parambir singh : परमबीर सिंह यांना गायब करणे हा आघाडी सरकारचा डाव - भाजप
Parambir Singh : परमबीर सिंह यांना भाजपने पळवून लावल्याचा आरोप महाविकास आघाडी सरकारमधील नेत्यांमधून वारंवार करण्यात येत आहेत. या आरोपांना भाजपकडून प्रत्युत्तर देण्यात आलं आहे.
Parambir Singh : परमबीर सिंह यांना भाजपने पळवून लावल्याचा आरोप महाविकास आघाडी सरकारमधील नेत्यांमधून वारंवार करण्यात येत आहेत. या आरोपांना भाजपकडून प्रत्युत्तर देण्यात आलं आहे. परमबीर सिंह यांना गायब करणे हा आघाडी सरकारचा डाव आहे, असा आरोप भाजप नेते आणि आमदार आशिष शेलार यांनी केला आहे.
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग गायब असतील, पळुन गेले असतील तर गायब होण्यासाठी महाविकास आघाडी सरकार कारणीभूत असल्याचा आरोप भाजप नेते आमदार आशिष शेलार यांनी केला आहे. परमबीर सिंग राज्यातून पळून गेला कसा? याचे उत्तर नवाब मलिक यांनी आधी द्यायला हवे, असं आव्हान शेलार यांनी मंत्री मलिक यांना दिलं आहे. परमबीर सिंग पळून गेले याला महाराष्ट्र सरकार जबाबदार आहे. परमबीर सिंग पळून गेला मात्र त्यांचे निवासस्थान तर इथेच होते ना? रेशनकार्ड, आधार कार्ड हे इथलेच होते ना? महाराष्ट्र सरकार त्यांना पळायला मदत करीत आहे, असं ते म्हणाले.
ते पळून गेले असतील तर ज्या देशात जातील तिथे त्यांना आश्रय मिळावा याचा प्रयत्नही राज्य सरकार करतंय. परमबीर सिंग यांच्याकडे या सरकार विरोधात बरीच माहिती आहे. ते जर सापडले तर सरकारचे पित्तळ उघडे पडेल, त्यामुळेच सरकार पळायला मदत करतंय, हा एक डाव आहे, असा दावा शेलार यांनी केला.
परमबीर सिंह पळून गेलेले नाहीत, त्यांना पळवून लावलंय : संजय राऊत
केंद्राच्याच मदतीनं देशाबाहेर पळून जाता येतं, संजय राऊतांनी पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल केला आहे. तसेच परमबीर सिंह सध्या कुठे आहेत? अशा चर्चा रंगल्याचं पाहायला मिळत आहेत. त्यावरुन बोलताना संजय राऊत यांनी भाजपवर अप्रत्यक्ष निशाणा साधला आहे. अनिल देशमुखांची अटक ही कायद्याला आणि नितिमत्तेला धरुन नाही. अनिल देशमुख यांच्यावर जे आरोप करणारे लोक आहेत, ते आरोप करुन पळून गेलेले नाहीत. त्यांना पळून लावलेलं आहे. कोणीही देशाबाहेर पळून जातो, तो केंद्रीय सत्तेच्या मदतीनेच पळून जाऊ शकतो. मुंबई पोलीस खात्याचा आयुक्त असलेले, महासंचालक दर्जाचा अधिकारी जेव्हा हा देश सोडून जातो. तेव्हा त्याला संपूर्ण पाठबळ हे केंद्रीय सत्तेचं असल्याशिवाय तो पळून जाऊ शकत नाही. त्यांनी आरोप केले आणि ते पळून गेले. त्या आरोपांच्या आधारावर केंद्रीय तपास यंत्रणा तपास करतात आणि महाराष्ट्राच्या माजी गृहमंत्र्यांना अटक केली जाते, असं राऊत म्हणाले.
परमबीर सिंग कसे गेले?, नवाब मलिकांचा भाजपला प्रश्न
अनिल देशमुख यांना फसवलं आहे. परमबीर सिंह यांच्या मार्फत त्यांना फसवलं गेलं. परमबीर सिंहच्या माझ्यमातून राज्याला बदनाम करण्याचा प्रयत्न केला जातोय. अनिल देशमुख काल ईडी कार्यालयात हजर राहिले. पण आरोप करणारे परमबीर सिंह कुठे गेले? राजकीय सुडापोटी अनिल देशमुख यांना अटक करण्यात आली आहे. राज्यातील नेत्यांना घाबरवण्यासाठी अनिल देशमुख यांच्यावर कारवाई करण्यात आली. लूकआऊट नोटीस काढल्यानंतर देश सोडून कसं जाऊ शकतात. कोणत्या मार्गे ते देश सोडून गेले? केंद्रानं उत्तर द्यावं. भाजप सत्तेत असलेल्या राज्यातून परमबीर सिंह यांनी देशाबाहेर पळ काढला का? असा सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केला.