एक्स्प्लोर
म्हाडामध्ये आमदार, खासदारांचं आरक्षण रद्द करा, आमदाराचं मुख्यमंत्र्यांना पत्र
मुंबईः म्हाडा म्हणजेच महाराष्ट्र गृहनिर्माण आणि क्षेत्रविकास प्राधिकरणात खासदार आणि आमदारांना आरक्षण देण्यात येऊ नये, त्यांच्याऐवजी गरिबांना घरं द्या, असं पत्र अपक्ष आमदार कपिल पाटील यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलं आहे.
गरिबांना हक्काची घरं मिळवून देणं हा म्हाडाचा उद्देश आहे, आमदार आणि खासदार, प्रशासकीय अधिकारी हा वर्ग गरिबांमध्ये मोडत नाही, त्यामुळे त्यांना कमी किंमतीत घरे देऊ नये. त्याऐवजी खेळाडू, पत्रकार, कलाकार आणि समाजासाठी योगदान देणाऱ्या इतरांना कमी किंमतीत घरे उपलब्ध करुन द्यावीत, अशी मागणी पाटील यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.
माजी आमदार खासदारांना म्हाडाने 19 घरे आरक्षित ठेवली आहेत. याला आरपीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी नुकताच विरोध दर्शवला होता. या आरक्षित घरांपैकी 13 घरं आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक, कमी उत्पन्न असणारा वर्ग आणि मध्यमवर्गीयांसाठी आरक्षित आहेत.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रीडा
बीड
क्रीडा
विश्व
Advertisement