एक्स्प्लोर
अण्णाभाऊ महामंडळ घोटाळ्याच्या फाईल्स लंपास?
लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाच्या 385 कोटी रुपयांच्या घोटाळ्यासंबंधित फाईल्स लंपास झाल्याची शक्यता आहे.

मुंबई : लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाच्या 385 कोटी रुपयांच्या घोटाळ्यासंबंधित फाईल्स लंपास झाल्याची शक्यता आहे. कारण महामंडळाच्या कार्यालयाचं सील तोडून काही फाईल्स पळविण्यात आल्याची तक्रार दहिसर पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे. मात्र, या फाईल्स साठे महामंडळ घोटाळ्याच्या आहेत की इतर हे कळू शकलं नाही. सामाजिक न्याय विभागाच्या मालकीची दहिसरमधील हनुमान टेकडी भागात कल्याणी केंद्र ही 4 मजली इमारत असून त्याठिकाणी हा धक्कादायक प्रकार घडल्याची माहिती मिळते आहे. घोटाळ्याशी संबंधित सर्व फाईल्स आणि रेकॉर्ड याच इमारतीत ठेवण्यात आले होते. तरी, फाईल्स लंपास करणाऱ्यांमध्ये घोटाळ्यातील प्रमुख आरोपी आमदार रमेश कदम यांचा भाऊ असल्याची माहिती मिळते आहे. दरम्यान, आमदार रमेश कदम अण्णाभाऊ साठे घोटळ्याप्रकरणी सध्या आर्थर रोड तुरुंगात आहे. काय आहे अण्णाभाऊ साठे महामंडळ घोटाळा? अण्णाभाऊ साठे महामंडळात 250 कोटींचा गैरव्यवहार झाला असून त्याचे 3700 पानी पुरावे आपण लाचलुचपतसह सर्व विभागांना दिले असल्याचा दावा माजी मंत्री लक्ष्मण ढोबळे यांनी केला. या घोटाळ्याबाबत महामंडळाचे माजी अध्यक्ष आमदार रमेश कदम यांच्यावर ढोबळेंनी थेट आरोप केला आहे. – कोणतीही प्रक्रिया न राबवता 73 जणांची भरती – उस्मानाबादच्या नेटकेंनी मुलाला, बावणेंनी मुलीला सेवेत घेतलं – नियुक्त झालेल्यांना 20 लाखांचं गृहकर्ज उपलब्ध करुन दिलं. त्यातले 15 लाख रुपये लाच म्हणून घेण्यात आले. – अनेक कर्ज प्रकरणावर खोट्या सह्या घेतल्या – लाभार्थींचे चेक परस्पर वाटण्यात आले – महालक्ष्मी दूध संस्था, खंडाळी, बारामीत दूध संघाला 5 कोटी कागदोपत्र वाटण्यात आले – विधानसभा निवडणुकीत रमेश कदमांनी 6 कोटी 56 लाख रुपये वाटल्याचा आरोप VIDEO : संबंधित बातम्या :
अण्णाभाऊ साठे आर्थिक महामंडळ घोटाळा : आतापर्यंत 250 कोटींची मालमत्ता जप्त
आणखी वाचा























