एक्स्प्लोर

Goregaon Fire: गोरेगावात भीषण अग्नितांडव, आठ जणांचा मृत्यू, 58 जखमी, मृतांच्या वारसांना 5 लाखांची मदत

Goregaon Fire : अग्निशमन दल आणि पोलिसांनी आगीवर नियंत्रण मिळवले आहे. या दुर्घटनेची चौकशी करण्याचे आदेश मुख्यमंत्री  एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत

मुंबई : मुंबईच्या गोरेगावमधील (Mumbai Goregaon Fire News) जय भवानी इमारतीच्या पार्किंगमध्ये मध्यरात्री तीनच्या आसपास भीषण आग लागली होती. या दुर्घटनेत सात जणांचा मृत्यू झालाय. 58 जण जखमी झालेत त्यातल्या पाच  जणांची प्रकृती गंभीर  आहे. अग्निशमन दल आणि पोलिसांनी आगीवर नियंत्रण मिळवले आहे. या दुर्घटनेची चौकशी करण्याचे आदेश मुख्यमंत्री  एकनाथ शिंदे  (Eknath Shinde) यांनी दिले आहेत. दरम्यान मुख्यमंत्र्यांनी या आगीत मृत्यू झालेल्यांच्या वारसांना मदत जाहीर केली आहे.

मृतांच्या कुटुंबियांना पाच लाखांची मदत केली जाणार असल्याची घोषणा मुख्यमंत्र्यांकडून झालीये. तर जखमींच्या उपचारांचा खर्चही राज्य सरकार करणार आहे  तर मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, पोलिस अधिकारी आणि महापालिका आयुक्तांशी चर्चा सुरू आहे.  स्क्रॅपमुळे आग लागल्याची प्राथमिक माहिती आहे. मृतांच्या परिवाराला शासनाकडून पाच लाखांची मदत  करण्यात येणार आहे.  जखमींचा उपचाराचा खर्च शासनाकडून केला जाणार आहे .

 

पालिका आयुक्त इकबाल चहल ट्रामा केअर रुग्णालयात

जखमी झालेल्यांवर सध्या कूपर आणि ट्रॉमा केअर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.या भीषण आगीत 30 पेक्षा अधिक दुचाकी आणि  चार कार जळून खाक झाल्यात. तसेच तळमजल्यावरील काही दुकानंही जळून खाक झालेत. आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाला यश आलं असून, सध्या कुलिंगचं काम सुरु आहे.  पालिका आयुक्त इकबाल चहल ट्रामा केअर रुग्णालयात दाखल झाले आहे.  तर दीपक केसरकर म्हणाले, दिल्लीहून मुख्यमंत्र्यांच दिल्लीहून फोन आला आणि त्यांनी मला तात्काळ गोरेगावला जायला सांगितलं आहे. 

कापडाच्या आणि भंगारच्या गोदामाला आग

तर पालकमंत्री मंगलप्रसाद लोढा म्हणाले,  राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार दिल्लीत आहेत. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या संपर्कात मी आहे. गोरेगाव येथे घडलेली दुर्घटना दुर्दैवी आहे. आग इमारतीच्या खाली कापडाच्या आणि भंगारच्या गोदामामध्ये लागली. 

हे ही वाचा :

 अग्नीतांडव! मुंबईच्या गोरेगावमधील इमारतीच्या पार्किंगमध्ये भीषण आग, सात जणांचा होरपळून मृत्यू तर 58 जखमी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

IPL 2025 बाबत मोठी अपडेट, 10 संघाची बीसीसीआयकडे मोठी मागणी, खेळाडूंना होणार फायदा
IPL 2025 बाबत मोठी अपडेट, 10 संघाची बीसीसीआयकडे मोठी मागणी, खेळाडूंना होणार फायदा
IND vs ZIM: ध्रुव जुरेल की जितेश शर्मा... संजू सॅमसनच्या जागी विकेटकीपर कोण?
IND vs ZIM: ध्रुव जुरेल की जितेश शर्मा... संजू सॅमसनच्या जागी विकेटकीपर कोण?
जिम्बाब्वे दौऱ्यासाठी टीम इंडिया रवाना, पाहा फोटो
जिम्बाब्वे दौऱ्यासाठी टीम इंडिया रवाना, पाहा फोटो
Photos: शाहिद कपूर ते युवराज सिंह... लग्नाआधी सानियाचं नाव कुणा कुणासोबत जोडलं?
Photos: शाहिद कपूर ते युवराज सिंह... लग्नाआधी सानियाचं नाव कुणा कुणासोबत जोडलं?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Nawab Malik at Ajit Pawar : अजित पवार यांच्या घरी डिनर डिप्लोमसी, नवाब मलिकांची खास उपस्थिती!Deekshabhoomi Underground Parking Issue : नागपूर दीक्षाभूमी आंदोलन कुणी भडकवलं? Spcial ReportTop 25 : रात्रीच्या राज्यातील 25 बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट : 02 July 2024 : ABP MajhaVidhan Parishad Election Special Report : घेणार माघार की होणार घोडेबाजार? विधानपरिषदेत कुणाचा गेम?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
IPL 2025 बाबत मोठी अपडेट, 10 संघाची बीसीसीआयकडे मोठी मागणी, खेळाडूंना होणार फायदा
IPL 2025 बाबत मोठी अपडेट, 10 संघाची बीसीसीआयकडे मोठी मागणी, खेळाडूंना होणार फायदा
IND vs ZIM: ध्रुव जुरेल की जितेश शर्मा... संजू सॅमसनच्या जागी विकेटकीपर कोण?
IND vs ZIM: ध्रुव जुरेल की जितेश शर्मा... संजू सॅमसनच्या जागी विकेटकीपर कोण?
जिम्बाब्वे दौऱ्यासाठी टीम इंडिया रवाना, पाहा फोटो
जिम्बाब्वे दौऱ्यासाठी टीम इंडिया रवाना, पाहा फोटो
Photos: शाहिद कपूर ते युवराज सिंह... लग्नाआधी सानियाचं नाव कुणा कुणासोबत जोडलं?
Photos: शाहिद कपूर ते युवराज सिंह... लग्नाआधी सानियाचं नाव कुणा कुणासोबत जोडलं?
उत्पन्नची अट ते मुदतवाढ, लाडकी बहिण योजनेत महत्वाचे 7 मोठे बदल
उत्पन्नची अट ते मुदतवाढ, लाडकी बहिण योजनेत महत्वाचे 7 मोठे बदल
पुणे-सोलापूर महामार्गावर टायर फुटल्यानं भीषण अपघात, 4 जणांचा जागीच मृत्यू
पुणे-सोलापूर महामार्गावर टायर फुटल्यानं भीषण अपघात, 4 जणांचा जागीच मृत्यू
आषाढीसाठी पंढरी सज्ज, भंडीशेगावपासून पंढरपूरपर्यंत होणार आकर्षक विद्युत रोषणाई  
आषाढीसाठी पंढरी सज्ज, भंडीशेगावपासून पंढरपूरपर्यंत होणार आकर्षक विद्युत रोषणाई  
Pune Metro : धक्कादायक! पुणे मेट्रो स्थानकात सरकत्या जिन्यावरून उतरताना खाली पडून प्रवाशाचा मृत्यू
धक्कादायक! पुणे मेट्रो स्थानकात सरकत्या जिन्यावरून उतरताना खाली पडून प्रवाशाचा मृत्यू
Embed widget