Shiv Sena Expands Executive Committee: शिवसेना ठाकरे गटाच्या कार्यकारिणीचा विस्तार; 6 नवे नेते नियुक्त
Shiv Sena Uddhav Balasaheb Thackeray: ठाकरे गटानं 6 नवनियुक्त नेत्यांची नावं आणि त्याच्यावर सोपवण्यात आलेल्या जबाबदाऱ्या जाहीर केल्या आहेत.
Maharashtra Political Updates: शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे (Shiv Sena Uddhav Balasaheb Thackeray) गटाकडून कार्यकारिणीचा विस्तार करण्यात आला आहे. ठाकरे गटानं 6 नवनियुक्त नेत्यांची नावं आणि त्याच्यावर सोपवण्यात आलेल्या जबाबदाऱ्या जाहीर केल्या आहेत. नव्या कार्यकारिणी विस्तारात विनायक राऊत (Vinayak Raut), अनिल देसाई (Anil Desai), अनिल परब (Anil Parab), राजन विचारे (Rajan Vichare), रवींद्र वायकर (Ravindra Waikar) आणि सुनील प्रभू (Sunil Prabhu) यांचा समावेश करण्यात आला आहे. तसेच, कार्यकारिणी विस्तारात पक्षाचे उपनेते आणि संघटक पदीसुद्धा नव्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत.
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसेना कार्यकारिणीचा विस्तार केला. या विस्तारात सहा नवे नेते तसेच उपनेते आणि संघटकपदी नव्या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या आहेत. राज्यातील पक्षवाढीस बळकटी मिळावी यासाठी नव्या नियुक्त्या करण्यात आल्याचं शिवसेना ठाकरे गटाच्या वतीनं सांगण्यात आलं आहे.
खासदार विनायक राऊत, खासदार अनिल देसाई, आमदार अनिल परब, खासदार राजन विचारे, आमदार रवींद्र वायकर, आमदार सुनील प्रभू यांची नेतेपदी नियुक्ती करून शिवसेना नेते मंडळाचा विस्तार करण्यात आला आहे. तर उपनेते म्हणून विजय साळवी (कल्याण), संजय जाधव परभणी, संजय पवार (कोल्हापूर), राजुल पटेल (मुंबई), शीतल देवरू (मुंबई), शरद कोळी (सोलापूर) यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
शिवसेना ठाकरे गटाचे सचिव म्हणून सरदेसाई साईनाथ दुर्गे आणि सुप्रभदा फातर्पेकर काम पाहतील, असंही ठाकरे गटाकडून जाहीर करण्यात आलं आहे. तर संघटक म्हणून अस्मिता गायकवाड (सोलापूर) शुभांगी पाटील (नाशिक) जान्हवी सावंत (कोकण) छाया शिंदे (सातारा), विलास वाव्हळ (मुंबई), विलास रुपवते(मुंबई), चेतन कांबळे (संभाजीनगर )यांची नियुक्ती असेल, असंही ठाकरे गटाकडून जाहीर करण्यात आलं आहे.
शिवसेना ठाकरे गटाच्या नेतेमंडळीमध्ये एकूण 16 जणांचा समावेश असेल यामध्ये मनोहर जोशी, लीलाधर डाके, दिवाकर रावते, सुभाष देसाई, आदित्य ठाकरे, संजय राऊत, चंद्रकांत खैरे, अनंत गीते, अरविंद सावंत भास्कर जाधव, विनायक राऊत, अनिल देसाई, अनिल परब, राजन विचारे, रवींद्र वायकर, सुनील प्रभू यांचा समावेश असेल, असंही ठाकरे गटाकडून सांगण्यात आलं आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :