एक्स्प्लोर

सुषमा अंधारे येताच माजी आमदाराने बैठक सोडली, खोचक प्रतिक्रिया; पुण्यात ठाकरेंच्या शिवसेनेत नाराजी?

सुषमा अंधारे बैठकीला येताच माजी आमदार चंद्रकांत मोकाटे यांनी शिवसेनेच्या बैठकीतून काढता पाय घेतल्याचं पाहायला मिळालं.

पुणे : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी शिवसेनेनं (Shivsena) स्वबळाचा नारा दिल्यानंतर आता शिवसेना नेत्यांकडून बैठकाही घेतल्या जात आहेत. त्याच अनुषंगाने मुंबईनंतर महत्त्वाचा जिल्हा असलेल्या पुणे जिल्ह्यातील शिवसेना नेत्यांची बैठक खासदार संजय राऊत यांच्या प्रमुख उपस्थितीत घेण्यात आली. या बैठकीला शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे (Sushma andhare) याही उपस्थित होत्या, मात्र त्या उशिरा आल्याने त्यांच्यासाठी खुर्ची सोडावी लागल्याने माजी आमदार चंद्रकांत मोकाटे यांनी नाराजी व्यक्त केली आहे. मात्र, शिवसेनेत कुठलीही नाराजी नसल्याचे संजय राऊत यांनी बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना स्पष्ट केले. दरम्यान, सुषमा अंधारे विधानसभा निवडणुकांसाठी इच्छुक होत्या, पण स्थानिक राजकीय गणितं न जुळल्याने त्यांना शिवसेनेनं तिकीट नाकारलं होतं. आता, आगामी निवडणुकांच्या अनुषंगाने पुन्हा तीच नाराजी दिसून येत आहे.  

सुषमा अंधारे बैठकीला येताच माजी आमदार चंद्रकांत मोकाटे यांनी शिवसेनेच्या बैठकीतून काढता पाय घेतल्याचं पाहायला मिळालं. शिवसेना प्रवक्ते व खासदार संजय राऊत, आमदार सचिन अहिर यांच्या अध्यक्षतेखाली पुण्यात सुरु असणाऱ्या बैठकीतून चंद्रकांत मोकाटे हे तडकाफडकी निघून गेले. या बैठकीसाठी शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे पोहचल्यावर तिथं बसायला त्यांना जागा नव्हती, त्यामुळे मी माझी खुर्ची त्यांना दिली आणि निघून आलो. त्या आमच्या नेत्या आहेत, त्या मंचावरचं बसणार ना? अशी खोचक प्रतिक्रिया देत मोकाटे यांनी नाराजी व्यक्त केली. त्यामुळे, पुण्यातील बैठकीत सुषमा अंधारेंच्या नेतृत्वावरुन शिवसेनेत नाराजी असल्याचं पुन्हा उघड झालं आहे.  

चंद्रकांत मोकाटे हे शिवसेनेचे माजी आमदार आहेत. पुण्यात ठाकरे गटात जे काही नेते उरले आहेत, त्यातील सर्वात जेष्ठ नेते हे चंद्रकांत मोकाटे आहेत. त्यामुळे, त्यांच्या नाराजीची पुणे शिवसेनेच्या राजकीय वर्तुळाच जोरदार चर्चा रंगली आहे. दरम्यान, चंद्रकांत मोकाटे यांनी चंद्रकांत पाटील यांच्या विरोधात कोथरूड विधानसभा मतदारसंघात निवडणूक लढवली आहे.

संजय राऊतांनी नाकारली नाराजीची चर्चा

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत शिवसेनेचा स्वबळाचा नारा हा फक्त मुंबईसाठी आहे. कारण, मुंबईची परिस्थिती वेगळी आहे. राज्यात इतर ठिकाणी महाविकास आघाडी म्हणूनच निवडणुका लढणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. तसेच, ⁠पुण्याच्या शिवसेनेत कोणतीही नाराजी नाही. माजी आमदार चंद्रकांत मोकाटे बैठक सोडून गेले नाहीत, ते सुरवातीपासून बैठकीला उपस्थित होते असे स्पष्टीकरणही त्यांनी दिले. 

सुषमा अंधारेंची प्रताप सरनाईकांवर टीका

शिवसेना नेते व मंत्री प्रताप सरनाईक यांनी ठाकरेंचे आमदार भविष्यात शिवसेनेत येणार असल्याचे म्हटले होते. त्याअनुषंगाने सुषमा अंधारेंनी प्रतिक्रिया दिली. स्वतःच्या ताटात काय वाढून ठेवले आहे ते पाहावे. स्वतःच्या खात्यात काय होतंय ते पहा, साला तुमच्या खात्यात तिकीट दर वाढवल्याचं तुम्हाला कळत नाही, एसटी खरेदी केल्याचं कळत नाही, तुमच्या खात्यात काय निर्णय घेतले आहेत हेच तुम्हाला कळत नाही. तुमच्या ताटात काय गाढव वाढलंय ते पहा, अशी टीका सुषमा अंधारे यांनी प्रताप सरनाईक यांच्यावर केली. 

