Bullet Train: बुलेट ट्रेनच्या कामासाठी बीकेसीच्या वाहतुकीत बदल, नऊ महिन्यांसाठी दोन रस्ते बंद
BKC Traffic Update: मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनसाठी जमिनीखाली स्टेशन बांधण्यासाठी हे दोन मार्ग आजपासून बंद करण्यात आलेत.
मुंबई : बुलेट ट्रेनच्या (Bullet Train) कामासाठी बीकेसीमधील (Bandra Kurla Complex) दोन रस्ते आजपासून 30 जून 2024 पर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आलाय. डायमंड बोर्स जंक्शन ते JSW सेंटर आणि प्लॅटिन बिल्डिंग जंक्शन ते मोतीलाल नेहरू नगर हे दोन रस्ते बंद करण्यात आल्याने बीकेसीमधील वाहतुकीत काही बदल करण्यात आलेत. मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनसाठी जमिनीखाली स्टेशन बांधण्यासाठी हे दोन मार्ग आजपासून बंद करण्यात आलेत. या निमित्ताने मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनच्या कामाला आता वेग आल्याचं स्पष्ट झालंय.
मंगळवारी मध्यरात्री 12 वाजल्यापासून वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्समधील भारत डायमंड मार्केट जंक्शन ते जेएसडब्ल्यू सेंटर आणि प्लॅटिना बिल्डिंग जंक्शन ते ट्रेड सेंटरजवळील मोतीलाल नेहरू नगर दरम्यान चे रस्ते वाहतुकीसाठी बंद करण्यात येणार आहेत. मुंबई अहमदाबाद नॅशनल हाय-स्पीड रेल कॉर्पोरेशन बुलेट ट्रेन प्रकल्प एमएमआरडीए मैदानालगत होत आहे. त्यामुळे भूमिगत रेल्वे स्थानकाच्या बांधकामासाठी रस्ता बंद झाल्यामुळे पीक आवर मध्ये मोठी वाहतूक कोंडीची समस्या उद्भवू शकते
बुलेट ट्रेनच्या कामामुळे मोठ्या वाहतूक कोंडीला मुंबईकरांना सामोरे जावे लागेल
30 जून 2024 पर्यंत हे दोन्ही महत्त्वाचे रस्ते वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात येतील. आधीच मेट्रोच्या कामामुळे या भागातील रुंदी कमी झाल्याने मोठी वाहतूक कोंडी होत असताना आता यामध्ये बुलेट ट्रेनच्या स्टेशनच्या कामामुळे आणखी मोठ्या वाहतूक कोंडीला या भागात प्रवास करणाऱ्या मुंबईकरांना सामोरे जावे लागेल.
बीकेसीमध्ये बुलेट ट्रेनचे अंडरग्राऊंड स्टेशन होणार
मुंबई-अहमदाबाद बुलेट हा ट्रेन केंद्र सरकारचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे. बांद्रा-कुर्ला कॉम्प्लेक्स अर्थात बीकेसीमध्ये बुलेट ट्रेनचे अंडरग्राऊंड स्टेशन असणार आहे. हे तीन मजली स्टेशन असणार आहेत, बीकेसीच्या या अंडरग्राउंड स्टेशनमध्ये सहा प्लॅटफॉर्म असणार आहे.
अहमदाबाद-मुंबई फक्त दोन तासांत
अहमदाबाद-मुंबई बुलेट ट्रेन हे अंतर तुरळक स्टॉपसह अवघ्या 2 तास 7 मिनिटांत पूर्ण करेल, असा अंदाज आहे. 2023 सालापर्यंत 10 डब्यांची गाडी येईल आणि 16 डब्यांची गाडी 2033 पर्यंत येणार आहे. यामध्ये बिझनेस आणि स्टँडर्ड अशा दोन श्रेणी असतील. मुंबई-अहमदाबाद या 508 किमी अंतरावर ही बुलेट ट्रेन धावणार आहे. यातला 156 किमीचा मार्ग महाराष्ट्रातून तर 351 किमी गुजरातमधून आहे.
हे ही वाचा :