एक्स्प्लोर
शिवसेनेला मात देण्यासाठी भाजपच्या कोअर कमिटीची 'वर्षा'वर खलबतं
मुंबई: भाजपच्या कोअर कमिटीची रात्री उशिरा ‘वर्षा’वर बैठक पार पडली. या बैठकीत मुंबईतल्या सत्ता समिकरणावर तसेच सत्तेसाठी शिवसेनेची हातमिळवणी करायची का?, शिवसेनेनं युतीचा पर्याय फेटाळल्यानंतर पक्षाची रणनिती काय असेल यावर देखील कोअर कमिटीच्या बैठकीत सविस्तर चर्चा झाल्याची माहीती मिळते आहे.
त्याशिवाय भाजपच्या महापौरपदाच्या उमेदवाराच्या नावावर देखील याच बैठकीत शिक्कामोर्तब देखील होणार होतं. कारण आज महापौर पदाचा अर्ज भरण्याचा दिवस आहे.
भाजपने आतापर्यंत 84 नगरसेवकांची गट नोंदणी केली असून भाजप सर्व पक्षीय नगरसेवकांच्याही संपर्कात असल्याची माहिती मिळते आहे. तसेच भाजपला मनसेचीही साथ मिळण्याची शक्यता आहे. तर एमआयएमचे दोन नगरसेवकही भाजपला पाठिंबा देण्याची शक्यता आहे. त्यामुळे भाजपच्या नगरसेवकांमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता मुंबईत शिवसेनेचा महापौर बसणार की, भाजपचा याबाबत अनेक तर्कवितर्क लावण्यात येत आहेत.
दरम्यान, काल ‘वर्षा’वरील बैठकीला मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार, शिक्षण मंत्री विनोद तावडे, महिला व बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे, चंद्रकांत पाटील आणि इतर प्रमुख नेते या बैठकीत सामील होते.
संबंधित बातम्या:
मुंबई महापौरपदाबाबत अखेर मनसेने मौन सोडलं !
कॅबिनेट बैठकीत विरोधी पक्षनेते, पत्रकारांना स्थान द्या : शिवसेना
..म्हणून गीता गवळी यांनी शिवसेनेची साथ सोडली ?
महापौरपदासाठी काँग्रेसचाही उमेदवार, राष्ट्रवादी म्हणते..
उद्धव ठाकरेंबद्दल बोलायचं नाही : गीता गवळी
मुंबईच्या महापौरपदासाठी गीता गवळींचा भाजपला पाठिंबा
विमानतळावर उद्धव ठाकरे-चंद्रकांत पाटील आमनेसामने, मात्र...
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नांदेड
मुंबई
निवडणूक
पुणे
Advertisement