एक्स्प्लोर

Santosh Deshmukh Case : संतोष देशमुखांच्या आरोपींना फाशी द्या! छत्रपती संभाजीराजेंच्या नेतृत्वात सर्वपक्षीय शिष्टमंडळ राज्यपालांच्या भेटीला

Beed Crime : संतोष देशमुखांच्या आरोपींना फाशी द्या! सोबतच ज्यांनी या प्रकरणात मदत केली त्यांचा सहआरोपी म्हणून उल्लेख करा इत्यादि मागण्यासाठी सर्वपक्षीय शिष्टमंडळ आज राज्यपालांच्या भेटीला आले आहे.

Santosh Deshmukh Case : सरपंच संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना फाशी झाली पाहिजे. सोबतच ज्यांनी या प्रकरणात मदत केली त्यांचा सहआरोपी म्हणून उल्लेख केला पाहिजे. प्रकरणाशी संबंध असलेल्या सर्वांवर कारवाई करायला हवी. जे जे यात सहभागी आहेत, त्यांच्यावर कारवाई करण्याच्या मागणीसह संतोष देशमुखांच्या आरोपींना फाशी देण्यात यावी, या मागणीला घेऊन छत्रपती संभाजीराजेंच्या (Chhatrapati Sambhaji Raje) नेतृत्वात आम्ही सर्वपक्षीय शिष्टमंडळ राज्यपालांची भेट घेत आहोत. आमची मुख्य मागणी हीच आहे की, मारेकरी जे आहेत त्यांना फाशी द्यायला पाहिजे. सध्या यात एकच आरोपी दिसत आहे, पण जो सहभागी आहेत त्यांवर ही कारवाई करावी. किंबहुना जिल्ह्यात टोळीयुद्ध झाले नाही पाहिजे. आम्ही हा विषय पोटतिडकीने मांडतो आहे. म्हणून वेळीच दखल घ्यावी या मागणीसाठी सर्वपक्षीय शिष्टमंडळ राज्यपालांच्या भेटीला जात असल्याची माहिती  शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे खासदार बजरंग सोनवणे (Bajrang Sonwane) यांनी दिली आहे.

पंकजा मुंडे या प्रकरणात थोड्या तरी बोलल्या काय? - बजरंग सोनवणे

ज्यांनी आरोपींना पळून जाण्यासाठी मदत केली आहे ते दोन ते तीन पीआय आहेत. त्यांचे सीडीआर काढा. खंडणीचे आरोपी आहेत त्यांच्या वरही तात्काळ कारवाई करावी. एसआयटीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केला आहे. त्यातील सदस्यांची नियुक्ती ही खंडणी आरोपत आहे. दरम्यान जिल्ह्यात आणि राज्यात हे प्रकरण गाजत असतांना पंकजा मुंडे थोड्या तरी बोलल्या काय? बोलल्या असतील तर मी काहीच बोललेले ऐकले नाही. मी लोकसभा सदस्य झालो तेव्हापासून व त्याआधी भूमिका घेतली आहे. सर्वधर्म समभाव या भावनेतून मी काम केले आहे. मी जातीपातीचे राजकारण केलेले नाही. आम्ही हा विषय पोटतिडकीने मांडतो असल्याचेही खासदार बजरंग सोनवणे (Bajrang Sonwane) म्हणाले. 

सुरेश धस यांनी अजित पवारांबाबत विधाने टाळायला हवी- प्रवीण दरेकर

एकमेकांवर टीका करणे योग्य नाही. सुरेश धस यांनी अजित पवारांबाबत अशा प्रकारची विधाने करणे टाळायला हवे होते, असं मत भाजपचे आमदार प्रवीण दरेकर यांनी व्यक्त केलं आहे.  देवेंद्र फडणवीस यांनी सुरेश धस यांना योग्य तो संदेश दिला आहे. एसआयटी ही मोठी तपास यंत्रणा आहे. जर सुरेश धस यांना काही महत्त्वाची आर्थिक माहिती मिळाली असेल, तर त्यांनी ती एसआयटीकडे सुपूर्द करायला हवी. जेव्हा एसआयटी स्थापन केली गेली, तेव्हा वाल्मीक कराड आणि पोलिसांच्या संबंधांची कोणतीही माहिती नव्हती, असं प्रवीण दरेकरांनी सांगितलं. 

