एक्स्प्लोर
अजित डोवालांच्या मुलाची पाकिस्तानी व्यापाऱ्यासोबत भागीदारी, राज ठाकरेंनी दाखवले पुरावे
अजित डोवाल आणि पाकिस्तानचे सुरक्षा सल्लागार बँकॉकमध्ये गुप्तपणे भटले होते, त्या भेटीत काय झालं? असा सवाल राज ठाकरे यांनी उपस्थित केला आहे.
मुंबई : भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांच्या मुलाच्या कंपनीमध्ये दोन भागीदार आहेत. त्यापैकी एक अरबी आहे, तर दुसरा पाकिस्तानी आहे, अशी माहिती मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज दिली. राज यांनी यासंबधीची एका इंग्रजी वृत्तपत्रातील माहिती लोकांसमोर मांडली. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या 13 व्या वर्धापन दिनानिमित्त मुंबईच्या रंगशारदा सभागृहात आयोजित सभेत राज बोलत होते.
राज म्हणाले की, "अजित डोवाल यांच्या मुलाची पाकिस्तानी व्यापाऱ्यांसोबत भागीदारी चालते. परंतु डोवालांच्या मुलाच्या जागी दुसरा कोणी असता तर त्याला मोदी भक्तांनी देशद्रोही ठरवले असते. मोदी भक्त आम्हाला देशभक्ती शिकवण्याचा प्रयत्न करत आहेत."
27 डिसेंबर 2018 रोजी अजित डोवाल आणि पाकिस्तानचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार यांची बँकॉकमध्ये गुप्त बैठक झाली, त्या भेटीत काय झालं? असा सवाल राज ठाकरे यांनी उपस्थित केला आहे.
25 डिसेंबर 2015 रोजी मोदींनी नवाज शरीफ यांना पाकिस्तानात जाऊन केक भरवला आणि पुढे 7 दिवसांत पठाणकोट येथे हवाई तळावर हल्ला झाला. या दोन घटनांचा परस्परांशी काय संबंध आहे? असा सवाल राज ठाकरे यांनी विचारला आहे.
दरम्यान राज ठाकरे यांनी यांनी आज जे आरोप केले, जे प्रश्न उपस्थित केले, त्यासाठीचे योग्य पुरावेदेखील त्यांनी यावेळी लोकांसमोर मांडले.
वाचा : निवडणूक जिंकण्यासाठी एक-दोन महिन्यात पुलवामासारखा हल्ला घडवला जाईल : 'राज'कीय स्ट्राईक
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
बीड
व्यापार-उद्योग
महाराष्ट्र
रत्नागिरी
Advertisement