हेही वाचा

शिवसेनेच्या ऑपरेशन टायगरची खिल्ली; ओमराजेंची डरकाळी, आधी यवतमाळहून आलेला वाघ पकडा

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Hasan Mushrif : म्हणून मी लवकर निघालो, वाशिममधून तडकाफडकी कोल्हापूरला रवाना होताच हसन मुश्रीफांचा खुलासा!
म्हणून मी लवकर निघालो, वाशिममधून तडकाफडकी कोल्हापूरला रवाना होताच हसन मुश्रीफांचा खुलासा!
Baburao Chandore: अजिदादांच्या मर्जीतील नेता, पालिकेच्या कंत्राटदारांचा 'मसीहा'; बाबुराव चांदेरेला अटक करायला पोलीस इतके का कचरतायत?
अजिदादांच्या मर्जीतील नेता, पालिकेच्या कंत्राटदारांचा 'मसीहा'; बाबुराव चांदेरेला अटक करायला पोलीस इतके का कचरतायत?
मनोज जरांगे पाटील यांच्या आमरण उपोषणात दोन उपोषणकर्त्यांची तब्येत खालवली; उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालयात दाखल
मनोज जरांगे पाटील यांच्या आमरण उपोषणात दोन उपोषणकर्त्यांची तब्येत खालवली; उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालयात दाखल
कट्टर विरोधक गुलाबराव पाटील अन् नाथाभाऊंच्या भेटीगाठी; सोबत जेवण अन् अर्धा तास खलबतं; चर्चांना उधाण
कट्टर विरोधक गुलाबराव पाटील अन् नाथाभाऊंच्या भेटीगाठी; सोबत जेवण अन् अर्धा तास खलबतं; चर्चांना उधाण
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

MahaKumbh Mela | Amit Shah  यांचं  प्रयागराज मध्ये महाकुंभमेळ्यात पवित्र स्नानAmey Khopakar :Chhaava चित्रपटावर MNS ची भूमिका काय? Laxman Utekar Raj Thackeray भेटीची A - Z माहितीPratap Sarnaik : परिवहनमंत्र्यांना न विचारताच ST ची भाडेवाढ? प्रताप सरनाईकांची थेट उत्तरेDnyaneshwari Munde  Mahadev Munde  खूनातील आरोपींना अटक करणार;अंबाजोगाईचे पोलीस उपअधीक्षकांचं आश्वासन

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Hasan Mushrif : म्हणून मी लवकर निघालो, वाशिममधून तडकाफडकी कोल्हापूरला रवाना होताच हसन मुश्रीफांचा खुलासा!
म्हणून मी लवकर निघालो, वाशिममधून तडकाफडकी कोल्हापूरला रवाना होताच हसन मुश्रीफांचा खुलासा!
Baburao Chandore: अजिदादांच्या मर्जीतील नेता, पालिकेच्या कंत्राटदारांचा 'मसीहा'; बाबुराव चांदेरेला अटक करायला पोलीस इतके का कचरतायत?
अजिदादांच्या मर्जीतील नेता, पालिकेच्या कंत्राटदारांचा 'मसीहा'; बाबुराव चांदेरेला अटक करायला पोलीस इतके का कचरतायत?
मनोज जरांगे पाटील यांच्या आमरण उपोषणात दोन उपोषणकर्त्यांची तब्येत खालवली; उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालयात दाखल
मनोज जरांगे पाटील यांच्या आमरण उपोषणात दोन उपोषणकर्त्यांची तब्येत खालवली; उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालयात दाखल
कट्टर विरोधक गुलाबराव पाटील अन् नाथाभाऊंच्या भेटीगाठी; सोबत जेवण अन् अर्धा तास खलबतं; चर्चांना उधाण
कट्टर विरोधक गुलाबराव पाटील अन् नाथाभाऊंच्या भेटीगाठी; सोबत जेवण अन् अर्धा तास खलबतं; चर्चांना उधाण
एसटी महामंडळाने तिकीटाचे दर वाढवले, भाडेवाढ रद्द करण्यासाठी ठाकरे गट आक्रमक, छ. संभाजीनगरमध्ये अंबादास दानवेंचं आंदोलन
एसटी महामंडळाने तिकीटाचे दर वाढवले, भाडेवाढ रद्द करण्यासाठी ठाकरे गट आक्रमक, छ. संभाजीनगरमध्ये अंबादास दानवेंचं आंदोलन
शिवसेनेच्या ऑपरेशन टायगरची खिल्ली; ओमराजेंची डरकाळी, आधी यवतमाळहून आलेला वाघ पकडा
शिवसेनेच्या ऑपरेशन टायगरची खिल्ली; ओमराजेंची डरकाळी, आधी यवतमाळहून आलेला वाघ पकडा
Ravi Rana : उद्धव ठाकरे लवकरच फडणवीसांच्या नेतृत्त्वाखाली काम करताना दिसतील; रवी राणांचा खळबळजनक दावा
उद्धव ठाकरे लवकरच फडणवीसांच्या नेतृत्त्वाखाली काम करताना दिसतील; रवी राणांचा खळबळजनक दावा
Anjali Damania on Ajit Pawar : अजित पवार आणि माझा 36 चा आकडा, पण धनंजय मुंडेंविरोधात त्यांना पुरावे हवे आहेत ना? अंजली दमानियांचा मोठा निर्णय
अजित पवार आणि माझा 36 चा आकडा, पण धनंजय मुंडेंविरोधात त्यांना पुरावे हवे आहेत ना? अंजली दमानियांचा मोठा निर्णय
Embed widget