एक्स्प्लोर
मुंबईतल्या हाजी अली दर्ग्याजवळ कारचा भीषण अपघात
रस्त्यालगतचे लोखंडी बॅरिकेट तोडून ही कार कठडावरुन थेट समुद्रकिनारी आदळली. हा अपघात एवढा भीषण होता की, यामध्ये कारचा अक्षरश: चुराडा झाला.
![मुंबईतल्या हाजी अली दर्ग्याजवळ कारचा भीषण अपघात Car Accident In Mumbai Latest Update मुंबईतल्या हाजी अली दर्ग्याजवळ कारचा भीषण अपघात](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2017/09/28223358/car-accident.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
मुंबई : मुंबईतल्या प्रसिद्ध हाजी अली दर्ग्याजवळच्या समुद्रकिनारी काल (बुधवार) रात्री कारचा भीषण अपघात घडला. याप्रकरणी 35 वर्षीय कार चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.
एक लाल रंगाची वॅगन आर कार कठडा ओलांडून समुद्र किनाऱ्याजवळ उलटली. कारची अवस्था पाहून ती किती वेगानं पलटली असेल याची पुरेपुर कल्पना येते. मध्यरात्री दोन ते अडीच दरम्यान हा अपघात झाल्याचं समजतं आहे.
रस्त्यालगतचे लोखंडी बॅरिकेट तोडून ही कार कठडावरुन थेट समुद्रकिनारी आदळली. हा अपघात एवढा भीषण होता की, यामध्ये कारचा अक्षरश: चुराडा झाला. दरम्यान, अपघातात काही जण जखमी झाल्याची प्राथमिक माहिती मिळते आहे.
VIDEO :
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
परभणी
राजकारण
करमणूक
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)