हे ही वाचा 

Santosh Deshmukh Case : वाल्मिक कराडसोबत फोटो काढणं आलं अंगलट; जितेंद्र आव्हाडांच्या अक्षेपानंतर API महेश विघ्नेंची उचलबांगडी

ENBA 2020,2021 पुरस्कार विजेता, अरुण साधू पाठ्यवृत्ती धारक, शोध पत्रकार.  मागील सहा वर्षांपासून 'एबीपी माझा'मध्ये कार्यरत.... 
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Prajakt Tanpure :  प्राजक्त तनपुरेंची राहुरीच्या पोटनिवडणुकीवर पहिली प्रतिक्रिया, कार्यकर्त्यांचा उल्लेख अन् मुख्यमंत्र्यांचं कौतुक,राजकीय वर्तुळात चर्चा सुरु
प्राजक्त तनपुरेंकडून पोटनिवडणूक जाहीर होताच कार्यकर्त्यांचा उल्लेख आणि मुख्यमंत्र्यांचं कौतुक, राजकीय वर्तुळात चर्चा सुरु
Baramati : बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता धूसर? निवडणूक जाहीर होताच नवी अपडेट, नेमकं काय घडलं?
बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता धूसर? निवडणूक जाहीर होताच नवी अपडेट
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 मार्च 2026 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 मार्च 2026 | रविवार
मोठी बातमी! प.बंगालसह 5 राज्यातील विधानसभा निवडणुकांची तारीख जाहीर; दोन टप्प्यात मतदान, 4 मे रोजी निकाल
मोठी बातमी! प.बंगालसह 5 राज्यातील विधानसभा निवडणुकांची तारीख जाहीर; दोन टप्प्यात मतदान, 4 मे रोजी निकाल

व्हिडीओ

Baramati Rahuri Election : बारामती, राहुरीची पोटनिवडणूक 23 एप्रिलला, निवडणूक आयोगाची माहिती
North Korea Ballistic missile: एकीकडे इराण Vs अमेरिका युद्ध शिगेला, दुसरीकडे किम जोंग उन मैदानात, उत्तर कोरियाने 10 बॅलेस्टिक मिसाईल सोडल्या
Kishori Pednekar on Ritu Tawde : मुंबईच्या महापौर पंतप्रधान, मुख्यमंत्र्यांपेक्षा मोठ्या झाल्या का? पेडणेकर आक्रमक
kharg Island Special Report : इराणच्या मुकूटमणीवर अमेरिकेचा शक्तिशाली बॉम्बहल्ला
Election Comission PC : 5 राज्यांच्या निवडणुकांचे बिगुल वाजणार? निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
West Bengal: निवडणूक जाहीर होताच पहिला ओपिनियन पोल आला; पश्चिम बंगालमध्ये कोणाची सत्ता? भाजप-तृणमूलमध्येच जोरदार टक्कर
पश्चिम बंगालमध्ये कोणाची सत्ता? तृणमूल काँग्रेस आणि भाजपमध्ये जोरदार लढत, पहिला ओपिनियन पोल समोर
PAK vs BAN: रोमांचक लढतीत बांगलादेशचा पाकिस्तान विजय, सलमान आगाचं शतक वाया, पाकनं मालिका गमावली 
पाकिस्तानवर मोठी नामुष्की, बांगलादेशचा तिसऱ्या वनडे सामन्यात विजय, मालिका 2-1 नं जिंकली
महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या निवडणुकीत सत्ताबदल, साहित्य संवर्धन पॅनेलचा विजय; परिवर्तन उत्कर्ष आघाडीचा पराभव
महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या निवडणुकीत सत्ताबदल, साहित्य संवर्धन पॅनेलचा विजय
Adinath Maharaj : तारकेश्वर गडाचे महंत आदिनाथ महाराज शास्त्री गंभीर जखमी, स्वत:वर वार केल्याची माहिती, घटनेमुळं खळबळ
तारकेश्वर गडाचे महंत आदिनाथ महाराज शास्त्री गंभीर जखमी, स्वत:वर वार केल्याची माहिती, घटनेमुळं खळबळ
अधिकाऱ्यांनी जप्त केलेले गॅस सिलेंडर लोकांनी पळवले; गॅस टंचाईने वाद, घटनास्थळी पोलिसांना बोलावलं
अधिकाऱ्यांनी जप्त केलेले गॅस सिलेंडर लोकांनी पळवले; गॅस टंचाईने वाद, घटनास्थळी पोलिसांना बोलावलं
महापौर रितू तावडेंच्या कारवरील लाल-निळे दिवे हटले; विरोधकांच्या टीकेनंतर अधिकाऱ्यांना जाग
महापौर रितू तावडेंच्या कारवरील लाल-निळे दिवे हटले; विरोधकांच्या टीकेनंतर अधिकाऱ्यांना जाग
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 मार्च 2026 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 मार्च 2026 | रविवार
SA vs NZ :  दक्षिण आफ्रिकेनं टी 20 वर्ल्ड कपच्या उपांत्य फेरीतील पराभवाचा वचपा काढला, न्यूझीलंडवर 7 विकेटनं दणदणीत विजय
दक्षिण आफ्रिकेनं टी 20 वर्ल्ड कपच्या उपांत्य फेरीतील पराभवाचा वचपा काढला, न्यूझीलंडवर 7 विकेटनं दणदणीत विजय
Embed widget