(Source: ECI/ABP News/ABP Majha)
ED : कोविड घोटाळा प्रकरण, डॉ. किशोर बिसुरेंना 20 लाखासह मौल्यवान वस्तू मिळाल्याचा ईडीचा दावा
दहिसर कोविड सेंटरचे डीन डॉ. किशोर बिसुरेंना (Dr Kishore Bisure) रोख 20 लाख रुपयांसह लॅपटॉपसारख्या मौल्यवान वस्तू मिळाल्याचा दावा ईडीनं आरोपपत्रात केला आहे.
Covid scam case : दहिसर कोविड सेंटरचे डीन डॉ. किशोर बिसुरेंना (Dr Kishore Bisure) रोख 20 लाख रुपयांसह लॅपटॉपसारख्या मौल्यवान वस्तू मिळाल्याचा दावा ईडीनं आरोपपत्रात केला आहे. त्यांना लाइफलाईन हॉस्पिटल मॅनेजमेंट सर्व्हिसेसकडून पैसे मिळाले आहेत. याप्रकरणात डॉ. बिसुरे यांना ED ने अटक केली होती. डॉ. किशोर बिसुरे हे जुलै 2020 ते डिसेंबर 2020 या कालावधीत दहिसर जंबो कोविड सेंटरमध्ये डीन म्हणून बीएमसी टीमचे नेतृत्व करत होते. त्यांना केंद्राचे योग्य कामकाज सुनिश्चित करणे आवश्यक होते. परंतू, ते त्यांच्या वैयक्तिक आर्थिक फायद्यासाठी बेकायदेशीर कमा करत असल्याचं ईडीने म्हटलं आहे.
बिसुरे यांना अशा सर्व अनियमितता माहीत असूनही, जेव्हा त्यांना त्यांच्या उपनियुक्त आणि प्रशासकीय वैद्यकीय आधिकारायणी त्यांच्यासमोर अशा अनियमिततेचे मुद्दे उपस्थित केले, असता त्यांना कमी तैनातीकडे दुर्लक्ष करण्याचे निर्देश दिले होते. डॉ. किशोर बिसुरे हे त्यांचे कर्तव्य पार पाडण्यात अयशस्वी ठरले आहेत. लाईफलाइन हॉस्पिटल मॅनेजमेंट सर्व्हिसेसच्या भागीदारांना कोविड-19 च्या साथीच्या आजारामध्ये रुग्णांचे जीवन धोक्यात आणणार्या सर्व अनियमितता पार पाडण्यास परवानगी दिल्याचे ईडीनं आरोपत्रात म्हटलं आहे.
लाइफलाइनच्या भागीदारांचे हित सुनिश्चित करण्यासाठी आपली कर्तव्ये पार पाडली. बनावट हजेरी पत्रकांच्या आधारे ईओआयच्या अटींनुसार वैद्यकीय कर्मचार्यांची आवश्यक तैनाती दर्शवून तयार केलेल्या बनावट बिलांना हेतुपुरस्सर आणि जाणूनबुजून परवानगी मंजूर केली. आरोपी डॉ. किशोर बिसुरे यांच्या या बेकायदेशीर कृत्यामुळे लाइफलाइन हॉस्पिटल मॅनेजमेंट सर्व्हिसेस कंपनीला गुन्ह्याची रक्कम जमा झाली.
ईडीच्या आरोपपत्रानुसार, लाइफलाइन हॉस्पिटल मॅनेजमेंट सर्व्हिसेसच्या 30 टक्के भागिदारांपैकी एक असलेल्या पाटकर यांनी कंपनी स्थापन करताना केवळ 12,500 रुपयांची गुंतवणूक केली होती. आरोपपत्रात असे म्हटले आहे की पाटकर गुन्हेगारी कृत्यांमध्ये सामील होता आणि इतर आरोपी भागीदार आणि बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या अधिकार्यांसह कट रचला. पाटकर आणि बिसुरे यांना ईडीने प्रिव्हेन्शन ऑफ मनी लाँडरिंग कायद्याच्या तरतुदींखाली अटक केली असून सध्या ते न्यायालयीन कोठडीत आहेत.
महत्त्वाच्या बातम्या: