डॉ. पायल तडवी आत्महत्या प्रकरण, आरोपी महिला डॉक्टरांचा दोषमुक्तीचा अर्ज न्यायालयानं फेटाळला
डॉ. पायल तडवी आत्महत्या प्रकरणातील (Dr. Payal Tadvi suicide case) तिन्ही आरोपी महिला डॉक्टरांचा दोषमुक्तीचा अर्ज फेटाळला न्यायालयानं फेटाळला आहे.
Dr. Payal Tadvi suicide case : डॉ. पायल तडवी आत्महत्या प्रकरणातील (Dr. Payal Tadvi suicide case) तिन्ही आरोपी महिला डॉक्टरांचा दोषमुक्तीचा अर्ज फेटाळला न्यायालयानं फेटाळला आहे. डॉ. पायल तडवीच्या आत्महत्या प्रकरणाच्या पाच वर्षांनंतर मुंबई सत्र न्यायालयानं (mumbai sessions court) हा निर्णय घेतलाय. नायर रुग्णालयात (Nair hospital) जातीवाचक टिप्पणी करुन छळ करत आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा सहकारी महिला डॉक्टरांवर आरोप आहे.
आरोपींना ठोठावण्यात आला होता प्रत्येकी 25 हजारांचा दंड
दोषमुक्तीचा अर्ज फेटाळताना डॉ. अंकिता खंडेलवाल, डॉ. हेमा आहुजा आणि डॉ. भक्ती मेहर या आरोपींना प्रत्येकी 25 हजारांचा दंड ठोठावण्यात आला आहे. कोर्टाच्या आदेशाप्रमाणे दंडाची ही रक्कम पायलची आई आबेदा तडवी यांना देण्याचे निर्देशही न्यायालयानं दिले आहेत. महिनाभरात दंडाची रक्कम आरोपींना न्यायालयात जमा करावी लागणार आहे. विशेष सरकारी वकील प्रदिप घरत यांनी आरोपींच्या दोषमुक्तीला तीव्र विरोध केला होता.
22 मे 2019 रोजी डॉ. पायल तडवीनं केली होती आत्महत्या
26 वर्षीय डॉ. पायल तडवीनं 22 मे 2019 रोजी नायर रुग्णालयामधील वसतिगृहाच्या खोलीत गळफास लावून आत्महत्या केली होती. जातीवाचक टिप्पणी, रॅगिंग आणि मानसिक छळ करत आत्महत्येसाठी प्रवृत्त केल्याचा सहकारी महिला डॉक्टरांवर आरोप आहे. आत्महत्येनंतर काही दिवसांनी अटक करण्यात आलेल्या आरोपी महिला डॉक्टरांना 9 ऑगस्ट 2019 रोजी हायकोर्टानं जामीन दिला होता.
महत्वाच्या बातम्या: