एक्स्प्लोर

मुंबई महानगर क्षेत्रात लवकरच केबल कार प्रकल्प; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक नितीन गडकरींची भेट घेणार

Nitin Gadkari : मुंबई महानगर क्षेत्रात लवकरच केबल कार प्रकल्प राबवला जाणार असल्याची माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली आहे. यासाठी नितीन गडकरींची ते भेटी घेणार आहे.

मुंबई : नवी दिल्ली येथे 7 जानेवारी रोजी होणाऱ्या विकसित भारत 2047 या महत्वाकांक्षी प्रकल्पाच्या लक्षप्राप्तीच्या दृष्टीने केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या सर्व राज्यांच्या परिवहन मंत्र्यांच्या बैठकीस महाराष्ट्राचे परिवहन म्हणून मंत्री प्रताप सरनाईक (Transport Minister Pratap Sarnaik) उपस्थित राहणार आहेत. या बैठकीदरम्यान केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांची विशेष भेट घेऊन मुंबई महानगर क्षेत्रामध्ये केबल कार प्रकल्प राबवण्यासाठी केंद्र सरकार द्वारे 'पर्वतमाला परियोजना' अंतर्गत सार्वजनिक खाजगी भागीदारी (PPP) अथवा केंद्र व राज्य शासनाच्या संयुक्त आर्थिक भागिदारीने रोप वे विकसित करण्याचा मानस व्यक्त केला जाणार आहे.

परिवहन मंत्री प्रताप सरनाईक नितीन गडकरींची भेट घेणार

मुंबई महानगर क्षेत्र विकास प्राधिकरणाच्या दृष्टीने या प्रकल्पाचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. पालघर पासून रायगड जिल्ह्यातील उरण-पेण पर्यंत पसरलेल्या एकूण क्षेत्रामध्ये नागरिकरणाचा वेग वाढत आहे. रस्ते वाहतूक, रेल्वे, मेट्रो यासारख्या सार्वजनिक वाहतूक सेवेवर दिवसेंदिवस पडणार ताण लक्षात घेता भविष्यात केबल कारसारखी हवाई सेवा विकसित होणे आवश्यक आहे. त्यासाठी या प्रकल्पाचे सर्वेक्षण करून विकास आराखडा (DPR) तयार करणे गरजेचे असून त्याला केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री  म्हणून नितीन गडकरी यांनी विशेष परवानगी देणे आवश्यक आहे. या भेटी दरम्यान  केंद्रीय मंत्री गडकरी यांना या प्रकल्पाचे सादरीकरण करुन मुंबई क्षेत्र विकास प्राधिकरणाच्या दृष्टीने या प्रकल्पाचे महत्त्व विशद केले जाईल. अशी माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली.

नाविन्यपूर्ण प्रकल्पाचा अभ्यास करून वाहतूक समस्या सोडवण्यासाठी ठोस प्रयत्न

मुंबई महानगर क्षेत्रातील वाढते नागरीकरण, वाहनांची वाढती संख्या, त्या तुलनेत अपुरी रस्ते व रेल्वे सेवा, वाढते प्रदूषण या कारणामुळे काही धोरणात्मक निर्णय घेऊन आधुनिक तंत्रज्ञान व पाश्चात देशातील यशस्वी झालेल्या नाविन्यपूर्ण प्रकल्पाचा अभ्यास करून वाहतूक समस्या सोडवण्यासाठी ठोस प्रयत्न करणे ही काळाची गरज आहे. तसेच मुंबई महानगरास  प्राप्त झालेले महत्त्वपूर्ण भौगोलिक स्थान, सागरी किनारा खाडीचा प्रदेश, एलिफंटासारखी प्राचीन लेणी, माथेरान सारखे थंड हवेचे पर्यटन स्थळ, संजय गांधी राष्ट्रीय उद्यान, तुंगारेश्वर वन्यजीव अभयारण्य यासारखी हरित चादर जतन करून मुंबई महानगर क्षेत्र विकास प्राधिकरणाच्या वाहतूक व्यवस्थेमध्ये सुधारणा करण्यासाठी रोप वेच्या माध्यमातून 'केबल कार'  प्रकल्प राबवणे अत्यंत आवश्यक असल्याचे मत यावेळी मंत्री सरनाईक यांनी व्यक्त केले. या प्रकल्पाचे महत्त्व केंद्रीय रस्ते  वाहतूक व महामार्ग मंत्री, नितीन गडकरी यांना पटवून देऊन या प्रकल्पाचे सर्वेक्षण करून विकास आराखडा तयार करण्याची तत्वतः मान्यता घेण्याचा प्रयत्न राहील अशी माहिती त्यांनी यावेळी दिली.

हे ही वाचा 

 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Uttarakhand UCC : लिव्ह-इनमध्ये राहण्यासाठी पालकांची मंजुरी आवश्यक, संबंधातून मूल झाल्यास त्याला कायदेशीर अधिकार; 'या' राज्यात समान नागरी कायदा लागू
लिव्ह-इनमध्ये राहण्यासाठी पालकांची मंजुरी आवश्यक, संबंधातून मूल झाल्यास त्याला कायदेशीर अधिकार; 'या' राज्यात समान नागरी कायदा लागू
Delhi Election : इकडं भाजपच्या दिल्लीकरांसाठी तीन टप्प्यात जाहीरनामा, तिकडं माजी सीएम केजरीवालांकडून 15 गॅरेंटी अन् माफी सुद्धा मागितली!
इकडं भाजपच्या दिल्लीकरांसाठी तीन टप्प्यात जाहीरनामा, तिकडं माजी सीएम केजरीवालांकडून 15 गॅरेंटी अन् माफी सुद्धा मागितली!
Nanded News : माहेरहून सोनं आणण्याचा तगादा, नांदेडमध्ये विवाहितेचा संशयास्पद मृत्यू; मात्र लेकीची हत्या केल्याचा माहेरच्यांचा आरोप, गुन्हा दाखल 
माहेरहून सोनं आणण्याचा तगादा, नांदेडमध्ये विवाहितेचा संशयास्पद मृत्यू; मात्र लेकीची हत्या केल्याचा माहेरच्यांचा आरोप
पोलिसाचं रेकॉर्डींग व्हायरल करणाऱ्या आठवले गँगवरही मकोका; बीड पोलिसांची दुसरी मोठी कारवाई
पोलिसाचं रेकॉर्डींग व्हायरल करणाऱ्या आठवले गँगवरही मकोका; बीड पोलिसांची दुसरी मोठी कारवाई
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

पर्यावरणपूरक गणेशोत्सव स्पर्धा 2024 | महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ| Akshay Kothari, Isha KesakarABP Majha Headlines : एबीपी माझा हेडलाईन्स :  3 PM : 27 Jan 2025 : ABP MajhaMahaKumbh Mela | Amit Shah  यांचं  प्रयागराज मध्ये महाकुंभमेळ्यात पवित्र स्नानAmey Khopakar :Chhaava चित्रपटावर MNS ची भूमिका काय? Laxman Utekar Raj Thackeray भेटीची A - Z माहिती

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Uttarakhand UCC : लिव्ह-इनमध्ये राहण्यासाठी पालकांची मंजुरी आवश्यक, संबंधातून मूल झाल्यास त्याला कायदेशीर अधिकार; 'या' राज्यात समान नागरी कायदा लागू
लिव्ह-इनमध्ये राहण्यासाठी पालकांची मंजुरी आवश्यक, संबंधातून मूल झाल्यास त्याला कायदेशीर अधिकार; 'या' राज्यात समान नागरी कायदा लागू
Delhi Election : इकडं भाजपच्या दिल्लीकरांसाठी तीन टप्प्यात जाहीरनामा, तिकडं माजी सीएम केजरीवालांकडून 15 गॅरेंटी अन् माफी सुद्धा मागितली!
इकडं भाजपच्या दिल्लीकरांसाठी तीन टप्प्यात जाहीरनामा, तिकडं माजी सीएम केजरीवालांकडून 15 गॅरेंटी अन् माफी सुद्धा मागितली!
Nanded News : माहेरहून सोनं आणण्याचा तगादा, नांदेडमध्ये विवाहितेचा संशयास्पद मृत्यू; मात्र लेकीची हत्या केल्याचा माहेरच्यांचा आरोप, गुन्हा दाखल 
माहेरहून सोनं आणण्याचा तगादा, नांदेडमध्ये विवाहितेचा संशयास्पद मृत्यू; मात्र लेकीची हत्या केल्याचा माहेरच्यांचा आरोप
पोलिसाचं रेकॉर्डींग व्हायरल करणाऱ्या आठवले गँगवरही मकोका; बीड पोलिसांची दुसरी मोठी कारवाई
पोलिसाचं रेकॉर्डींग व्हायरल करणाऱ्या आठवले गँगवरही मकोका; बीड पोलिसांची दुसरी मोठी कारवाई
महायुती सरकार राज्यातील वाघांची नसबंदी करणार? मोदी सरकारकडे पाठवणार प्रस्ताव, वनमंत्री नाईकांची माहिती  
महायुती सरकार राज्यातील वाघांची नसबंदी करणार? मोदी सरकारकडे पाठवणार प्रस्ताव, वनमंत्री नाईकांची माहिती  
बांगलादेशींना बनावट जन्मदाखले दिल्याचा ठपका, नितीनकुमार देवरे निलंबित, आता तहसीलदार संघटनेची शासनाकडे मोठी मागणी
बांगलादेशींना बनावट जन्मदाखले दिल्याचा ठपका, नितीनकुमार देवरे निलंबित, आता तहसीलदार संघटनेची शासनाकडे मोठी मागणी
Hasan Mushrif : म्हणून मी लवकर निघालो, वाशिममधून तडकाफडकी कोल्हापूरला रवाना होताच हसन मुश्रीफांचा खुलासा!
म्हणून मी लवकर निघालो, वाशिममधून तडकाफडकी कोल्हापूरला रवाना होताच हसन मुश्रीफांचा खुलासा!
सुषमा अंधारे येताच माजी आमदाराने बैठक सोडली, खोचक प्रतिक्रिया; पुण्यात ठाकरेंच्या शिवसेनेत नाराजी?
सुषमा अंधारे येताच माजी आमदाराने बैठक सोडली, खोचक प्रतिक्रिया; पुण्यात ठाकरेंच्या शिवसेनेत नाराजी?
Embed widget