एक्स्प्लोर

Mumbai High Court : मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्प; वाढीव नुकसानभरपाईसाठी गोदरेज पुन्हा हायकोर्टात

Mumbai Ahmedabad Bullet Train : गोदरेज अँड बॉईस कंपनीच्या अर्जावर महिन्याभरात निर्णय घेण्याचे कोर्टाकडून राज्य सरकारला निर्देश देण्यात आले आहेत. 

Mumbai Ahmedabad Bullet Train : मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी संपादित केलेल्या जमिनीच्या वाढीव मोबदल्यासाठी गोदरेज अँड बॉईस कंपनीच्या अर्जावर महिन्याभरात निर्णय घ्या, असे निर्देश सोमवारी मुंबई उच्च न्यायालयानं राज्य सरकारला दिले आहेत. या वाढीव मोबदल्याबाबत फेब्रुवारीमध्ये नुकसानभरपाईसाठी अर्ज करण्यात आल्याचं कंपनीकडून हायकोर्टात सांगण्यात आलं. मात्र, कंपनीनं वेळेत अर्ज केलेला नसल्याचा दावा सरकारी वकिलांनी हायकोर्टात केला. तरीही न्यायमूर्ती बी. पी. कुलाबावाला आणि न्यायमूर्ती मिलिंद साठ्ये यांच्या खंडपीठाने कंपनीची बाजू ग्राह्य धरून वाढीव भरपाईच्या मागणीसाठी केलेल्या अर्जावर महिन्याभरात निर्णय घेण्याचे आदेश सरकारला देऊन याचिका निकाली काढली. 

काय आहे प्रकरण?

मुंबई-अहमदाबाद बुलेट हा ट्रेन केंद्र सरकारचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे. सार्वजनिक हित महत्त्वाचं असल्यानं हा प्रकल्प पूर्ण होणं महत्त्वाचं आहे. त्यामुळे या प्रकरणी न्यायालयीन हस्तक्षेपाची आवश्यकता नाही, असं अधोरेखित करत न्यायमूर्ती रमेश धानुका यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठानं फेब्रुवारी महिन्यात या भूसंपादन प्रक्रियेला आव्हान देणारी गोदरेजची याचिका फेटाळली होती. ही याचिका फेटाळण्याच्या निर्णयाला गोदरेजनं सर्वोच्च न्यायालयात आव्हानही दिलं होतं. परंतु, सर्वोच्च न्यायालयानंही मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय कायम ठेवताना कंपनीच्या नुकसान भरपाईच्या मागणीवर सहा महिन्यांत निर्णय घेण्याचे आदेश दिले होते.

एप्रिल महिन्यात, कंपनीनं भूसंपादन, पुनर्वसन प्राधिकरणाकडे याबाबत अर्ज करत जिल्हाधिकाऱ्यांकडे वाढीव भरपाईबाबत आदेश देण्याची मागणी केली होती. परंतु, जिल्हाधिकाऱ्यांना असे आदेश देता येणार नाहीत, असं नमूद करून प्राधिकरणानं गोदरेजचा अर्ज फेटाळून लावला आहे.

गोदरेजच्या याचिकेनुसार, सरकारनं कंपनीची 9.69 एकर जमीन संपादित करण्यासाठी 15 सप्टेंबर 2022 रोजी 264 कोटी रुपयांचा अंतिम निवाडा मंजूर केला. राज्य सरकारनं देऊ केलेल्या 572 कोटी रुपयांच्या सुरुवातीच्या रकमेपेक्षा ही रक्कम खूपच कमी होती. त्यामुळे, कंपनीनं 993 कोटी रुपयांच्या वाढीव नुकसान भरपाईची मागणी राज्य सरकारकडे केली आहे.

ही बातमी वाचा: 

महत्त्वाच्या बातम्या

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 ऑगस्ट 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 ऑगस्ट 2026 | शनिवार
अभिजीत दिपकेंची ZP शाळेला भेट; शालेय पोषण आहाराची नोंद वेगळीच, फुटलेल्या खिडकीला एकनाथ शिंदेंचा बॅनर
अभिजीत दिपकेंची ZP शाळेला भेट; शालेय पोषण आहाराची नोंद वेगळीच, फुटलेल्या खिडकीला एकनाथ शिंदेंचा बॅनर
Harshvardhan Sapkal: वंदे मातरम काँग्रेसचीच संस्कृती, भाजप अन् संघाने आम्हाला शहाणपणा शिकवू नये; सोनिया गांधींबाबतच्या भाजपच्या दाव्यावर हर्षवर्धन सपकाळांनी सुनावलं, म्हणाले...
वंदे मातरम काँग्रेसचीच संस्कृती, भाजप अन् संघाने आम्हाला शहाणपणा शिकवू नये; सोनिया गांधींबाबतच्या भाजपच्या दाव्यावर हर्षवर्धन सपकाळांनी सुनावलं, म्हणाले...
गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं, पण..; माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांचा गौप्यस्फोट, सांगितलं कारण
गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं, पण..; माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांचा गौप्यस्फोट, सांगितलं कारण

