच राहणार - मुख्यमंत्री
- चुकीचे सल्लागार ठेवल्याने शिवसेनेकडून पारदर्शकतेचा दावा - मुख्यमंत्री
- अर्धवट वाचलं आणि चुकीचे सल्लागार ठेवले तर तोंडघशी पडायला होतं, तसं शिवसेनेचं झालंय - मुख्यमंत्री
- केंद्राच्या अहवालानुसार, हैदराबाद महापालिका पहिल्या क्रमांकावर - मुख्यमंत्री
- केंद्राच्या अहवालानुसार, मुंबई महापालिका तिसऱ्या क्रमांकावर - मुख्यमंत्री
- विकास आणि पारदर्शी कारभार हाच आमचा अजेंडा - मुख्यमंत्री
- उद्धव ठाकरेंच्या सल्लागारांनी अहवाल नीट वाचला असता, तर इज्जत वाचली हे लक्षात आलं असतं - मुख्यमंत्री
- केंद्राच्या अहवालात राज्य सरकारमुळे मुंबई महापालिकेची इज्जत वाचली - मुख्यमंत्री
- सात वर्षांपासून मुंबईच्या इंटरनल ऑडिटला मान्यता देण्यात आली नाही
- मुख्यमंत्री
- मुंबईचा इतका विकास झाला की मुंबईचा 'पटना' झाला - मुख्यमंत्री
- शिवसेनेकडून केंद्राच्या अहवालाचा प्रचारात चुकीचा वापर - मुख्यमंत्री
- मुलुंडच्या डम्पिंग ग्राऊंडचं काम हायकोर्टाच्या मुदतीआधी करु, कामाची मी जबाबदारी घेतो - मुख्यमंत्री
- डम्पिंग ग्राऊंडमध्ये मोठा घोटाळा - मुख्यमंत्री
- मुलुंडचं डम्पिंग ग्राऊंड बंद करु - मुख्यमंत्री
- मेट्रोच्या माध्यमातून 70 लाख प्रवासी प्रवास करु शकतील, असं मेट्रोचं जाळं तयार करत आहोत - मुख्यमंत्री
- मुंबई महापालिकेचा बजेट 35 हजार कोटींचा, तरी मुंबईची अवस्था अशी का? - मुख्यमंत्री
- आम्हाला केवळ बोट दाखवायचं नाहीय, मुंबई चांगली करायची आहे - मुख्यमंत्री
- टेंडरिंग बघितलं असतं तर अहवालात मुंबई शेवटच्या क्रमांकावर असती - मुख्यमंत्री
- मुंबईत कुठलंही माध्यमातून प्रवास केला तरी तिकीट एकच, यावर राज्य सरकारकडून काम सुरुय - मुख्यमंत्री
- मुंबईला देशातील पहिलं वाय-फाय शहर आम्ही करुन दाखवलं - मुख्यमंत्री
- ट्रान्स हार्बर लिंकचं काम जूनपासून सुरु करत आहोत - मुख्यमंत्री
- कोस्टल रोडच्या परवानग्या आम्ही आणल्या - मुख्यमंत्री
- मुंबईत 10 लाख घरांची निर्मिती करायची आहे - मुख्यमंत्री
- मुंबई महापालिकेत 20 वर्षे जे सत्तेत आहे, त्यांनी मुंबईसाठी काय केलं? - मुख्यमंत्री
- मुंबई महापालिकेच्या 50-50 हजार कोटींच्या एफडी, तो पैसा जनतेसाठी वापरायला हवा - मुख्यमंत्री
- भाजपच्या जाहीरनाम्यातील प्रत्येक गोष्ट पूर्ण करु, हे राज्याचा प्रमुख म्हणून विश्वासाने सांगतो – मुख्यमंत्री
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
भविष्य
क्रिकेट
सोलापूर
Advertisement