एक्स्प्लोर

आषाढीनिमित्त मुख्यमंत्र्यांनी 'ती' थरारक आठवण सांगितली

मुख्यमंत्र्यांनी घरी केलेल्या पूजेचे फोटो ट्विटरवर शेअर केले आहेत. यावेळी त्यांनी विठ्ठलाच्या कृपेनंच आपण हेलिकॉप्टर अपघातातून बचावल्याचं ट्विटही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे.

पंढरपूर: पंढरपुरात पहाटे साडेतीन वाजण्याच्या सुमारास विठूरायाची शासकीय महापूजा पार पडली. मुख्यमंत्र्यांच्या अनुपस्थितीत यंदा पूजेचा मान हिंगोलीच्या जाधव दाम्पत्याला मिळाला. अनिल जाधव आणि वर्षा जाधव यांनी विठ्ठल आणि रुक्मिणीची महापूजा केली. जाधव दाम्पत्य हे शेणगाव तालुक्यातील भगवती गावचे रहिवासी आहेत. मुख्यमंत्र्या ‘वर्षावर सपत्नीक पूजा पंढरपुरात विठ्ठलाची महापूजा सुरु असतानाच इकडे मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वर्षा या शासकीय निवासस्थानी विठ्ठलाची सपत्नीक पूजा केली. मराठा आरक्षणाच्या मागणीवरुन काही आंदोलकांनी मुख्यमंत्र्यांना पंढरपुरात येण्यास विरोध केला होता. त्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी पंढरपुरात जाण्याचं टाळलं. मुख्यमंत्र्यांनी घरी केलेल्या पूजेचे फोटो ट्विटरवर शेअर केले आहेत. यावेळी त्यांनी  विठ्ठलाच्या कृपेनंच आपण हेलिकॉप्टर अपघातातून बचावल्याचं ट्विटही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. मुख्यमंत्री काय म्हणाले? पंढरपूर, अवघ्या महाराष्ट्राचं माहेर... हिंगोली जिल्ह्यातील भगवती गावातील (तालुका-शेणगाव) सौ. वर्षाताई आणि श्री अनिल गंगाधर जाधव या शेतकरी दाम्पत्याने आज माऊलीची शासकीय महापूजा केली, याचा मला विशेष आनंद आहे. या दाम्पत्याचे मन:पूर्वक अभिनंदन ! 24 मे 2017 : राज्यातील जलयुक्त शिवारच्या कामांची पाहणी करण्यासाठी आपण लातूरच्या दौऱ्यावर होतो. खरोसा टेकडीवर कीर्तनाचा कार्यक्रम होता. श्री वसंत पाटील या आमच्या कार्यकर्त्याने विठ्ठल-रूख्मिणीची एक मूर्ती मला भेट दिली. 25 मे 2017: काही गावांच्या भेटी आटोपून परतीच्या प्रवासाला निघालो, तेव्हा हेलिकॉप्टरचा अपघात झाला. सारे काही तुटले. पण, सुखरूप वाचलो अन् सुखरूप राहिली ती ही मूर्ती! मी अंधश्रद्धा मानत नाही. पण, हा तर माऊलीचाच आशिर्वाद होता. तेव्हापासूनच ती मूर्ती माझ्या देवघरात रोजच्या पूजेत आहे. आज काही कारणांमुळे प्रत्यक्ष पंढरपुरात माऊलीचे पूजन करता आले नाही. पण, वर्षा या शासकीय निवासस्थानी सपत्नीक, कुटुंबीयांसह मनोभावे, भक्तीभावे विठोबा-रखुमाईच्या त्याच मूर्तीचे पूजन केले. दुरितांचे तिमिर जावो । विश्व स्वधर्म सूर्ये पाहो । जो जे वांच्छिल तो तें लाहो । प्राणिजात ॥ राज्यातील बळीराजा सुखी होऊ दे, सकलांच्या सर्व मनोकामना पूर्ण होऊ दे, महाराष्ट्राच्या यशाची पताका अशीच उंच फडकू दे, अशी मनोभावे प्रार्थना केली. येथ म्हणे श्री विश्वेशराओ । हा होईल दान पसावो । येणें वरें ज्ञानदेवो । सुखिया जाहला ॥ तीर्थ विठ्ठल, क्षेत्र विठ्ठल देव विठ्ठल, देवपूजा विठ्ठल... गुरू विठ्ठल, गुरूदेवता विठ्ठल निधान विठ्ठल, निरंतर विठ्ठल... संबंधित बातम्या  जाधव दाम्पत्याला शासकीय पूजेचा मान, मुख्यमंत्र्यांची 'वर्षा'वर विठूपूजा   माझ्यावर दगडफेक करुन आरक्षण मिळत असेल तर मी तयार आहे : मुख्यमंत्री  

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Live News Updates: जंतर मंतरवर काही काळ गदारोळ, पुन्हा तणावपूर्ण शांतता
Maharashtra Live News Updates: जंतर मंतरवर काही काळ गदारोळ, पुन्हा तणावपूर्ण शांतता
Narendra Modi on CJP Protest Delhi Jantar Mantar: काँकरोच जनता पार्टीच्या आंदोलनावर नरेंद्र मोदींची पहिली प्रतिक्रिया, NEET पेपरफुटी प्रकरणावर महत्वाचे आदेश
काँकरोच जनता पार्टीच्या आंदोलनावर नरेंद्र मोदींची पहिली प्रतिक्रिया, NEET पेपरफुटी प्रकरणावर महत्वाचे आदेश
VBA Maharashtra Bandh: वंचित बहुजन आघाडीच्या महाराष्ट्र बंदला शरदचंद्र पवारांच्या पक्षाचा पाठिंबा; तर वंचितच्या कार्यकर्त्यांना पोलिसांकडून नोटीस, कायदेशीर कारवाईचा इशारा
वंचित बहुजन आघाडीच्या महाराष्ट्र बंदला शरदचंद्र पवारांच्या पक्षाचा पाठिंबा; तर वंचितच्या कार्यकर्त्यांना पोलिसांकडून नोटीस, कायदेशीर कारवाईचा इशारा
Divija Fadnavis on CJP Protest Delhi Jantar Mantar: काँकरोच जनता पार्टीच्या जंतर मंतरवरील आंदोलनावर दिविजा फडणवीस यांनी रोखठोक मत मांडलं; काय काय म्हणाल्या?
काँकरोच जनता पार्टीच्या जंतर मंतरवरील आंदोलनावर दिविजा फडणवीस यांनी रोखठोक मत मांडलं; काय काय म्हणाल्या?

व्हिडीओ

Uddhav Thackeray PC Delhi :डोक्यात हवा गेलीय, मस्ती विरोधात सगळा देश पेटलाय, उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
Uddhav Thackeray Delhi Speech : 'ही पेटलेली ठिणगी आता विझू देऊ नका!'; उद्धव ठाकरेंचा एल्गार
Dharmendra Pradhan On Rahul Gandhi:राहुल गांधींची टीका अन् राजीनाम्याच्या मागणीवर धर्मेंद्र प्रधान यांचं प्रत्युत्तर
Priyanka Gandhi On CJP Protest : पोलिसांच्या ताब्यातून सुटका, प्रियांका गांधींची पहिली प्रतिक्रिया
Raj Thackeray on Delhi : पोलिसांचा विद्यार्थ्यांवर बेछूट लाठीमार, राज ठाकरेंनी केंद्र सरकारला सुनावलं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sonam Wangchuk Health Update: उपोषणावरती सोनम वांगचुक अद्यापही ठाम; डॉक्टरांनी सांगितली तब्येतीची अपडेट, म्हणाले 'दुष्परिणाम त्यांच्या ऑर्गन्सवर होऊ शकतो, सरकारने...'
उपोषणावरती सोनम वांगचुक अद्यापही ठाम; डॉक्टरांनी सांगितली तब्येतीची अपडेट, म्हणाले 'दुष्परिणाम त्यांच्या ऑर्गन्सवर होऊ शकतो, सरकारने...'
Sameer Choughule Angry On Student Protest: 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम समीर चौघुलेंची विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर खरमरीत पोस्ट, नको-नको ते बरळणाऱ्यांनाही खडसावलं, म्हणाले...
'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम समीर चौघुलेंची विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर खरमरीत पोस्ट, नको-नको ते बरळणाऱ्यांनाही खडसावलं, म्हणाले...
Nashik Rain: नाशिकमध्ये जोर'धार', दुतोंड्या मारुतीच्या कमरेपर्यंत पाणी; गंगापूर धरणातून विसर्ग वाढवला, त्र्यंबकेश्वरला पत्रे उडून तीन भाविक जखमी
नाशिकमध्ये जोर'धार', दुतोंड्या मारुतीच्या कमरेपर्यंत पाणी; गंगापूर धरणातून विसर्ग वाढवला, त्र्यंबकेश्वरला पत्रे उडून तीन भाविक जखमी
Pune Leopard Attack : गोठ्यात झोपलेली; पहाटे तीनच्या सुमाराच्या तो आला अन्...; चिमुरडी किंचाळल्यानंतर आई-वडिलांनी पाहिलं, तोपर्यंत तिला बिबट्यानं जबड्यात धरून उसात धूम ठोकली
गोठ्यात झोपलेली; पहाटे तीनच्या सुमाराच्या तो आला अन्...; चिमुरडी किंचाळल्यानंतर आई-वडिलांनी पाहिलं, तोपर्यंत तिला बिबट्यानं जबड्यात धरून उसात धूम ठोकली
Narendra Modi on CJP Protest Delhi Jantar Mantar: काँकरोच जनता पार्टीच्या आंदोलनावर नरेंद्र मोदींची पहिली प्रतिक्रिया, NEET पेपरफुटी प्रकरणावर महत्वाचे आदेश
काँकरोच जनता पार्टीच्या आंदोलनावर नरेंद्र मोदींची पहिली प्रतिक्रिया, NEET पेपरफुटी प्रकरणावर महत्वाचे आदेश
Divija Fadnavis on CJP Protest Delhi Jantar Mantar: काँकरोच जनता पार्टीच्या जंतर मंतरवरील आंदोलनावर दिविजा फडणवीस यांनी रोखठोक मत मांडलं; काय काय म्हणाल्या?
काँकरोच जनता पार्टीच्या जंतर मंतरवरील आंदोलनावर दिविजा फडणवीस यांनी रोखठोक मत मांडलं; काय काय म्हणाल्या?
VBA Maharashtra Bandh: वंचित बहुजन आघाडीच्या महाराष्ट्र बंदला शरदचंद्र पवारांच्या पक्षाचा पाठिंबा; तर वंचितच्या कार्यकर्त्यांना पोलिसांकडून नोटीस, कायदेशीर कारवाईचा इशारा
वंचित बहुजन आघाडीच्या महाराष्ट्र बंदला शरदचंद्र पवारांच्या पक्षाचा पाठिंबा; तर वंचितच्या कार्यकर्त्यांना पोलिसांकडून नोटीस, कायदेशीर कारवाईचा इशारा
Sunetra Pawar : अपघातग्रस्त तरुणीला उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांची तात्काळ मदत; संवेदनशीलतेतून अजितदादांच्या कार्यशैलीची आठवण
अपघातग्रस्त तरुणीला उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांची तात्काळ मदत; संवेदनशीलतेतून अजितदादांच्या कार्यशैलीची आठवण
Embed widget