एक्स्प्लोर
पांढरीशुभ्र दाढी, पांढरे केस, भुजबळांचा नवा फोटो 'माझा'कडे

मुंबई : राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांचा जेजे रुग्णालयातला नवा फोटो 'एबीपी माझा'च्या हाती लागला आहे. पांढरी दाढी, पांढरे केस या रुपातील भुजबळ रुग्णालयाच्या पॅसेजमध्ये चालताना दिसत आहेत. भुजबळांनी जामीन मिळवण्यासाठी केलेल्या याचिकेवर आज उच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. यापूर्वीही भुजबळांनी कोर्टाकडे अनेकदा अपील केलेलं होतं, मात्र यावेळी शेवटची याचिका असेल. त्यामुळे भुजबळांचा मुक्काम कारागृहात असणार की त्यांना जामीन मिळणार, हे स्पष्ट होईल. गेल्या काही दिवसांपासून जेजे रुग्णालयात दाखल असलेल्या छगन भुजबळांची अँजिओग्राफी करण्यात येणार होती. पण त्यांनीच नकार दिल्यामुळे त्यांची रवानगी पुन्हा आर्थर रोड कारागृहात करण्यात येणार आहे. बॉम्बे हॉस्पिटलमध्ये 2 नोव्हेंबर रोजी त्यांच्या विविध चाचण्या करण्यात आल्या. यानंतर हॉस्पिटलचे वरिष्ठ कार्डिओलॉजिस्ट डॉ. बी. के. गोयल यांनी त्यांना अँजिओग्राफी करण्याचा सल्ला दिला. दरम्यान, छगन भुजबळ हे विराट कोहलीप्रमाणेच फिट असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी काही दिवसांपूर्वी केला होता.
आणखी वाचा























