कोरोनामुळे मृत्यू झालेल्या बेस्ट कर्मचाऱ्यांच्या नातेवाईकांना 'बेस्ट'कडून नोकरी
मुंबईतील बेस्ट परिवहन प्रशासनाने एक महत्वाचा निर्णय घेतला आहे. कोरोनामुळे मृत्यू झालेल्या बेस्ट कर्मचाऱ्यांच्या नातेवाईकांना बेस्टकडून नोकरी देण्यात येणार आहे.
मुंबई : कोरोनामुळे मृत्यू झालेल्या बेस्ट कर्मचाऱ्यांच्या नातेवाईकांना बेस्टकडून नोकरी देण्याचा महत्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. आतापर्यंत चार मृत व्यक्तींच्या नातलगांना बेस्टने सेवेत सामावून घेण्याचे आदेश दिले आहेत. उर्वरित व्यक्तींच्या नातेवाईकांना बेस्ट लवकरच सेवेत सामावून घेणार आहे. बेस्टकडून कोरोनाबाधित कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांना आर्थिक आधार म्हणून ही नोकरी दिली जात आहे.
बेस्टमध्ये कोरोनाबाधित कर्मचाऱ्यांची संख्या वाढत असूनही बेस्ट कर्मचाऱ्यांना कोणतीही सुविधा किंवा मृत कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत किंवा विमा दिला जात नाही. यासाठी बेस्ट संयुक्त कृती समितीनं सोमवारपासून बेस्ट कामगारांना कामावर न येण्याचे आवाहन केले होते. कृती समितीच्या या इशाऱ्यानंतर बेस्ट प्रशासनानं तातडीनं पावलं उचलत हा निर्णय घेतला आहे.
भाजप नेते प्रविण दरेकर यांचा इशारा कोरोना व्हायरसचा वाढता प्रादुर्भाव पाहता देशात लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. लवकरच देशात लॉकडाऊनचा चौथा टप्पा सुरु होणार आहे. परंतु, देशातील अत्यावश्यक सेवा मात्र सुरु आहेत. लोकल ट्रेन्स बंद करण्यात आल्या असल्या तरीदेखील बेस्ट बस मात्र सुरु आहेत. आपल्या जीवाची पर्वा न करता काम करणाऱ्या बेस्ट कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं आहे. आतापर्यंत जवळपास 100 पेक्षा जास्त कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. अशातच बेस्ट कर्मचाऱ्यांनी प्रशासनाकडे काही मागण्या केल्या आहेत. त्यामुळे जर या बेस्ट कर्मचाऱ्यांच्या मागण्या मान्य केल्या नाहीतर आम्हालाही त्यांच्यासोबत आंदोलनात उतरावं लागेल, असा इशारा भाजप नेते प्रविण दरेकर यांनी दिला आहे.
बेस्ट कर्मचाऱ्यांच्या मागण्या मान्य करा अन्यथा, आम्हीही आंदोलनात उतरू : प्रवीण दरेकर
— BEST Electricity (@myBESTElectric) May 16, 2020
बेस्ट कर्मचाऱ्यांमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतोय
बेस्ट कर्मचाऱ्यांमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतोय. बेस्ट कर्मचाऱ्यांना पुरेशी सुरक्षा दिली जात नाही तसेच, बेस्ट कर्मचाऱ्यांना विमा देण्यात यावा, या मागणीसाठी बेस्ट संयुक्त कृती समितीनं सोमवारपासून बेस्ट कर्मचाऱ्यांना कामावर न जाण्याचे आवाहन केले आहे. मात्र, मुंबईवरील कोरोनाच्या संकटकाळात बेस्ट ही अत्यावश्यक सेवांसाठी सुरू राहणं गरजेचं आहे. कृती समितीच्या आवाहनाला कुणी बळी पडू नये. क्वॉरंटाईन काळ संपल्यानंतर आपण देखील कामावर हजर होणार असल्याचे या बेस्ट ड्रायव्हरनं स्पष्ट केलं आहे.
BEST | मृत कर्मचाऱ्यांच्या कुटुंबाला मोबदला मिळत नसल्याने सोमवारपासून घरी बसण्याचं समितीचं आवाहन