व्हिडीओ

Pm Modi Speech Highlites : मोदींच्या लाल किल्ल्यावरील भाषणातले टॉप 10 मुद्दे
Sanjay Raut Mumbai : १५०० रुपये देऊन मते विकत घेतली अन् ईव्हीएमचा घोटाळा केला- संजय राऊत
Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 ऑगस्ट 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 ऑगस्ट 2026 | शनिवार
रांचीमध्ये विद्यार्थी नेता महातो यांना झेंडा फडकवण्यापासून रोखलं; रुग्णालयात पोलिसांशी झटापट, पीएससी-जेएसएससी परीक्षा रद्द करण्यासाठी उपोषणावर
रांचीमध्ये विद्यार्थी नेता महातो यांना झेंडा फडकवण्यापासून रोखलं; रुग्णालयात पोलिसांशी झटापट, पीएससी-जेएसएससी परीक्षा रद्द करण्यासाठी उपोषणावर
Video: एक व्यक्ती द्या, हे सगळं सुधारेल; पुण्यातील दौऱ्यात आदित्य ठाकरेंकडून तुकाराम मुंढेंची मागणी, सरकावर निशाणा
Video: एक व्यक्ती द्या, हे सगळं सुधारेल; पुण्यातील दौऱ्यात आदित्य ठाकरेंकडून तुकाराम मुंढेंची मागणी, सरकावर निशाणा
Video: देशाच्या स्वातंत्र्यदिनीच हाती तिरंगा घेऊन चिमुरडी मुलं आनंदाने बागडत असतानाच शाळेच्या प्रवेशद्वाराची बाल्कनी कोसळली; एका विद्यार्थ्याचा अवघ्या पाच सेकंदात चिरडून भयावह अंत, दोन जखमी
Video: देशाच्या स्वातंत्र्यदिनीच हाती तिरंगा घेऊन चिमुरडी मुलं आनंदाने बागडत असतानाच शाळेच्या प्रवेशद्वाराची बाल्कनी कोसळली; एका विद्यार्थ्याचा अवघ्या पाच सेकंदात चिरडून भयावह अंत, दोन जखमी
अभिजीत दिपकेंची ZP शाळेला भेट; शालेय पोषण आहाराची नोंद वेगळीच, फुटलेल्या खिडकीला एकनाथ शिंदेंचा बॅनर
अभिजीत दिपकेंची ZP शाळेला भेट; शालेय पोषण आहाराची नोंद वेगळीच, फुटलेल्या खिडकीला एकनाथ शिंदेंचा बॅनर
Chandigarh Protest: अटकेतील शिखांच्या सुटकेच्या मागणीसाठी चंदीगड सीमेवर हिंसक निदर्शने; बॅरिकेड्स तोडण्याचे प्रयत्न, पोलिसांनी ड्रोनमधून अश्रुधूर सोडला
अटकेतील शिखांच्या सुटकेच्या मागणीसाठी चंदीगड सीमेवर हिंसक निदर्शने; बॅरिकेड्स तोडण्याचे प्रयत्न, पोलिसांनी ड्रोनमधून अश्रुधूर सोडला
Harshvardhan Sapkal: वंदे मातरम काँग्रेसचीच संस्कृती, भाजप अन् संघाने आम्हाला शहाणपणा शिकवू नये; सोनिया गांधींबाबतच्या भाजपच्या दाव्यावर हर्षवर्धन सपकाळांनी सुनावलं, म्हणाले...
वंदे मातरम काँग्रेसचीच संस्कृती, भाजप अन् संघाने आम्हाला शहाणपणा शिकवू नये; सोनिया गांधींबाबतच्या भाजपच्या दाव्यावर हर्षवर्धन सपकाळांनी सुनावलं, म्हणाले...
लोकांच्या अपेक्षा पूर्ण करणंही गरजेचं; ओमराजे निंबाळकरांची कैलास पाटलांना साद, ऑपरेशन टायगरची चर्चा
लोकांच्या अपेक्षा पूर्ण करणंही गरजेचं; ओमराजे निंबाळकरांची कैलास पाटलांना साद, ऑपरेशन टायगरची चर्चा
Embed widget