आता लवकरच समृद्धी महामार्गाच्या दुतर्फा झाडे लावली जाणार, सरकारने मागितली MSRDCला परवानगी
लवकरच समृद्धी महामार्गाच्या दुतर्फा झाडे लावली जातील, त्यासाठी आम्ही परवानगी मागितली आहे, अशी माहिती वनमंत्री गणेश नाईक यांनी दिली आहे.
Ganesh Naik : समृद्धी मागामार्गामुळे राज्यात दळणवळण सोपे झाले आहे. या समृद्ध रस्त्यासाठी सरकारने कोट्यवधी रुपयांची तरतूद केली होती. आता याच रस्त्याच्या दुतर्फा झाडे लावली जाणार आहेत. त्यासाठी वनविभागाने एमएमआरडीएला परवानगी मागितली आहे, तशी माहिती वनमंत्री गणेश नाईक यांनी दिली आहे.
समृद्धी माहामार्गाच्या दुतर्फा झाडे लावली जातील
शहरातील झाडं वृक्ष प्राधिकरणाकडे परवानगी मागितल्यानंतर ती परवानगी देते. काही छाटावी लागतात किंवा दुसरीकडे नेली जातात असे नाईक म्हणाले. 1995 साली मी वन खात्याचा मंत्री होतो. ज्ञानेश्वर घोले हे जपानमध्ये उच्च पदस्थ अधिकारी होते. तेव्हा सुमोटो बरोबर आपण करार करणार होते, मात्र तो झाला नाही. तो आता पुन्हा शोधायला सांगितला आहे असे नाईक म्हणाले. आंबा लागवडीची पद्धत देखील आता बदलली आहे असे नाईक म्हणाले. समृद्धीच्या दुतर्फा झाडं लावण्यासाठी एमएसआरडीसीला परवानगी मागितली आहे. त्यातून पैसे देखील आम्हाला मिळतील असे नाईक म्हणाले. 1992 साली मी 10 हजार आंब्यांची झाडं लावली होती, ती आता 50 हजार झाली आहेत असे नाईक म्हणाले. माझं प्रेम झाडांवर आहे असंही ते म्हणाले.
पक्ष आपल्याला जे देईल ते काम करावं
पक्ष आपल्याला जे देईल, ते काम करावं. मी हेच द्या तेच द्या असं कधी मागितलं नव्हतं असेही गणेश नाईक म्हणाले. दालन वगैरे पासून मी दूरच राहतो. त्याचा मला काही फरक पडत नाही असे नाईक म्हणाले. ज्या परिसरात वाढवण बंदर होणार आहे, त्यात पुर्नवसन होणार याची माहिती द्या असं सांगितलं आहे. शिक्षण आणि इतर जबाबदारी कसं करणार आहात? यासंदर्भात देखील मी बोललो आहे असे नाईक म्हणाले. पालिकेची इमारत आणि अनेक इमारती त्यांनी चांगल्या उभ्या केल्या आहेत. त्या अजूनही आहेत असे नाईक म्हणाले. जंगलात शाकाहारी प्राण्यांना खाद्य तेव्हा उपलब्ध व्हायचं, तेव्हा आपोआप मांसाहारी लोकांची देखील खाद्याची व्यवस्था व्हायची. लाखोंच्या संख्येने जांभूळाची रोपं तयार करा, विदर्भात लावा. ज्यामुळे शाकाहारी प्राण्यांना खाद्य मिळेल असे नाईक म्हणाले. अद्यावत नर्सऱ्या तयार करण्यास सांगितले आहे असंही ते म्हणाले.
प्रत्येक वनात फळं झाडं लागली पाहिजेत
प्रत्येक वनात फळं झाडं लागली पाहिजेत अशा सूचना दिल्या आहेत. फणसाची रोपं देखील लावायला सांगितली आहेत. विदर्भ, मराठवाडा, कोकण आणि खान्देशात झाडं लावायला सांगितली असल्याचे नाईक म्हणाले.