Nanded News : माहेरहून सोनं आणण्याचा तगादा, नांदेडमध्ये विवाहितेचा संशयास्पद मृत्यू; मात्र लेकीची हत्या केल्याचा माहेरच्यांचा आरोप, गुन्हा दाखल
Nanded Crime News: नांदेडमध्ये एका विवाहितेचा संशयास्पद मृत्यू झाल्याची घटना घडली असून ही हत्या केली असल्याचा आरोप मयत महिलेच्या आईने केला आहे.
Nanded Crime News : नांदेडमध्ये एका विवाहितेचा संशयास्पद मृत्यू झाल्याची घटना घडली असून ही हत्या केली असल्याचा आरोप मयत महिलेच्या आईने केला आहे. तसेच ही हत्या सासरच्या लोकांनी केल्याचा गंभीर आरोपही मृत महिलेच्या आईने केला आहे. दरम्यान या प्रकरणी भाग्यनगर पोलिसांकडे दिलेल्या तक्रारीवरुन सासरच्या चार जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पुढे आलेल्या प्राथमिक माहितीनुसार, शहरातील मालेगांव रोडवरच्या तुळशीराम नगर भागातील ही घटना आहे. प्रियंका अभिजित अन्नपुरे असे मयत विवाहित महिलेचे नाव आहे. दरम्यान, माहेरावरून सोने आण अशी मागणी करत सासरची मंडळी तिचा सातत्याने छळ करत होती. त्यातच काल तिचा संशयास्पद मृत्यू झाला असून सासरच्या मंडळींनीच तिची हत्या केली असा आरोप मयत विवाहितेच्या भावाने केलाय. या प्रकरणी भाग्यनगर पोलीस स्टेशनमध्ये सासू सासरे नणंद आणि नवऱ्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सध्या पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत असून या प्रकरणामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
वीस वर्षीय महिलेवर नातेवाईकाकडूनच अत्याचार
दरम्यान, अशीच एक खळबळजनक घटना नाशिक येथे घडली आहे. यात नाशिकमध्ये एका वीस वर्षीय महिलेवर सामूहिक अत्याचार झाल्याची घटना घडली आहे. नाशिकच्या पंचवटी परिसरात ही धक्कादायक घटना घडली असून यात आरोपीने शेतात नेत महिलेवर अत्याचार केल्याचे समोर आले आहे. या घटनेमुळे संपूर्ण जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान या घटनेची माहिती पोलिसांना मिळताच पोलिसांनी पुढील तपास सुरू केला आहे.
दरम्यान, धक्कादायक बाब म्हणजे अत्याचार करणारा एक व्यक्ती महिलेचाच नातेवाईक असल्याचे पोलिसांच्या तपासात उघड झाले आहे. जेलमध्ये असलेल्या पतीला जामीन देण्याचे आमिष दाखवून अत्याचार केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. तर पंचवटी परिसरात एका शेतात महिलेवर अत्याचार आणि मारहाण झाल्याची महिलेने पोलिसांत तक्रार दिल्याने हे प्रकरण उजेडात आले आहे. दरम्यान, पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून या प्रकरणी आता दोघांना पोलिसांनी केली अटक केली आहे. तर एक फरार असून त्याचा तपास पोलिसांकडून केला जात आहे. मात्र या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
इतर महत्वाच्या बातम्या